Join us
Daily Top 2Weekly Top 5

वयाची शंभरी गाठायचीये? डॉक्टर सांगतात ५ गोष्टी करा, कायम आनंदी-निरोगी राहाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 13:26 IST

How To Live 100 Years : जर तुम्हाला १०० वर्ष निरोगी जगायचं असेल तर काही हेल्दी टिप्स फॉलो करू शकता.

नवीन वर्षाला (New Year) सुरूवात झाली आहे. नवीन वर्षात बरेच लोक संकल्प करतात. काहीजण व्यायाम करण्याचा संकल्प करतो तर काहीजण आपल्या वाईट सवयी सोडण्याचा संकल्प करतो. तर काहीजण वजन कमी करण्याचा,  हेल्दी-खाण्यापिण्याचा संकल्प करतात. जर तुम्हाला १०० वर्ष निरोगी जगायचं असेल तर काही हेल्दी टिप्स फॉलो करू शकता. (Doctor Suggests 5 Best Way To live 100 Years)

नवीन वर्षाच्या सुरूवातीला जर तुम्ही हेल्दी राहण्याचा आणि हेल्दी खाण्यापिण्याचा संकल्प केला असेल तर १०० वर्ष निरोगी जगण्यासाठी काय करावं, काय करू नये याच्या सिक्रेट टिप्स पाहू शकता. चेन्नईचे प्रसिद्ध डॉक्टर चोकलिंगम यांनी एका मुलाखतीत काही टिप्स सांगितल्या आहेत. या टिप्स आजपासून फॉलो करून तुम्ही निरोगी दीर्घायुष्य मिळवू शकता. जर तुम्हाला निरोगी आयुष्य हवं असेल तर दिवसातून २ वेळा खाणं पुरेसं आहे. याला इंटरमिटेंट फास्टिंग असं  म्हणतात. डॉक्टर सांगतात की तुमची तब्येत चांगली ठेवण्यासाठी हे मदत करते. 

जर तुम्ही दिवसांत २ वेळा खात असाल तर कोणत्यावेळी खावं?

डॉक्टर सांगतात जर तुम्ही संध्याकाळी  ७ वाजता जेवत असाल तर १६ तासांनी म्हणजेच दुसऱ्या दिवशी ११ वाजता जेवायला हवं. जर तुम्ही ११ वाजता खात असाल तर ८ तासांनतर म्हणजेच ७ वाजता आणि दुसऱ्या दिवशी १६ तासांनी म्हणजे ११ वाजता जेवता तेव्हा १६:८ हे डाएट फॉलो करून तुम्ही १०० वर्ष जगू शकता.  ज्यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉल व्यवस्थित कमी होते आणि ऊर्जा मिळते. एसिडीटीची समस्या उद्भवत नाही.

हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यासही मदत होते. याशिवाय कमीत कमी ३ लिटर पाणी प्यायला हवं. खाण्यात कमीत कमी तेलाचा वापर करावा. थकवा वाटू नये यासाठी शरीर एक्टिव्ह ठेवा. असं केल्यानं तुम्हाला झोपही चांगली लागेल.

रोज  ७ ते ८ तास झोपायला हवं. जशी आपण शरीराची काळजी घेतो तशी मनाचीही घ्यायला हवी. मन नेहमी आनंदीत ठेवा. हॅप्पी हॉर्मोन्स, डोपामाईन,ऑक्सिटोसिन, सेरोटोनिन, एंडॉर्फिन, मेलाटोनिननी तयार होते. ज्यामुळे शरीर एनर्जीनं भरलेलं राहते. रोज योगा किंवा ध्यान करायला हवं. ज्यामुळे शरीर आणि मनही हलके  राहते. या पद्धती फॉलो करून तुम्ही 100 वर्ष जगू शकता. 

English
हिंदी सारांश
Web Title : Want to Live to 100? Doctors Suggest These 5 Things!

Web Summary : Start the new year with healthy habits! Doctors suggest intermittent fasting (eating twice daily), drinking 3 liters of water, staying active, sleeping 7-8 hours, and keeping your mind happy through yoga and meditation for a long, healthy life.
टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्स