गृहिणींच किचनमधील काम म्हटलं की, बहुतांश वेळा उभं राहूनच काम केलं जात. स्वयंपाक तयार करण्यापासून ते भांडी घासण्यापर्यंत सगळी काम करण्यासाठी किचनमध्ये उभं (Correct posture when washing dishes in the sink) राहावंच लागत. यामुळेच किचनमध्ये सतत उभ्याने काम केल्यामुळे, अनेक गृहिणींना पाय दुखणे, टाच दुखणे, पाठदुखी यांसारख्या समस्या सतावतात. काहीवेळा तर या लहान - सहन समस्यांकडे वेळीच लक्ष दिले नाही (Smart Tips for Washing Dishes with Proper Posture) तर त्याचे रुपांतर पुढे जाऊन मोठ्या गंभीर आजारात (Here’s how I maintain a good posture while washing utensils) होऊ शकते. घरातील गृहिणी दिवसभर घरातील अनेक काम करत असतात, या कामांचा प्रभाव त्यांच्या आरोग्यावर कमी - अधिक प्रमाणांत होतोच(Tips for Maintaining Proper Posture While Washing Dishes).
विशेषतः स्वयंपाकघरात भांडी घासण्यासारखी कामं करताना महिलांना तासंतास उभं राहावं लागतं. यामुळे पाठदुखी, पाय दुखणे, तसेच कंबरदुखी यासारख्या समस्या उद्भवतात. ही वेदना केवळ शारीरिक थकवा देत नाही, तर मानसिकरीत्या देखील त्रासदायक ठरते. या सारख्या दुखण्यावर आपण अनेक उपाय करतो खरे परंतु, त्याचा फरक हा तात्पुरता दिसून येतो. यासाठीच, किचनमध्ये काम करताना जर महिलांनी उभं राहून काम करताना उभं राहण्याची योग्य पद्धत फॉलो केली तर अनेक समस्या चुटकीसरशी दूर होऊ शकतात. आपण भांडी घासताना किंवा इतर घरकाम करताना पाय, टाचा दुखू नये म्हणून उभं राहण्याच्या तीन सोप्या पद्धती कोणत्या आहेत ते पाहूयात.
घरामधील कामं ही प्रत्येक गृहिणीच्या जीवनाचा अविभाज्य भाग असतात. विशेषतः स्वयंपाकघरातील कामं जसे की, भांडी घासणं हे अत्यंत वेळखाऊ आणि मेहनतीचं काम आहे. दिवसातून कधी कधी दोन-तीन वेळा भांडी घासत बसावं लागतं आणि ते करताना तासंतास एका जागी उभं राहावं लागतं. अशावेळी पाठदुखी, पाय दुखणे, गुडघ्यांवर ताण येणे, अशा अनेक शारीरिक तक्रारी निर्माण होतात. यासाठीच, या समस्या होऊ नये म्हणून manjumittal.homehacks या इंस्टाग्रामवरील अकाउंटवरुन किचनमध्ये काम करताना उभं राहण्याच्या दोन पद्धती कोणत्या याबद्दल अधिक माहिती दिली आहे.
१. दोन पायांत अंतर ठेवणे :- किचनमध्ये उभं राहून काम करताना आपण शक्यतो नेहमीप्रमाणे दोन पाय जवळ ठेवूनच उभे राहतो. परंतु अशा प्रकारे उभे राहिल्याने आपले पाय, स्नायू आणि पाठीच्या कण्यावर ताण येतो. यासाठीच अशा पद्धतीने सावधान स्थितीत दोन्ही पाय जवळ ठेवून उभे राहण्यापेक्षा दोन पायांत थोडे अंतर ठेवून विश्राम स्थितीत उभे राहावे. अशा पद्धतीने दोन पायांत अंतर ठेवून उभे राहिल्याने पाठीच्या कण्यावर ताण येत नाही, परिणामी पाठदुखी सारख्या समस्या त्रास देत नाहीत. यामुळे शरीराचा समतोल राखला जातो, आणि दीर्घकाळ उभं राहिलं तरी थकवा येत नाही, आणि पाय दुखणे, टाच दुखणे, पाठदुखी यांसारख्या समस्या सतावत नाहीत.
२. गुडघ्यावर तळपाय ठेवून उभे राहावे :- या पद्धतीत उभे राहताना उजवा पाय ताठ ठेवून डाव्या पायाचा तळपाय उचलून उजव्या पायाच्या गुडघ्यावर ठेवून उभे राहावे. अशा पद्धतीने उभे राहताना किचन ओट्याचा आधार घेऊन उभे राहावे. अशा स्थितीत उभे राहिल्याने आपला पाठीचा कणा ताठ आणि सरळ रेषेत राहिल्याने पाठदुखी सारख्या समस्या येत नाहीत.
जपानी लोक या ८ सवयींमुळे राहतात कायम सडपातळ! काय आहे त्यांचा फिटनेस फंडा, पाहा...
३. एक पाय हलक्या उंचीवर ठेवावा :- जर किचनमध्ये बराच वेळ एका जागी उभं राहायचं असेल, तर एका पायाखाली लहानसा स्टूल (फूटरेस्ट) किंवा दगड ठेवावा. काही वेळांनी पायांची अदलाबदल करावी म्हणजे एकदा डावा, मग उजवा पाय स्टूलवर ठेवावा. हा उपाय केल्यामुळे कंबरेवर येणारा ताण कमी होतो आणि रक्ताभिसरण सुधारतं. या उपायामुळे कमरेवरील ताण आणि थकवा कमी होतो तसेच पायदुखी, पाठदुखी यांसारख्या समस्येपासून आराम मिळतो.
कोमट पाण्यांत मिसळा 'या' तेलाचे फक्त २ थेंब, बेली फॅट होईल कमी, डॉक्टर सांगतात...
अशाप्रकारे आपण या ३ पद्धतींनी उभे राहू शकता. अशा पद्धतीने उभे राहून किचनमधील काम तासंतास केली तरी देखील पाय दुखणार नाहीत.