Join us

दीपिका पादुकोणची ४ फेवरिट आसनं, जी तिला ठेवतात फिट! कर के देखो..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 19:25 IST

बॉलीवुडमधील फिटनेस फ्रिक अभिनेत्रींच्या रांगेत येणारी अभिनेत्री म्हणून दीपिका पादुकोण ओळखली जाते. तिच्या फिटनेस टिप्स अनेकींसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरतात. दीपिकाने नुकतेच इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ती नियमितपणे करत असलेल्या ४ योगासनांची माहिती दिली आहे. 

ठळक मुद्देया चार योगासनांचे फायदे जर लक्षात घेतले, तर दीपिका एवढी फिट आणि सुंदर कशी, ते आपोआपच लक्षात येते. 

स्वत:च्या फिटनेसबाबत दीपिका अतिशय जागरूक असते. फिटनेस मेंटेन ठेवण्यासाठी ती दररोज कार्डियो एक्सरसाईज तर करतेच पण पिलेट्स एक्सरसाईजही आवर्जून करते. मन शांत ठेवण्यासाठी दीपिका  दररोज योगा करण्याला प्राधान्य देते. हे तिने नुकत्याच शेअर केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टवरून दिसून येते. 

 

सोशल मिडियावर आणखी उत्तम आणि दर्जेदार पोस्ट टाकत जाईल, असे काही दिवसांपुर्वीच दीपिकाने तिच्या चाहत्यांना सांगितले होते. त्यानुसार तिने आता फिटनेस संदर्भातला एक व्हिडियो शेअर केला आहे. या व्हिडियोमध्ये तिच्या आवडीची तीन योगासने  तिने सांगितली असून कोणते  आसन कधी करावे, याबाबतही तिने माहिती दिली आहे. I love…my yoga mat... असं देखील तिने हा व्हिडियो शेअर करताना सांगितले आहे. 

 

दीपिकाने एकूण चार योगासने या व्हिडियोमध्ये दाखविली आहेत. यामध्ये सगळ्यात पहिले आहे कर्णपिडासन. हे आसन दिवसाच्या सुरूवातीला करावे असे तिने सांगितले आहे. तर दुपारच्या वेळी हलासन करावे, संध्याकाळी सर्वांगासन करावे तर रात्री चक्रासन करावे, असे दिपिकाने या व्हिडियोद्वारे सुचविले आहे. या चार योगासनांचे फायदे जर लक्षात घेतले, तर दीपिका एवढी फिट आणि सुंदर कशी, ते आपोआपच लक्षात येते. 

 

या आसनांचे फायदे कोणते१. कर्णपिडासन- पचन संस्थेच्या अडचणी दूर करण्यासाठी कर्णपिडासन केले जाते.२. हलासन- हलासन केल्यामुळे मान, पाठ, खांदे आणि पोटांच्या स्नायुंचा व्यायाम होतो.३. सर्वांगासन- हार्मोनल इम्बॅलेन्स दूर करण्यासाठी सर्वांगासन हे सर्वोत्तम मानले जाते. यामुळे मेंदूकडे शुद्ध रक्ताचा पुरवठा अधिक वेगवान होतो. ४. चक्रासन- पोटाची चरबी कमी करण्यासोबतच सौंदर्याच्या दृष्टीनेही चक्रासनाचे अनेक फायदे आहेत. 

टॅग्स :फिटनेस टिप्सदीपिका पादुकोणबॉलिवूडयोग