Lokmat Sakhi >Fitness > फक्त १५ दिवस ३ गोष्टी करा कंबरेचा घेर व्हायला लागेल झरझर कमी, सगळे विचारतील सिक्रेट काय

फक्त १५ दिवस ३ गोष्टी करा कंबरेचा घेर व्हायला लागेल झरझर कमी, सगळे विचारतील सिक्रेट काय

How to reduce Waist Fat :  वेगवेगळ्या एक्सरसाईज करून लठ्ठपणा कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. पण नेमका कोणता व्यायाम करून बारीक होता येईल हे अनेकांना माहीत नसतं. आपलं हेच काम आम्ही सोपं करणार आहोत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 11:36 IST2025-08-02T11:14:39+5:302025-08-02T11:36:08+5:30

How to reduce Waist Fat :  वेगवेगळ्या एक्सरसाईज करून लठ्ठपणा कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. पण नेमका कोणता व्यायाम करून बारीक होता येईल हे अनेकांना माहीत नसतं. आपलं हेच काम आम्ही सोपं करणार आहोत.

Expert suggested 3 exercises to reduce waist size and belly fat | फक्त १५ दिवस ३ गोष्टी करा कंबरेचा घेर व्हायला लागेल झरझर कमी, सगळे विचारतील सिक्रेट काय

फक्त १५ दिवस ३ गोष्टी करा कंबरेचा घेर व्हायला लागेल झरझर कमी, सगळे विचारतील सिक्रेट काय

How to reduce Waist Fat :  आपलेच दात आणि आपलेच ओठ...अशी एक म्हण आहे. याचा अर्थ असा होतो की, आपल्याच काही चुकांमुळे आपलंच काहीतरी काम बिघडणं किंवा वाईट होणं. ही म्हण आजकाल गंभीर होत चाललेल्या वजन वाढीच्या समस्येला तंतोतंत फिट बसते. कारण आजकालची चुकीची लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी या दोन मुख्य कारणांनी लोकांमध्ये लठ्ठपणा (Obesity) वाढत आहे. लठ्ठपणा वाढत असल्याची चिंता तर लोकांना असतेच, पण जिभेचे चोचले पुरवण्यावर आवर घालणं काही कुणी फार गंभीरतेने घेताना दिसत नाही. अशात वेगवेगळ्या एक्सरसाईज करून लठ्ठपणा कमी (Weight Loss) करण्याचा प्रयत्न केला जातो. पण नेमका कोणता व्यायाम करून बारीक होता येईल हे अनेकांना माहीत नसतं. आपलं हेच काम आम्ही सोपं करणार आहोत.

NBT च्या एका रिपोर्टमध्ये, फिटनेस एक्सपर्ट शिवा पांडे यांनी सांगितलं की, जर आपल्याला लठ्ठपणी कमी करायचा असेल, कंबर स्लीम करायची असेल तर तीन अशा एक्सरसाईज आहेत, ज्या अधिक फायदेशीर ठरतात. या एक्सरसाईजच्या माध्यमातून टोन्ड बॉडी आणि बारीक कंबरेचं तुमचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं.

एक्सपर्टचं मत आहे की, केवळ १५ दिवसात योग्य डाएट आणि त्यांनी सांगितलेल्या तीन एक्सरसाईज केल्यास फरक दिसून येईल. या एक्सरसाईजनं कोर मजबूत होतो आणि बॉडीला शेप मिळतो.

क्रंचेस

क्रंचेस पोटावरील चरबी करण्यासाठी सगळ्यात बेस्ट एक्सरसाईज मानला जातो. या एक्सरसाईजने अॅब्स आणि कोर मसल्स मजबूत होतात. एक्सपर्टनुसार, रोज तीन तीन सेट १५ वेळा करा. यानं कंबरेवरील चरबी कमी होऊन कंबर स्लीम होऊ शकते.

माउंटेन क्लायंबर

चरबी कमी करण्यासाठी हाय इन्टेसिटी वर्कआउट करायचं असेल तर माउंटेन क्लायंबर बेस्ट आहे. हा एक्सरसाईज करून शरीरातील चरबी वेगानं कमी होते. सोबतच कार्डिओ मसल्स मजबूत होतात. रोज हा एक्सरसाईज केला तर मांड्या आणि हिप्सवरील चरबी कमी होते.

प्लॅंक

चरबी आणि वजन कमी करण्यासाठी प्लॅंक एक बेस्ट पर्याय आहे. हा एक्सरसाईज करून कंबरेच्या आजूबाजूची चरबी कमी होते आणि कोर स्ट्रेंथ वाढते. रोज प्लॅंक केल्यास काही दिवसात फरक दिसून येईल.

वरील तीन एक्सरसाईजसोबत पौष्टिक आणि संतुलित आहार खूप महत्वाचा आहे. आहारा फायबर, प्रोटीन, व्हिटामिन्स, मिनरल्स यांचा समावेश असावा. हिरव्या पालेभाज्या, वेगवेगळी फळं खावीत. तसेच भरपूर पाणी पिणं खूप महत्वाचं आहे.

एक्सपर्ट सांगतात की, एक्सरसाईज करण्याची योग्य वेळ सकाळी उपाशीपोटी आहे. जर सकाळी शक्य नसेल तर सायंकाळी करू शकता. रोज किमान ४० ते ४५ मिनिटं एक्सरसाईज करणं खूप महत्वाचं ठरतं. हे सगळं करून १५ दिवसात काहीना काही फरक नक्कीच दिसेल, असं एक्सपर्ट सांगतात.

Web Title: Expert suggested 3 exercises to reduce waist size and belly fat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.