Join us

सगळे म्हणतात रोज चाला, भरपूर चाला! पण ‘किती’ चालणं आरोग्यासाठी पुरेसं, तज्ज्ञ सांगतात-रोज किती चालावं..

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 16:13 IST

Fitness Tips : तुम्ही कधी विचार केलात का की, ही 10,000 पावलांची संकल्पना आली कुठून? आणि ती खरंच आवश्यक आहे का? अलीकडेच करण्यात आलेल्या एका नव्या अभ्यासाने या जुन्या समजुतीला आव्हान दिलं आहे.

Fitness Tips : फिटनेसच्या दुनियेत रोज 10,000 पावलं चालणं हा एक फायदेशीर नियम मानला जातो. फिटनेस बँड, स्मार्टवॉच आणि मोबाईल अ‍ॅप्स सतत हे लक्ष्य पूर्ण करण्याची आठवण करून देतात. पण तुम्ही कधी विचार केलात का की, ही 10,000 पावलांची संकल्पना आली कुठून? आणि ती खरंच आवश्यक आहे का? अलीकडेच करण्यात आलेल्या एका नव्या अभ्यासाने या जुन्या समजुतीला आव्हान दिलं आहे.

ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिनमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, खासकरून ज्येष्ठ नागरिकांसाठी दररोज थोडं चालणंही आयुष्य वाढवू शकतं आणि हृदयविकाराचा धोका कमी करू शकतं.

लांब आयुष्यासाठी किती चालणं पुरेसं आहे?

अमेरिकेतील ज्येष्ठ महिलांवर केलेल्या संशोधनात आढळलं की, ज्या महिला आठवड्यात फक्त 1-2 दिवस 4,000 पावलं (सुमारे 30-40 मिनिटांची चाल) चालल्या, त्यांच्यात मृत्यूचा धोका 26% ने कमी झाला आणि हृदयविकाराचा धोका 27% ने कमी झाला. ज्या महिलांनी आठवड्यात 3 किंवा अधिक दिवस हेच पावलांचं लक्ष्य गाठलं, त्यांच्यात मृत्यूचा धोका 40% ने कमी, आणि हृदयविकाराचा धोका 27% ने कमी झाला. रोज 7,000 पावलं चालल्याने थोडा जास्त फायदा दिसला, पण 4,000 पावलांच्या तुलनेत फार मोठा फरक नव्हता.

महत्त्वाचं काय?

संशोधकांच्या मते, खरा फरक पडतो तो या गोष्टीने की तुम्ही एका दिवसात किती हालचाल करता ना की, दररोज 10,000 पावलं पूर्ण केलीत का नाही. म्हणजेच, नियमित हालचाल जरी थोड्या प्रमाणात असली तरी तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.

मुख्य मुद्दा

दररोज 10,000 पावलं चालणं आवश्यक नाही. आठवड्यात काही दिवस 4,000 पावलं चालणंही हृदयासाठी आणि आयुष्यासाठी लाभदायक आहे. सगळं किंवा काहीच नाही असा नियम आरोग्यासाठी लागू होत नाही. थोडं चालणंही मोठा बदल घडवू शकतं.

English
हिंदी सारांश
Web Title : How much walking is enough for health? Experts reveal daily steps.

Web Summary : Daily 10,000 steps isn't essential. Just 4,000 steps, a few days weekly, boosts heart health, extending lifespan. Regular, even minimal, activity matters.
टॅग्स :फिटनेस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य