Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Fitness > रात्री जेवणानंतर लगेच चालायला गेल्यानं वजन पटकन घटतं? पाहा कसं-किती चालावं...

रात्री जेवणानंतर लगेच चालायला गेल्यानं वजन पटकन घटतं? पाहा कसं-किती चालावं...

Fitness Tips : रात्री जेवणानंतर कसं, कितीवेळ चालावं याबाबत तुम्हालाही प्रश्न असतील तर काही सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही वजन नियंत्रणात ठेवू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 15:59 IST2025-12-16T15:36:50+5:302025-12-16T15:59:31+5:30

Fitness Tips : रात्री जेवणानंतर कसं, कितीवेळ चालावं याबाबत तुम्हालाही प्रश्न असतील तर काही सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही वजन नियंत्रणात ठेवू शकता.

Fitness Tips Should You Walk Slow Or Fast After Dinner How To Walk After Dinner | रात्री जेवणानंतर लगेच चालायला गेल्यानं वजन पटकन घटतं? पाहा कसं-किती चालावं...

रात्री जेवणानंतर लगेच चालायला गेल्यानं वजन पटकन घटतं? पाहा कसं-किती चालावं...

फिट, निरोगी राहण्यासाठी चालणं उत्तम ठरतं असं सगळेजण म्हणतात पण नेमकं कधी चालावं, कसं चालावं याबाबत कल्पना नसते.  काही लोकांना असं वाटतं की वेगानं चाल्ल्यानं वजन कमी होतं. तर काहींना वाटतं की यामुळे पचनाच्या समस्या होऊ शकतात. रात्री जेवणानंतर कसं, कितीवेळ चालावं याबाबत तुम्हालाही प्रश्न असतील तर काही सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही वजन नियंत्रणात ठेवू शकता.  (Should You Walk Slow Or Fast After Dinner)

रात्रीचं जेवण हे दिवसभरातील शेवटचं जेवण असतं. रात्री जेवल्यानंतर तुम्ही थेट झोपायला गेलात तर पचनाच्या समस्या वाढू शकतात. खाल्ल्यानं हलकी, फुलकी एक्टिव्हीटी केल्यामुळे पचनाच्या समस्या उद्भवत नाहीत. गॅस, एसिडिटीची समस्या  कमी होते. ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहण्यासही मदत होते.  (How To Walk After Dinner)

जेवल्यानंतर लगेच चालल्यामुळे अनेक प्रकारे नुकसान होऊ शकते. यामुळे पोटदुखी, गॅस, पोट जड वाटणं अशा समस्या उद्भवतात. कारण शरीर पचनक्रियेत व्यस्त असतं. याऊलट जेवल्यानंतर 10 ते 15 मिनिटं थांबून नंतर हळूहळू चालल्ल्यानं  शरीर अन्न पचण्यास अधिक मदत  करते. एक्सपर्ट्सच्यामते रात्री जेवल्यानंतर हळू हळू चालणं अधिक फायदेशीर ठरतं. 

जेवल्यानंतर लगेच चालणं योग्य मानलं जातं. तुम्ही रात्रीच्या जेवणानंतर 10 मिनिटांनी चालू शकता. ज्यामुळे शरीराला पचनक्रिया सुरू करण्यास वेळ मिळतो. जर तुम्ही हलका आहार घेतला असेल तर थोड्या वेळात लगेचच वॉक सुरू करू शकता. पण जड आहार घेतल्यानंतर लगेचच चालू नका. 

मांडी घालून जेवावं असं का म्हणतात? ७ कारणं, नेहमी मांडी घालून जेवायला बसा

हळू चालल्यानं शरीराला बरेच फायदे मिळतात. ज्यामुळे अन्न सहज पचते. पोट फुगण्याची  समस्या कमी होते, झोपही चांगली  लागते.  याव्यतिरिक्त रात्रीच्या जेवणानंतर कमी वेगानं चालल्यास ताण-तणाव कमी होतो. दिवसभराचा थकवा दूर होतो. ज्यांना गॅस, एसिडिटीची समस्या उद्भवते त्यांच्यासाठी  चालणं खूपच फायदेशीर ठरतं.

भात भरपूर खाऊनही साऊथ इंडियन माणसांचं वजन भरमसाठ का वाढत नाही? पाहा भात शिजवण्याची पारंपरिक पद्धत..

जेवणानंतर लगेच झोपणं किंवा पडणं, वेगानं चालणं, खूप जड व्यायाम करणं, मोबाईल किंवा टिव्ही समोर बसणं टाळायला हवं. कारण  यामुळे पचनक्रिया बिघडू शकते. तब्येत चांगली ठेवण्यासाठी १५ मिनिटांच्या स्लो वॉकचा आपल्या रुटीनमध्ये समावेश करा.

Web Title : रात के खाने के बाद टहलना: क्या यह तेजी से वजन घटाने में मदद करता है?

Web Summary : रात के खाने के बाद टहलना पाचन में सहायता करता है और ब्लड शुगर को नियंत्रित करने में मदद करता है। तुरंत तेज चलने से बचें; 10-15 मिनट प्रतीक्षा करें और धीरे-धीरे चलें। यह गैस, सूजन को रोकता है, बेहतर नींद को बढ़ावा देता है और तनाव को कम करता है। बेहतर पाचन के लिए भोजन के बाद भारी व्यायाम या स्क्रीन टाइम से बचें।

Web Title : Walking after dinner: Does it help in quick weight loss?

Web Summary : Walking after dinner aids digestion and helps control blood sugar. Avoid immediate brisk walking; wait 10-15 minutes and walk slowly. This prevents gas, bloating, and promotes better sleep and reduces stress. Avoid heavy exercise or screen time post-meal for optimal digestion.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.