Join us  

How to lose Belly Fat : महिनाभरात झरझर कमी होईल Belly fat; फिटनेस एक्सपर्ट्सनी सांगितलं वजन कमी करण्याचं सिक्रेट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 5:47 PM

How to lose Belly Fat : शरीरातील चरबी कशी जाळली जाते आणि कोणते हार्मोन वजन कमी करण्यास मदत करू शकतात हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

कोरोना काळात लोकांना वर्क फ्रॉम होम आवडत असलं तरी त्याचे काही दुष्परिणामही समोर आले आहेत. विशेषत: घरी एकाच ठिकाणी अनेक तास काम केल्यानंतर लोकांचे वजन वाढलयं आणि आता वजन कमी करणं कठीण होऊन बसलंय. चरबी जाळण्यासाठी लोकांनी इतके दिवस डाएटिंगचा केलं असलं तरी काहीजण अजूनही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात आहेत. लाईफस्टाईल कोच ल्यूक कौटिन्हो यांनी याबाबतत  अधिक माहिती दिली आहे.

इंस्टाग्रामवरील एका नवीन व्हिडिओमध्ये त्यांनी  एक सिक्रेट शेअर केले आहे. तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला वाढत्या वजनामुळे त्रास होत असेल तर या टिप्स नक्की वापरून पाहू शकता. कौटिन्हो म्हणतात की बरेच लोक एका आहारातून दुसऱ्या आहाराकडे जात आहेत. किटोपासून कमी कार्ब, उच्च प्रथिने आणि शाकाहारी पर्यंत अधूनमधून उपवास करून चरबी जाळण्याचा मार्ग शोधणे.

कौटिन्हो यांच्या मते, शरीरातील चरबी कशी जाळली जाते आणि कोणते हार्मोन वजन कमी करण्यास मदत करू शकतात हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. कौटिन्हो सांगतात की मी इन्सुलिनबद्दल बोलत आहे. जेव्हा लोक इंसुलिन बद्दल बोलतात, तेव्हा पहिली गोष्ट लक्षात येते ती म्हणजे टाइप 1 आणि टाइप 2 मधुमेह. पण ते त्याहून अधिक आहे. इन्शुलिन रक्तातील साखरेची पातळी कमी करण्याचे काम करते.

रक्तातील ग्लुकोज ऊर्जा म्हणून वापरण्यासाठी हा हार्मोन पेशींसाठी महत्वाचा असतो. पण जर इन्शुलिनची पातळी खूप जास्त असेल, तर पेशी योग्य प्रकारे संवाद साधत नाहीत आणि रक्तातील साखरेची पातळी वाढते. म्हणूनच इन्शुलिनची पातळी राखणे अत्यंत आवश्यक आहे. ते खूप जास्त किंवा खूप कमी नसावे.

१) खाण्यापिण्यावर नियंत्रण - इन्शुलिनची पातळी राखण्यासाठी तुम्ही नेहमी खाणे टाळले पाहिजे. भूक लागली असतानाच खाण्याचा प्रयत्न करा.

२) कमी GI असलेले पदार्थ खा - कौटिन्होच्या मते, लोकांनी कमी ग्लायसेमिक इंडेक्स आणि जास्त फायबर असलेले पदार्थ खावेत.

३) रात्री उशिरा खाणे टाळा- बरेच लोक रात्री उशिरापर्यंत कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ खातात. ही सवय इन्शुलिन वाढण्यास कारणीभूत आहे. या प्रकारचे अन्न तुमच्या इन्सुलिनची पातळी रात्रभर उच्च ठेवते. तुम्ही रात्री जेवत असाल तरी कमी प्रमाणात खा.

४) प्रथिनेयुक्त थाळी – तुमच्या आहारात अधिकाधिक प्रथिनांचा समावेश करा. इन्शुलिनची पातळी राखण्यासाठी कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ कमीत कमी ठेवावेत. जास्तीत जास्त भाज्या खाण्याचा प्रयत्न करा.

नियमित व्यायाम करा

कौटिन्हो म्हणतात की, सकाळी व्यायाम करणे हे वजन कमी करण्याचे उत्तम सिक्रेट आहे. सकाळी व्यायाम केल्यानंतर लोकांनी दिवसभर सक्रिय असले पाहिजे. जेवण केल्यानंतर 10 मिनिटे चालण्याच्या सवयीमुळे पोटाची चरबी लवकर कमी होते.

तुमच्या झोपण्याच्या सवयी सुधारा आणि तणावाची पातळी कमी करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही तणावग्रस्त असाल आणि नीट झोप येत नसेल, तर तुम्हाला क्रेविंग्स येऊ शकते. ल्यूक म्हणतात की सामान्य इन्शुलिन पातळी राखणे चरबी जाळण्यासाठी आणि चांगले आरोग्य राखण्यासाठी आवश्यक आहे.

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्सवेट लॉस टिप्स