Lokmat Sakhi >Fitness > हातांची पकड सांगते हृदय फिट आहे की कमजोर, पाहा हातांचे स्नायू बळकट असणं का महत्वाचं..

हातांची पकड सांगते हृदय फिट आहे की कमजोर, पाहा हातांचे स्नायू बळकट असणं का महत्वाचं..

Hand grip : आपली ग्रीप किंवा एखादी वस्तू पकडण्याची शक्ती किती आहे यावरून आपल्या हृदयाचं आरोग्य कसंय हेही समजतं. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 18:00 IST2025-07-30T17:28:41+5:302025-07-30T18:00:08+5:30

Hand grip : आपली ग्रीप किंवा एखादी वस्तू पकडण्याची शक्ती किती आहे यावरून आपल्या हृदयाचं आरोग्य कसंय हेही समजतं. 

How hand grip affect your heart, know how to improve hand grip | हातांची पकड सांगते हृदय फिट आहे की कमजोर, पाहा हातांचे स्नायू बळकट असणं का महत्वाचं..

हातांची पकड सांगते हृदय फिट आहे की कमजोर, पाहा हातांचे स्नायू बळकट असणं का महत्वाचं..

Hand grip : नारळ सोलायचं असो किंवा फोडायचं असो, घरातील जड वस्तू उचल-खाचल करायची असेल यासाठी घरातील मजबूत व्यक्तीला बोलवलं जातं. ही व्यक्ती सुद्धा आपली शक्ती लावून लगेच ही जड कामं करून मोकळी होते. पण आपल्याला हे माहीत नाही की, ग्रीप केवळ आपली शक्ती दाखवण्याचं माध्यम नाही. 'द लान्सेट'मध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, आपली  एखादी वस्तू पकडण्याची शक्ती किती आहे यावरून आपल्या हृदयाचं आरोग्य कसंय हेही समजतं. 

ग्रीप स्ट्रेंथ काय असते?

लान्सेटच्या रिपोर्टनुसार, ग्रीप स्ट्रेंथ सांगते की, आपले हात, मनगट आणि पंजाच्या स्नायूच्या माध्यमातून एखादी वस्तू किती शक्ती आणि कुलशतेने पडकली जाते. ग्रीप स्ट्रेंथचे काही प्रकारही आहेत. तेच पाहुयात.

क्रश ग्रीप

जेव्हा कपडे आणि लिंबू पिळण्यासारखं काम करत असाल, तर आपला हात आणि बोटांनी किती शक्तीने ती वस्तू पिळू शकता. 

सपोर्ट ग्रीप

यात हे पाहिलं जातं की, आपण किती वेळ एखादी वस्तू धरून ठेवू शकता. हा प्रकार एखादी जड वस्तू उचलणे किंवा पुल-अप्ससारख्या अॅक्टिविटीसाठी महत्वाचा आहे.

पिंच ग्रीप

आपण बोटांच्या टिप आणि अंगठ्याच्या मधे म्हणजे चिमटीमध्ये किती वेळ एखादी वस्तू पकडून ठेवू शकता. याप्रकारची ग्रीपिंग पेन किंवा पेन्सिल पकडण्याच्या कामात येते.

ग्रीप चांगली नसण्याची कारणं

- अलिकडेच जर एखादी जखम झाली असेल किंवा हातात फ्रॅक्चर असेल.

- मानेची एखादी नस दबली असेल, ज्यामुळे आपल्या एका हातात सुन्नपणा, झिणझिण्या आणि कमजोरी आली असेल...

- रिसर्च सांगतो की, ४० वयानंतर हातांची ग्रीपिंग कमी होऊ लागते. 

- आर्थरायटिस, मल्टीपल स्क्वेरोसिस आणि पार्किंसन्ससारखा आजार.

पकड मजबूत कशी कराल?

टॉवेल पिळणे

एक भिजलेला टॉवेल घ्या आणि दोन्ही हातांनी घट्ट पकडा. आता हा पिळण्यासाठी दोन्ही हातांनी विरूद्ध दिशेने ताकद लावा. ही प्रक्रिया ३ ते ५ वेळा करा.

हॅंड ग्रीपर एक्सरसाईज

हात, मनगट आणि बोटांचे स्नायू मजबूत करण्यासाठी हॅंड ग्रीपरसारख्या टूलचा वापर करू शकता. यातील स्प्रींगमुळे स्नायू मजबूत होतात. 

Web Title: How hand grip affect your heart, know how to improve hand grip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.