आपले आरोग्य चांगले व सुदृढ ठेवण्यासाठी रोजच्या आहारात ड्रायफ्रुट्सचा समावेश करणे अत्यंत फायदेशीर मानलं जातं. बदाम, अक्रोड, पिस्ता, काजू, मनुका हे सर्वच ड्रायफ्रूट्स शरीराला इन्स्टंट एनर्जी, गुड फॅट्स, व्हिटॅमिन्स आणि अँटिऑक्सिडंट्स देतात. हेल्दी फॅट, प्रोटीन, फायबर आणि भरपूर एनर्जी असलेल्या ड्रायफ्रुट्समध्ये काही आवश्यक जीवनसत्त्वे आणि मिनरल्स मोठ्या प्रमाणावर असतात, यामुळेच त्यांना 'सुपरफूड्स' म्हटले जाते. हे ड्रायफ्रुट्स शरीराला फक्त पोषणच देत नाहीत, तर रोगप्रतिकारशक्ती वाढवतात, मेंदूला अतिशय तल्लख करतात, त्वचा आणि केस निरोगी ठेवतात आणि शरीराला आतून उष्णता देतात(how much dry fruits to eat daily).
हिवाळ्यात बहुतेकदा आपण ड्रायफ्रुट्स अधिक प्रमाणांत खातात, कारण ते शरीराला आतून ऊब देतात.पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा की, दिवसभरात नेमके किती प्रमाणात ड्रायफ्रुट्स खाल्ले तर ते आरोग्यासाठी सर्वोत्तम ठरते आणि त्याचे आपल्या शरीराला पूर्णपणे फायदे मिळतात. बरेचदा ड्रायफ्रुटस अति खाल्ल्यास वजन वाढण्याची भीती असते, तर कमी खाल्ल्यास त्यांचे फायदे शरीराला पूर्णपणे मिळत नाहीत. त्यामुळे दिवसभरात चांगल्या आरोग्यासाठी ड्रायफ्रुटस खाण्याचे योग्य प्रमाण जाणून घेणे आवश्यक आहे. याबाबत सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट सुमन अग्रवाल खास टिप्स देतात ज्यामुळे तुम्ही तुमच्या आहारात ड्रायफ्रुट्सचे परफेक्ट (How much amount of dry fruits are essential for health) प्रमाण ठेवून हेल्दी, फिट आणि एनर्जेटिक राहू शकता.
ड्रायफ्रुट्स खाण्याचे योग्य प्रमाण आणि पद्धत...
सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट सुमन अग्रवाल यांचे म्हणणे आहे की, बदाम, अक्रोड, काजू, बेदाणे किंवा अंजीर हे प्रत्येक ड्रायफ्रूट त्यांच्या वेगळ्या चवीसाठी तसेच त्यात असणाऱ्या वेगवेगळ्या पौष्टिक गुणधर्मासहित रोजच्या आहारात समाविष्ट करणे गरजेचे असते. पण ड्रायफ्रुट्स खाण्याचा एक खास नियम सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट सुमन अग्रवाल यांनी सांगितला आहे तो म्हणजे, "एका मूठीत जेवढे ड्रायफ्रूट्स येतील, तेवढेच दिवसभरासाठी खाणे चांगले आहे. मग तुम्ही काजू खा, पिस्ता खा, बदाम खा किंवा अक्रोड." पण दिवसभरासाठी फक्त मूठभर ड्रायफ्रुटस खाणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरु शकते.
हिवाळ्यात आहारात हवेच असे ६ फूड - कॉम्बिनेशन! कडाक्याच्या थंडीतही राहाल हेल्दी, ठणठणीत...
हिवाळ्यातही ड्रायफ्रुट्स भिजवून खावेत का?
न्यूट्रिशनिस्ट सुमन अग्रवाल सांगतात, 'भारत हा उष्ण प्रकृतीचा देश आहे आणि ड्रायफ्रुटस देखील थोडे उष्णच असतात. पोटात जाऊन उष्णता निर्माण करणाऱ्या या ड्रायफ्रुट्सला थंड करण्यासाठी जर आपण त्यांना पाण्यात भिजवून खाल्ले, तर ते पचनास हलके होतात, म्हणजेच ते लवकर पचू शकतात.'
प्रत्येक वयोगटातील व्यक्तींनी ड्रायफ्रुट्स का खावेत ?
BioMed Central मध्ये प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टनुसार, ड्रायफ्रुट्स आणि नट्स हे जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर, हेल्दी फॅट्स इत्यादींचा उत्तम स्रोत आहेत. दररोज योग्य प्रमाणात ड्रायफ्रुटस खाल्ल्याने हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या जसे की हृदयविकार आणि टाइप २ डायबिटीसचा धोका देखील कमी होऊ शकतो.
ड्रायफ्रुटस खाण्याचे आरोग्यदायी फायदे...
Nuffoodsspectrum.in मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनात असे दिले आहे की, ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने 'कॉग्निटिव्ह डिक्लाइन' (मानसिक किंवा मेंदूचे आरोग्य हळूहळू कमी होणे) मानसिक आरोग्यामध्ये होणारी घसरण थांबवते. ड्रायफ्रुट्समध्ये असलेले हेल्दी फॅट्स, प्रोटीन आणि मिनरल्स जसे की मॅग्नेशियम आणि आयर्न मुलांची उंची व त्यांच्या मेंदूचा विकास याचबरोबर त्वचा आणि स्नायू विकसित करण्यास मदत करतात, त्यामुळे लहान मुलांनी ड्रायफ्रूट्स नियमितपणे खाल्लेच पाहिजे. तर, वाढत्या वयानुसार स्नायूंची आणि हाडांची मजबुती कमी होणे तसेच मायक्रो-न्यूट्रिएंट्सची कमतरता अशा समस्या येऊ लागतात. ड्रायफ्रुट्स या कमतरतांना भरुन काढतात यासाठीच ते खाणे आवश्यक असते.
Web Summary : Including dry fruits in your diet is beneficial for health, providing energy, good fats, and antioxidants. A handful of mixed dry fruits daily is ideal. Soaking them aids digestion, especially in warmer climates. They support immunity, brain function, and overall well-being for all ages.
Web Summary : ड्राई फ्रूट्स को आहार में शामिल करना स्वास्थ्य के लिए फायदेमंद है, जो ऊर्जा, अच्छा वसा और एंटीऑक्सीडेंट प्रदान करते हैं। रोजाना मुट्ठी भर मिक्स ड्राई फ्रूट्स आदर्श होते हैं। खासकर गर्म जलवायु में इन्हें भिगोकर खाने से पाचन क्रिया बेहतर होती है। यह सभी उम्र के लोगों के लिए प्रतिरक्षा, मस्तिष्क के कार्य और समग्र कल्याण का समर्थन करते हैं।