Join us  

Wall exercises : घरबसल्या भितींच्या मदतीनं 'हे' ३ व्यायाम  करा; जीमला न जाताच मेंटेन राहिल फिटनेस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 4:10 PM

Easy wall exercises : सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर यास्मीन कराचीवाला अनेकदा तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर असेच काही व्यायाम प्रकार शेअर करते. 

ठळक मुद्दे घरी काही व्यायाम करण्याचं साहित्य नसेल तर फक्त भिंतीचा आधार घेऊन तुम्ही चांगला व्यायाम करू शकता. सध्या वर्क फ्रॉम होममुळे जास्तीत जास्त लोक आपला वेळ घरीच घालवतात. कोरोनाच्या भीतीनं जीमला जाण्याची इच्छा होत नाही. कारण तिथे खूपच गर्दी असते.

दीर्घकाळ फिट अॅण्ड फाईन दिसण्यासाठी घरबसल्या  अनेक प्रकारे तुम्ही व्यायाम करू शकता. व्यायाम शाळेतील मशिन्स तुमच्या घरी असो वा नसो घरच्याघरी उत्तम व्यायाम करता येऊ शकतो.  सध्या वर्क फ्रॉम होममुळे जास्तीत जास्त लोक आपला वेळ घरीच घालवतात. कोरोनाच्या भीतीनं जीमला जाण्याची इच्छा होत नाही. कारण तिथे खूपच गर्दी असते. घरी काही व्यायाम करण्याचं साहित्य नसेल तर फक्त भिंतीचा आधार घेऊन तुम्ही चांगला व्यायाम करू शकता. 

सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर यास्मीन कराचीवाला अनेकदा तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर असेच काही व्यायाम प्रकार शेअर करते. त्यासाठी जिममध्ये जाण्याचीही गरज नाही. तर आज आम्ही तुम्हाला अशाच व्यायामाची एक पद्धत सांगणार आहोत, ज्यामध्ये यास्मीन कराचीवालाने भिंतीद्वारे व्यायाम करण्याचे अनेक मार्ग सांगितले आहेत. 

१)  पुशअप्स (wall tricep pushes)

भिंतीच्या मदतीने आपण करु शकता असा पहिला व्यायाम म्हणजे वॉल ट्रायसेप पुशअप्स. आपल्याला खांद्यावरची चरबी किंवा हातांखाली लटकलेलं मासं याची अडचण होत असेल तर वॉल ट्रायसेप पुश करून तुम्ही फॅट लॉस करू शकता. या व्यायाम प्रकारानं मसल टोन होण्यास मदत होईल. 

असा करा व्यायाम

या व्यायामासाठी, आपल्याला भिंतीपासून हाताच्या अंतरावर उभे रहावे लागेल आणि नंतर भिंतीच्या दिशेने हात वाकवा. आपल्या शरीराला मागील बाजूस ढकला. आपल्याला आपले गुडघे मागे वाकणे आवश्यक नाही. जर तुम्हाला अधिक इफेक्टिव्हरित्या हा व्यायाम करायचा असेल तर तुम्ही भितींपासून लांब उभे राहू शकता.

२) प्लँक वॉल वॉक (Plank wall walk)

या व्यायामासाठी, भिंतीपासून थोड्या अंतरावर प्लँकची स्थिती तयार करा. ही सरळ प्लँकची स्थिती असेल ज्यामध्ये हात सरळ राहतील. एक हात भिंतीवर ठेवा. त्यानंतर दुसरा हात भिंतीवर ठेवा. यानंतर, एकामागून एक खाली आपले हात ठेवा. हा व्यायाम 15 वेळा पुन्हा करा. हे आपले हात मजबूत करेल तसंच स्नायू मजबूत होण्यासही मदत होईल. 

३) टेबल टॉप वॉल

हा थोडासा कठीण व्यायाम आहे, परंतु आपण आपल्या पाठीला टोन करू इच्छित असल्यास हा छान व्यायाम आहे. याशिवाय हातांच्या स्नायूंसाठीही हा उत्तम व्यायाम आहे. त्यासाठी भिंतीपासून काही अंतरावर आपल्या गुडघ्यावर खाली जा. यानंतर, भिंतीवर एक-एक पाय ठेवत जा. आपल्याला 90 डिग्री कोन बनवावा लागेल. ही स्थिती सुमारे 30 सेकंद धरून ठेवा.

 हे तिन्ही व्यायाम खूप सोपे आहेत, परंतु आपल्याला हे थोडे अवघड वाटत असल्यास, थोडा विश्रांती घेऊन ते करा.  आपल्याला हाडांशी संबंधित कोणतीही समस्या असेल किंवा पाठदुखीचा त्रास असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच हे व्यायाम प्रकार करण्याचा प्रयत्न करा.

टॅग्स :फिटनेस टिप्सवेट लॉस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्स