Lokmat Sakhi >Fitness > चालाल तर जगाल! डॉक्टर सांगतात, शुगर आणि वेटलॉससाठी किती वेळ चालावं? चालण्याचे मिळतील दुप्पट फायदे...

चालाल तर जगाल! डॉक्टर सांगतात, शुगर आणि वेटलॉससाठी किती वेळ चालावं? चालण्याचे मिळतील दुप्पट फायदे...

Doctor Tells For How Many Minutes You Should Walk Daily For Good Health : Walking for good health : Walking for health : This is how much you should be walking daily, according to a doctor : शारीरिक समस्यांनुसार कोणी नेमकं किती वेळ चालावं ते पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2025 13:54 IST2025-05-13T15:30:46+5:302025-05-14T13:54:56+5:30

Doctor Tells For How Many Minutes You Should Walk Daily For Good Health : Walking for good health : Walking for health : This is how much you should be walking daily, according to a doctor : शारीरिक समस्यांनुसार कोणी नेमकं किती वेळ चालावं ते पाहा...

Doctor Tells For How Many Minutes You Should Walk Daily For Good Health Walking for good health Walking for health This is how much you should be walking daily, according to a doctor | चालाल तर जगाल! डॉक्टर सांगतात, शुगर आणि वेटलॉससाठी किती वेळ चालावं? चालण्याचे मिळतील दुप्पट फायदे...

चालाल तर जगाल! डॉक्टर सांगतात, शुगर आणि वेटलॉससाठी किती वेळ चालावं? चालण्याचे मिळतील दुप्पट फायदे...

 स्वतःला मेंटेंड ठेवण्यासाठी किंवा एक्सरसाइज करायला फारसा वेळ नसेल तर आपण किमान वॉकिंग तरी करतोच. वॉकिंग करणे हे एखाद्या थेरपीसारखंच असतं. मात्र, चालण्याचे फायदे (Walking Benefits) फक्त एवढ्यावरच मर्यादित नाहीत. दररोज योग्य पद्धतीने आणि योग्य कालावधीसाठी चालल्यास (Doctor Tells For How Many Minutes You Should Walk Daily For Good Health) आरोग्यावर अनेक प्रकारे सकारात्मक परिणाम होतो. हाय ब्लड शुगरपासून ते हायपर टेंशन करणाऱ्या हार्मोन्सपर्यंत सर्व काही नियंत्रित करण्यासाठी चालणे उपयुक्त ठरते. याशिवाय, वजन कमी करण्यात (Weight Loss) देखील वॉकिंग प्रभावी ठरते(This is how much you should be walking daily, according to a doctor).

फक्त दररोज काही मिनिटं चालणं तुमचं आरोग्य सुधारू शकतं, तणाव कमी करू शकतं,पचन सुधारायचं असेल, साखर नियंत्रणात ठेवायची असेल, की वजन कमी करायचं असेल – चालणं हा सर्वात नैसर्गिक आणि उत्तम उपाय आहे. याच संदर्भात डॉ. मानव वोरा यांनी माहिती दिली आहे. डॉ. मानव हे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत. त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करत दररोज किती वेळ चालल्यास कोणत्या समस्यांपासून आराम मिळतो, याविषयी सांगितले आहे. 

रोज किती वेळ चालण्याने नेमके कोणते फायदे होतात, ते पाहूयात... 

१. डॉ. मानव यांच्या मते, दररोज फक्त १ मिनिट चालल्यास शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. 
२. दररोज ५ मिनिटं चालल्यास मन प्रसन्न होतं, तसेच आपला मूड सुधारण्यास मदत होते. 
३. जर दररोज १० मिनिटं चाललं, तर आपल्या शरीरातील स्ट्रेस हार्मोन कॉर्टिसोलचं प्रमाण कमी होऊ लागतं. 
४. डॉक्टर सांगतात की १५ मिनिटं चालल्याने रक्तातील साखर (ब्लड शुगर) कमी होण्यास मदत होते.
५. ३० मिनिटं चालल्यास शरीरातील चरबी (बॉडी फॅट) कमी होऊ लागते, त्यामुळे वजन घटवण्यासाठी रोज अर्धा तास चालणं फायदेशीर ठरू शकतं.

वयाची पन्नाशी उलटली तरी मंदिरा बेदी दिसते तरुण! रोज न चुकता करते २ गोष्टी - पाहा तिचे फिटनेस रुटीन...

स्वतःला लावलेल्या 'या' ६ सवयींमुळेच रेखाचं सौंदर्य आहे खास! वयाच्या सत्तरीतही सुंदरच...

६. रोज ४५ मिनिटं चालल्यास सतत विचार करणे म्हणजेच (ओव्हरथिंकिंग) कमी होण्यास मदत होते.
७. जर तुम्ही ६० मिनिटं म्हणजेच एक तास चालला, तर शरीरात डोपामिनचं प्रमाण वाढतं. डोपामिन हा “फील गुड हार्मोन” असून, यामुळे मन प्रसन्न आणि सकारात्मक राहते.

वजन कमी करण्यासाठी चालण्याची योग्य पद्धत... 

१. वजन कमी करण्यासाठी चालणं (वॉकिंग) हे एक प्रभावी आणि सोपं माध्यम आहे, मात्र ते योग्य पद्धतीने केल्यासच त्याचा चांगला परिणाम दिसतो. वॉकसाठी बाहेर पडत असाल, तर शरीर हायड्रेटेड राहावं यासाठी पाण्याची बाटली सोबत ठेवा.

२. पार्कमध्ये चालायला जात असाल, तर चांगले चालण्यायोग्य स्पोर्ट्स शूज घालून जा – यामुळे चालण्याची गती सुधारते आणि पायांवर ताण कमी येतो.

३. फक्त एकाच प्रकारे चालण्याऐवजी, चालण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करावा. काही वेळ सामान्य गतीने चालावं, मग थोडी ब्रिस्क वॉक (पटापट चालणं) करा आणि थोडा वेळ पावर वॉकिंग देखील अवश्य करा – यामुळे शरीराला विविध प्रकारचा व्यायाम मिळतो आणि परिणाम अधिक चांगले दिसतात.

जपानी लोक या ८ सवयींमुळे राहतात कायम सडपातळ! काय आहे त्यांचा फिटनेस फंडा, पाहा...

४. फक्त सरळ सपाट रस्त्यांवर न चालता शक्य असल्यास थोड्या चढ-उतार असलेल्या रस्त्यावर चालण्याचाही प्रयत्न करा – यामुळे अधिक कॅलरी खर्च होतात.

५. वेळ मिळाल्यास, जेवणानंतर किमान २० मिनिटं चालण्याची सवय लावा. यामुळे पचन सुधारतं आणि वजन कमी होण्याची प्रक्रिया वेगाने होते.

६. वॉकिंग हा आपल्या जीवनशैलीचा (लाइफस्टाइलचा) भाग बनवण्यासाठी, ऑफिसजवळ थेट गाडीने न जाता थोडं लांब उतरून चालत जाणं, अशा छोट्या सवयी अंगीकारा – यामुळे तुमचं आरोग्य सुधारेल आणि वजनावरही नियंत्रण राहील.


Web Title: Doctor Tells For How Many Minutes You Should Walk Daily For Good Health Walking for good health Walking for health This is how much you should be walking daily, according to a doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.