बॉलिवूड अभिनेत्रींसारखी फिट आणि सुडौल फिगर असावी, असं स्वप्न प्रत्येक मुलीचं असतं. मग ती कतरिना असो किंवा दीपिका, त्यांचा फिटनेस पाहून आपल्यालाही तसंच दिसावं असं वाटणं स्वाभाविक आहे. फिट राहणं म्हणजे फक्त वजन कमी करणं नव्हे, तर शरीर सुडौल किंवा आपली फिगर व्यवस्थित शेपमध्ये असणे देखील गरजेचे असते. अनेक मुलींना वाटतं की क्रॅश डाएट किंवा जिममध्ये खूप कष्ट घेतले की सेलिब्रिटींसारखी फिगर मिळेल. पण खरं पाहता, वेळेवर जेवण, पुरेसे पाणी पिणे, स्ट्रेस मॅनेजमेंट, झोपेची शिस्त, मानसिक आरोग्य, आणि लाईफस्टाईल मधील काही आवश्यक बदल यामुळेच त्यांची फिगर कायम मेंटेन राहते(how to get celebrity like an hourglass figure naturally).
स्क्रीनवर दिसणारी ही परफेक्ट फिगर पाहून अनेकजणी फक्त डाएट आणि जिमवरच भर देतात. मात्र प्रत्यक्षात बॉलिवूड सिलिब्रिटींच्या फिटनेस मागे केवळ वर्कआऊट किंवा खाण्यापिण्याचेच नियम नाहीत, तर त्यांच्या काही खास सवयी यांचाही मोठा वाटा असतो. या अभिनेत्री केवळ तासंतास जिममध्ये व्यायाम करून किंवा कडक डाएट (curvy body tips for women) करून स्वतःला मेंटेन ठेवत नाहीत. त्यांच्या फिटनेसचं खरं सिक्रेट हे त्यांच्या रोजच्या जगण्यातील काही छोट्या पण महत्त्वाच्या सवयींमध्ये दडलेलं आहे. मोठमोठ्या सेलिब्रिटी फिटनेससाठी फक्त ( curvy body tips for women) जिम - डाएटवर अवलंबून नसतात, तर त्यांच्या डेली रुटीनमध्ये असे काही बदल करतात जे फॅट बर्न करण्यास नैसर्गिक पद्धतीने मदत करतात. सेलिब्रिटी फिटनेससाठी (perfect body shape for girls) जिम आणि डाएटसोबतच नेमक्या कोणत्या 'खास' टिप्स फॉलो करतात ते पाहूयात...
सेलिब्रिटींसारखे फिट आणि सुंदर फिगर मिळवण्यासाठी फॉलो करा 'या' सवयी...
१. भरपूर पाणी प्या :- फिट राहण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे दिवसभरात पुरेसे पाणी पिणे. अनेकजण हीच मोठी चूक करतात. पाण्याअभावी मेटाबॉलिझम (पचनशक्ती) मंदावते. त्यामुळे दिवसभर पुरेसे पाणी पिऊन स्वतःला हायड्रेटेड ठेवा.
२. व्यायाम किंवा योगा :- दररोज जिममध्ये जाऊन व्यायाम करा किंवा योगासने करा. जर तुम्हाला हे दोन्ही शक्य नसेल, तर सकाळी आणि संध्याकाळी किमान ३० मिनिटे वेगाने चालण्याचा साधासोपा एक्सरसाइज करा.
३. आहारावर लक्ष द्या :- तुमच्या आहारात पोषक तत्वांचा समावेश करा. हंगामी फळे आणि भाज्या खाण्यावर भर द्या. तसेच, दररोज मूठभर ड्रायफ्रूट्स आणि सीड्स खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
तुम्ही ५ गोष्टी करत नसाल तर कडक डाएट आणि भरमसाठ व्यायाम करुनही नाही होणार वेटलॉस!
४. वाईट सवयींना 'नो' म्हणा :- बाहेरचे उघड्यावरचे अन्न, फास्ट फूड, पॅकेज्ड फूड तसेच अल्कोहोल आणि स्मोकिंगपासून लांब राहा. या गोष्टी शरीराचे प्रचंड नुकसान करतात.
५. साखर, मैदा खाणं सोडा :- गोड पेय, सरबत, कोल्ड ड्रिंक्स, बिस्किटे, केक आणि व्हाईट ब्रेड शरीरातील चरबीचे प्रमाण वाढवतात. त्यामुळे असे पदार्थ खाणे टाळा किंवा फार कमी प्रमाणात खा.
६. नैसर्गिक सौंदर्यावर भर :- पार्लरमध्ये जाऊन महागड्या ट्रीटमेंट्स करण्यापेक्षा घरीच तयार केलेले नॅचरल फेसमास्क आणि हेअरमास्क वापरा. यामुळे त्वचा आणि केस नैसर्गिकरित्या चमकतील.
७. मेडिटेशन :- स्ट्रेस दूर ठेवण्यासाठी दररोज ध्यान करा. भविष्याची चिंता करण्यापेक्षा 'वर्तमान काळात' जगण्याचा प्रयत्न करा.
८. आनंदी राहा :- नेहमी आनंदी राहा आणि इतरांनाही हसवा. आयुष्यातील प्रत्येक गोष्ट गांभीर्याने घेण्याची गरज नसते; मनमोकळेपणाने जगणे हाच खरा चांगल्या फिटनेसचा मंत्र आहे.
९. पुरेशी झोप घ्या :- दररोज ७ ते ८ तासांची शांत झोप घेणे गरजेचे असते. झोपण्याची वेळ निश्चित करा आणि रात्री उशिरापर्यंत मोबाईल किंवा टीव्ही पाहणे टाळा.
१०. कोमट पाणी आणि लिंबाचा रस :- रोज सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात लिंबाचा रस घालून प्या. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि पोटाची चरबी वेगाने कमी होते.
