Join us
Daily Top 2Weekly Top 5

रोज १ किलोमीटर चालल्यानं आठवड्याभरात किती वजन कमी होईल? वेट लॉसचं सोपं गणित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 17:13 IST

Walking Tips How Many Calories Does Walking Kilometer : रोज १ किलोमीटर चालल्यानं किती कॅलरीज बर्न होतात यामुळे वजन कमी होतं का,

आजकाल आपण फिट, मेंटेन दिसावं असं प्रत्येकालाच वाटतं. त्यासाठी काहीही करण्याची लोकांची तयारी असते. काहीजण जिमला जातात तर काहीजण डाएट करतात. रोज १ किलोमीटर वॉक केल्यानं शरीरात काही बदल दिसून येतील. आपल्या दिनचर्येत तुम्ही रोज चालण्याचा समावेश करू शकता. लोकांच्या मनात असा प्रश्न असतो की रोज १ किलोमीटर चालल्यानं किती कॅलरीज बर्न होतात, यामुळे वजन कमी होतं का, याबाबत एक्सपर्ट्स काय सांगतात ते समजून घेऊ. (Walking Tips How Many Calories Does Walking Kilometer A Day Burn Learn The Simple Math From An Expert)

 १ किलोमीटर वॉक केल्यानं किती कॅलरीज बर्न होतात? (How Many Calories Are Burned By Walking 1 Kilometer)

हेल्थ एक्सपर्ट्सच्यामते जर कोणतीही व्यक्ती १ किलोमीटर चालली तर जवळपास ६० ते १०० कॅलरीज बर्न होतात. ही संख्या प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळी असू शकते. वजन, उंची, चालण्याची गती यानुसार कॅलरीजची संख्या बदलत जाते. 

वेगाचा परिणाम होतो

जर तुम्ही हळूहळू चालत असाल तर कमी वेळात जास्त कॅलरीज कमी होतात. वेगानं  चालणं किंवा ब्रिस्क वॉक केल्यानं शरीर जास्त ऊर्जा खर्च करते. यामुळेच जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर जास्त वेगानं चालायला हवं. ज्यामुळे जास्तीत जास्त कॅलरीज बर्न होतील आणि तुम्हाला चांगला रिजल्ट दिसेल.

वेट मॅनेजमेंटसाठी वॉकींग का गरजेचं

वजन कमी करण्यासाठी फक्त वॉक नाही तर डाएट आणि शरीराचा मेटाबॉलिझ्म महत्वाची भूमिका बजावतो. जर तुम्ही संतुलित आहार घेत रोज चालायला गेलात तर याचा परिणाम हळूहळू शरीरावर दिसून येतो.

रोज चालण्याचे फायदे

रोज चालल्यानं हृदयाचे आरोग्य निरोगी राहते. ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतो. खराब कोलेस्टेरॉल कमी होते याव्यतिरिक्त वॉक केल्यानं मानसिक ताणतणाव कमी होतो  तसंच मूड चांगला राहण्यासही मदत होते.

 पचनक्रिया आणि झोप सुधारते

 चालल्यानं पचनक्रिया चांगली राहते. गॅस, कॉन्स्टीपेशन अशा समस्या उद्भवत नाहीत.  जे लोक रोज चालतात त्यांना झोपही चांगली येते. रोज फक्त १ किलोमीटर चालल्यानं तुम्ही व्यवस्थित कॅलरीज बर्न करू शकता.  ही सवय तुम्हाला हळूहळू फिट बनवण्यास मदत करेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Walking 1 km daily: Weight loss math and expert tips.

Web Summary : Walking 1 km burns 60-100 calories, varying by weight and speed. Regular walking aids weight management, boosts heart health, reduces stress, improves digestion, and promotes better sleep. Combine with a balanced diet for optimal results.
टॅग्स :फिटनेस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य