टीव्ही स्टार आणि बिग बॉस १९ चा विजेता गौरव खन्ना हा आपल्या अभिनयामुळे कामयच प्रकाश झोतात असतो. त्यांच्या कामामुळे त्याचे चाहते देखील भरपूर आहेत. पण टीव्ही इंडस्ट्रीमध्ये असे फार कमी स्टार आहेत जे वयानुसार तंदुरुस्त आणि देखणे दिसतात.(Gaurav Khanna fitness) गौरव खन्ना वयाच्या ४३ व्या वर्षी देखील तिशीतला तरुण दिसतो. (Gaurav Khanna workout)गौरव खन्ना चार्मिंग स्माइल, शार्प लूक आणि शरीरयष्टीमुळेही ओळखला जातो. सेलिब्रिटी असल्यावर हे सगळं सहज शक्य होतं. तो त्याच्या फिटनेसची काळजी उत्तमरित्या घेतो.(celebrity fitness tips) वय वाढत असतानाही, त्याच्या एनर्जी आणि फिटनेसमध्ये तसूभरही कमतरता असल्याचे दिसून येत नाही. गौरव खन्ना फिट राहण्यासाठी काय करतो पाहूया.
गौरव खन्ना हा पुरेसा आहार खातो. मसालेदार, तेलकट किंवा जंक फूडऐवजी, त्याच्या आहारात प्रथिने, कडधान्य आणि सलाद भरपूर प्रमाणात असते. दिवसभरात तो चार ते पाच वेळा कमी प्रमाणात खातो. त्याच्या या हेल्दी खाण्यामुळे त्वचेला नैसर्गिक चमक मिळते.
तो जीममध्ये जाऊन फक्त हवे वर्कआउट करत नाही तर फंक्शनल ट्रेनिंगमुळे तो तंदुरुस्त आणि सक्रिय आहे. ज्यामुळे त्याला अॅथलेटिक शरीरयष्टी प्राप्त झाली. इतकेच नाही तर फिट राहण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची असते ती झोप. त्वचेला नैसर्गिक चमक मिळवण्यासाठी सोडियमचा वापर करतो. त्यात जास्त पाणी आणि निरोगी आहार खातो. ७ ते ८ तासांची पुरेशी झोप घेतल्यानंतर स्नायूंना पुनर्प्राप्ती वेगाने मिळते. तसेच टेस्टोस्टेरॉन वाढते आणि तणाव संप्रेरक कमी होतात.
फिटनेसच्या दिनचर्येतील सगळ्यात महत्त्वाचा भाग धूम्रपान टाळणे. धूम्रपान केल्यामुळे चयापचय कमकुवत होतो. त्वचेची चमक कमी होते. यामुळे वृद्धत्वाची लक्षणे दिसतात. अल्कोहलचे सेवन केल्याने शरीरात जळजळ वाढते. आपल्याला शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहणे जितके गरजेचे आहे, तितकेच मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहायला हवे. असे त्याचे मत आहे. कोणतेही जड डाएट्स, क्रॅश प्लान किंवा अनावश्यक सप्लिमेंट्सशिवाय आपण वाढत्या वयातही फिट राहू शकतो.
Web Summary : Big Boss winner Gaurav Khanna stays fit at 43 with a healthy diet, functional training, and sufficient sleep. He avoids junk food, prioritizes protein and salads, and skips smoking and excessive alcohol. Mental well-being is equally crucial for his fitness.
Web Summary : बिग बॉस विजेता गौरव खन्ना 43 साल की उम्र में स्वस्थ आहार, कार्यात्मक प्रशिक्षण और पर्याप्त नींद के साथ फिट रहते हैं। वह जंक फूड से बचते हैं, प्रोटीन और सलाद को प्राथमिकता देते हैं और धूम्रपान और अत्यधिक शराब से दूर रहते हैं। मानसिक कल्याण भी उनकी फिटनेस के लिए उतना ही महत्वपूर्ण है।