Lokmat Sakhi >Fitness > अभिनेत्री भाग्यश्री सांगतेय 'ओमकार' करण्याचे ४ महत्त्वाचे फायदे, अनेक आजारांवरचा अगदी सोपा उपाय...

अभिनेत्री भाग्यश्री सांगतेय 'ओमकार' करण्याचे ४ महत्त्वाचे फायदे, अनेक आजारांवरचा अगदी सोपा उपाय...

Health Benefits Of OM Chants: 'ओम'कार करणे आरोग्यासाठी कसे फायदेशीर ठरू शकते, याविषयी माहिती सांणारा व्हिडिओ अभिनेत्री भाग्यश्री हिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.(actress Bhagyashree explains benefits of doing OM chants)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2025 15:37 IST2025-04-30T15:36:18+5:302025-04-30T15:37:26+5:30

Health Benefits Of OM Chants: 'ओम'कार करणे आरोग्यासाठी कसे फायदेशीर ठरू शकते, याविषयी माहिती सांणारा व्हिडिओ अभिनेत्री भाग्यश्री हिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.(actress Bhagyashree explains benefits of doing OM chants)

health benefits of OM chants in marathi, actress bhagyashree explains benefits of doing om chants  | अभिनेत्री भाग्यश्री सांगतेय 'ओमकार' करण्याचे ४ महत्त्वाचे फायदे, अनेक आजारांवरचा अगदी सोपा उपाय...

अभिनेत्री भाग्यश्री सांगतेय 'ओमकार' करण्याचे ४ महत्त्वाचे फायदे, अनेक आजारांवरचा अगदी सोपा उपाय...

Highlightsभाग्यश्रीने शेअर केलेला व्हिडिओ पाहा आणि 'ओमकार' म्हणण्याचे महत्त्व समजावून घ्या.

अभिनेत्री भाग्यश्री सोशल मीडियावर नेहमीच ॲक्टीव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांना फिटनेसविषयी जागरुक करते, कधी एखादा व्यायाम करण्याचे महत्त्व समजावून सांगते. तर कधी एखादा शारिरीक त्रास कसा कमी करावा, याविषयीही टिप्स देते. तिने शेअर केलेल्या वेगवेगळ्या हेल्दी रेसिपीसुद्धा तिच्या चाहत्यांना खूप आवडतात. आता नुकताच तिने एक व्हिडिओ शेअर केला असून यामध्ये ओमकार करण्याचे फायदे समजावून सांगितले आहेत. प्रत्येक योगवर्गाची सुरुवातही ओमकार करून होते. अनेक शाळांमध्येही प्रार्थना सुरू होण्याच्या आधी मुलांकडून 'ओमकार' म्हणून घेतले जातात. पण त्याचे महत्त्व किंवा आरोग्याला होणारे लाभ याची बहुतांश लोकांना माहितीच नसते..(health benefits of OM chants) म्हणून कित्येक लोक ते गांभीर्याने घेत नाहीत. म्हणूनच आता भाग्यश्रीने शेअर केलेला व्हिडिओ पाहा आणि 'ओमकार' म्हणण्याचे महत्त्व समजावून घ्या..(actress Bhagyashree explains benefits of doing OM chants)

 

'ओमकार' करण्याचे महत्त्व

१. 'ओमकार' करताना आपण दिर्घ श्वास घेतो आणि हळूवारपणे श्वास सोडत तोंडाने ओमकार असा उच्चार करतो. आपण जेवढ्या संथपणे श्वास सोडत ओमकार म्हणू शकू त्याचा तेवढाच जास्त चांगला परिणाम आपल्या हृदयावर आणि फुफ्फुसांवर होत असतो.

एक्सपर्ट सांगतात शरीरातलं कॉपर कमी झाल्यामुळे कमी वयात केस पांढरे होतात! म्हणूनच 'हे' पदार्थ खा

२. 'ओमकार' केल्यानंतर आपल्या मानसिक ताण कमी होऊन रिलॅक्स होण्यासाठी खूप मदत होते. त्यामुळे जेव्हा गोंधळलेल्या मनस्थितीत असाल, एन्झायटीचा त्रास होत असेल किंवा खूप स्ट्रेसमध्ये असाल तेव्हा शक्यतो ओमकार म्हणून पाहा. मन शांत होण्यास मदत होईल.

 

३. वेगस नर्व्हचे कार्य अधिक चांगले होण्यासाठीही 'ओमकार' केल्याने फायदा होतो. फुफ्फुसे, लिव्हर, हृदय, पोट आणि आतडे यांच्या कार्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम वेगस नर्व्हचे असते. त्यामुळे आपोआपच वरील सर्व अवयवांनाही ओमकार केल्याने फायदा होतो.

बागेतल्या रोपांनाही प्यायला द्या साखर घातलेलं दूध! रोपं वाढतील जोमानं- बाग होईल हिरवीगार

४. त्याचप्रमाणे मज्जा संस्थेवरही ओमकार केल्याने खूप सकारात्मक परिणाम होतो. याचाच अर्थ असा की नियमित 'ओमकार' करणे आपल्या संपूर्ण शरीरासाठीच अतिशय फायद्याचे ठरते. 


 

Web Title: health benefits of OM chants in marathi, actress bhagyashree explains benefits of doing om chants 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.