Join us
Daily Top 2Weekly Top 5

ओटी पोट सुटलं-वजन कमी होत नाही? घरच्याघरी ४ सोपे व्यायाम-मिळेल परफेक्ट फिगर आणि फिटनेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 19:42 IST

How To Lose Belly Fat : जर तुम्हाला जीमला जायला वेळ नसेल तर घरच्याघरी 4 प्रकारचे व्यायाम करून बेली फॅट सहज कमी करता येते.

बेली फॅट वाढणं (Belly Fat) ही आजकालची सामान्य समस्या आहे. बरेच लोक या त्रासातून जातात. पोट बाहेर येण्याचं सर्वात मोठं कारण अन्हेल्दी लाईफस्टाईल आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी आहेत. यामुळे पोट सुटत आहे. पोटाची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही काही सोपे घरगुती उपाय करू शकता (How To Lose Belly Fat). जर तुम्हाला जीमला जायला वेळ नसेल तर घरच्याघरी 4 प्रकारचे व्यायाम करून बेली फॅट सहज कमी करता येते. काही दिवसांत तुम्हाला  बदल झालेला दिसून येईल. (Easy Way To Lose Belly Fat)

१) माऊंटन क्लाईंबर्स

 हा एक उत्तम कार्डीओ आणि कोअर वर्कआऊट आहे ज्यामुळे संपूर्ण शरीराच्या कॅलरीज बर्न होण्यास मदत होते आणि पोटाच्या मांसपेशी टोन्ड होतात. हा व्यायाम करणं खूपच सोपं आहे. या व्यायाम करण्यासाठी प्लँकच्या स्थितीत या आणि गुडघे छाती जवळ आणि पाय पुन्हा प्लँकच्या स्थितीत ठेवा. दोन्ही पायांनी हा व्यायाम करा. ज्यामुळे हॉर्ट रेट चांगला राहील आणि पोटाच्या खालचा भाग म्हणजेच कोअर मसल्स मजबूत होण्यास मदत होईल.

२) बायसिकल क्रंचेस

 जेव्हा पोटाची चरबी किंवा साईड फॅट कमी करायचं असतं त्यासाठी हा सगळ्यात प्रभावी व्यायाम आहे. यासाठी पाठीवर झोपा आणि दोन्ही हात डोक्याच्या मागे ठेवा. नंतर सायकल चालवल्याप्रमाणे पाय फिरवा. या व्यायामामुळे पोटाचा वरचा भाग, मांसपेशींचे स्नायू बळकट होतील.

३) प्लँक

हा व्यायाम सोपा असून पोटाची चरबी कमी करण्यासाठी सर्वात शक्तीशाली व्यायाम आहे. हा व्यायाम करण्यासाठी पुशअप्सच्या मुद्रेत या पण  हाताचे कोपर जमिनीला टेकलेले असावेत. पोट आतल्या बाजूला खेचा. ज्यामुळे कोअर मसल्स मजबूत होतीत आणि पोटाचे स्नायू घट्ट होण्यास मदत होईल.

४) दोरी उड्या

 दोरी उड्या हा व्यायाम असा आहे जो तुम्ही कुठेही करू शकता.  दोरी उड्या मारणं खूपच सोपं आहे कमीत कमी वेळात कमी प्रयत्नात तुम्ही हा सोपा व्यायाम करू शकता. कमी जागेत  होणारा हा व्यायाम करून तु्म्ही जास्तीत जास्त कॅलरीज जाळू शकता. 

English
हिंदी सारांश
Web Title : Stubborn belly fat? Shed it at home with these exercises!

Web Summary : Belly fat is a common problem caused by unhealthy lifestyles. Reduce it with home exercises like mountain climbers, bicycle crunches, planks, and rope jumping. These exercises will help tone your core and burn calories effectively.
टॅग्स :फिटनेस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य