Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिवसाला किती किलोमीटर चालावं? वयानुसार कोणी-किती चालायचं, पाहा फिटनेसचं सोपं गणित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 12:24 IST

How Many Kilometers Should You Walk In a Day (Steps Vs Age): चालण्यामुळे फक्त तुमचं वजन कमी होत नाही तर हार्ट रेटही चांगला राहतो.

आजकाल फिट (Fitness) राहण्यासाठी सोपा मार्ग म्हणजे चालण्याचा व्यायाम. बऱ्याच लोकांना योगा किंवा फिटनेस ट्रेनिंगसाठी व्यायामाला जायला जमत नाही. अशावेळी तुम्ही फक्त चालण्याचा व्यायाम करून सहज  फिट राहू शकता आणि वजनही नियंत्रणात ठेवू शकता. चालण्यामुळे फक्त तुमचं वजन कमी होत नाही तर हार्ट रेटही चांगला राहतो, शरीर निरोगी राहतं आणि श्वसनाचे विकारही नियंत्रणात राहतात. मसल्सची वाढही चांगली होते. प्रत्येक व्यक्तीनं वयोमानानुसार किती चालावं ते समजून घेऊ. (How Many Kilometers Should You Walk In a Day)

वयानुसार कोणत्या व्यक्तीनं किती चालावं? (How Much You Should Walk Based On Your Age)

१) लहान मुलं आणि तरूण (5 ते 18 वर्ष)

या वयात शरीराचा विकास होत असतो आणि एनर्जी लेव्हल खूपच जास्त असते. लहान मुलांसाठी फक्त चालणं पुरेसं नसतं तर सक्रिय राहणंही गरजेचं असतं. या  वयोगटातील मुलं जवळपास 12 हजार ते 15 हजार पाऊलं चालू शकतात. याव्यतिरिक्त मुलं खेळणं, सायकलिंग किंवा धावणं हे व्यायाम करू शकतात. ज्यामुळे हाडं आणि मांसपेशी चांगल्या राहतात.

 २) तरूण वयातील मुलं (18 ते 40 वर्ष)

 हा आयुष्यातील सर्वात महत्वचाचा कालावधी असतो. ज्यात आपण खूपच व्यस्त असतो. डेस्क जॉब आणि चुकीच्या लाईफस्टाईलमध्ये या काळात वजन वाढण्याचा धोका जास्त असतो. अशावेळी 10 हजार ते 12 हजार पाऊलं रोज चालणं उत्तम मानलं जातं. या वयात नियमित चालल्यानं मेटाबॉलिझ्म वेगात राहतो. डायबिटीज,  हाय बी.पी यांसारख्या समस्या उद्भवत नाहीत.

 ३) मध्यम वयोगट (40 ते 60 वर्ष)

या वयोगटात बरेच हॉर्मोनल बदल होत असतात. या वयात सांध्यांच्या समस्या उद्भवतात. नियमित वॉक करणं गरजेचं असतं. या वयोगटात कमीत कमी 8 हजार ते 10 हजार पाऊलं चालायला हावं. सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळा  चाला. ब्रिस्क वॉकिंग या वेळेत उत्तम ठरते.

४) वयस्कर लोक (60 वर्षांहून अधिक)

वाढत्या वयात खासकरून वयाची साठी ओलांडल्यानंतर स्वत:ला एक्टिव्ह ठेवणं आणि मांसपेशी संतुलित ठेवणं गरजेचं असतं. ज्यासाठी दिवसभरात 5 हजार ते 7 हजार पाऊलं चालायला हवं. जर गुडघ्यांमध्ये वेदना होत असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्यानंच वॉक करा.

English
हिंदी सारांश
Web Title : Walking: How many kilometers daily? Age-based fitness guide.

Web Summary : Walking is an easy way to stay fit. The amount to walk varies by age. Children need more activity, while older adults should walk less. Regular walking improves health.
टॅग्स :फिटनेस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्यव्यायाम