>फिटनेस > Coronavirus : छातीतील वेदना कोरोना संक्रमणामुळे की इतर कारणांमुळे असं ओळखा; वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Coronavirus : छातीतील वेदना कोरोना संक्रमणामुळे की इतर कारणांमुळे असं ओळखा; वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Coronavirus Chest pain : कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे लोकांच्या छातीत वेदना जाणवतात. या वेदना कोरोना संक्रमणामुळे की अन्य कारणांमुळे आहेत हे समजणं कठीण होतं. 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 12:07 PM2021-07-18T12:07:30+5:302021-07-21T15:19:08+5:30

Coronavirus Chest pain : कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे लोकांच्या छातीत वेदना जाणवतात. या वेदना कोरोना संक्रमणामुळे की अन्य कारणांमुळे आहेत हे समजणं कठीण होतं. 

Coronavirus Chest pain : How to know if chest pain is caused by anxiety or covid-19 how to differentiate | Coronavirus : छातीतील वेदना कोरोना संक्रमणामुळे की इतर कारणांमुळे असं ओळखा; वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Coronavirus : छातीतील वेदना कोरोना संक्रमणामुळे की इतर कारणांमुळे असं ओळखा; वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Next

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संक्रमित लोकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं पाहायला मिळत आहेत. श्वास घ्यायला त्रास होणं, छातीतील वेदना, वास न येणं, चव न समजणं याशिवाय शरीरातील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे लोकांना अनेक श्वसनाच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक लक्षणं ही संक्रमणातून बाहेर आल्यानंतरही अनेक महिन्यांपर्यंत दिसून येत आहेत. याच कारणांमुळे लोकांच्या मनात संभ्रमाचं वातावरण आहे. त्यापैकीच एक समस्या म्हणजे छातीत वेदना होणं. कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे लोकांच्या छातीत वेदना जाणवतात. या वेदना कोरोना संक्रमणामुळे की अन्य कारणांमुळे आहेत हे समजणं कठीण होतं. 

छातीत वेदना का होतात?

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार छातीत वेदना होण्याची अनेक कारणं असू शकतात. हृदयात सूज येणं किंवा अन्य समस्या छातीतील वेदनाचे कारण ठरू शकतात. हृदयातील मासपेशींमध्ये रक्त आणि ऑक्सिजनची कमतरता असल्यामुळे छातीतील वेदना जाणवतात. एजनायना नावाच्या या समस्येमुळे छातीवर जास्त दबाव पडून अस्वस्थता वाटते. अशा स्थितीत त्वरीत डॉक्टरांच्या सल्ल्यानं उपचार सुरू करायला हवेत. 

कोरोना संक्रमणामुळे छातीत वेदना होतात?

आरोग्य तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या  लाटेदरम्यान छातीतील वेदनांचा सामना करावा लागू शकतो. डॉक्टर सांगतात की, कोरोना व्हायरस श्वसन प्रणालीसोबतच शरीराच्या अन्य अवयवांवरही गंभीर परिणाम करतो त्यामुळे नुकसान होऊ शकतं. कोरोनाच्या म्यूटेट वेरिएंटमुळे विविध भागांमध्ये जळजळ होते, ज्यामुळे स्नायू संकुचित होऊ शकतात.

त्याचप्रमाणे कोरोना संसर्गामुळे छातीत सूज आणि वेदना होत आहे. कोविड -१९ मुळे न्यूमोनिया देखील तीव्र संसर्ग झालेल्या रूग्णांमध्ये दिसून आला आहे, जो फुफ्फुसातील जळजळ आणखी वाढवतो. या अवस्थेत देखील लोकांना छातीत दुखण्याची समस्या उद्भवू शकते.

ताण तणाव आणि चिंता

डॉक्टर म्हणतात, तणावाच्या स्थितीत भीतीची भावना व्यक्तीच्या मनात निर्माण होते. जास्त ताणामुळे छातीत दुखण्याची समस्या बर्‍यापैकी सामान्य मानली जाते. तथापि, कोविड -१९ किंवा इतर कोणत्याही हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्यांमुळे होत असलेल्या वेदनांच्या तुलनेत, तणाव आणि चिंतेमुळे होत असलेल्या छातीतील वेदना लवकर दूर होतात. तणाव असल्यास, छातीत दुखण्याबरोबरच आपल्याला श्वास घ्यायला त्रास होणं, घाम येणे आणि हृदयाच्या ठोक्याची गती वाढल्याच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो. 

वेदना ताण तणावामुळे की कोरोना संक्रमणामुळे असं ओळखा

डॉक्टर म्हणतात की आपल्याला चिंता आणि तणावमुळे छातीत दुखण्याची समस्या असल्यास काही मानसिक आरोग्याची लक्षणे देखील दिसू शकतात. काळानुसार ताण तणावाच्या स्थितीत सुधारणा झाल्यास ही समस्या कमी होते.  तर कोविड -१९ मुळे होणारी छातीत दुखण्याची समस्या उलट आहे.

कोविड -१९ मुळे छाती दुखणं एखाद्या व्यक्तीचा संसर्ग दूर होईपर्यंत टिकून राहते. ताप, खोकला आणि फ्लूसारखी लक्षणे कोविडमध्येही छातीत दुखण्यास कारणीभूत ठरतात. जर तुम्हालाही छातीत दुखणे कायम राहिल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
 

Web Title: Coronavirus Chest pain : How to know if chest pain is caused by anxiety or covid-19 how to differentiate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.