आजच्या धावपळीच्या आणि बिझी लाईफस्टाईलमध्ये आरोग्य जपण्यासाठी अनेकजण नैसर्गिक सुपरफूड्सचा आहारात समावेश करतात. यात बॉलिवूडमधील अभिनेत्री आलिया भट आणि कंगना राणावत या देखील मागे नाहीत. त्यांचा फिटनेस आणि निरोगी लाईफस्टाईल नेहमीच चर्चेत असते. आलिया, कंगना हृदय आणि मेंदूच्या चांगल्या आरोग्यासाठी रोजच्या आहारात चिया सिड्सचा न चुकता समावेश करतात(chia seeds benefits for heart and brain).
चिया सीड्सच्या या छोटयाशा काळ्या बियांमध्ये भरपूर पोषण आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड, फायबर, प्रोटीन आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. या चिया सीड्समध्ये असणाऱ्या पोषक घटकांमुळे शरीराला आतून पोषण मिळतं, मेंदू तल्लख राहतो आणि हृदयाची कार्यक्षमता सुधारते. आलिया आणि कंगना राणावत यांच्या फिटनेस सिक्रेट असलेल्या चिया सीड्सचे ( chia seeds are a superfood for the heart brain & skin alia & kangana also eat them daily) आरोग्यदायी फायदे आणि त्यांना आहारात समाविष्ट करण्याची सोपी पद्धत पाहूयात...
आलिया आणि कंगना पण चिया सीड्सचा आहारात समावेश करतात...
काही वर्षांपूर्वी आलिया भट्टने एका व्हिडीओमध्ये सांगितले होते की, ती गोड खाण्याची तीव्र इच्छा शांत करण्यासाठी चिया पुडिंग (Chia Pudding) खाते. तर कंगना राणावत हायड्रेशन आणि पचन सुधारण्यासाठी तिच्या आहारात चिया सीड्स आणि जिऱ्याच्या पाण्यापासून तयार केलेल्या ड्रिंकचा समावेश करते. या दोन्ही सेलिब्रिटीज न चुकता आपल्या आहारात चिया सीड्सचा समावेश करतात.
चिया सीड्स खाण्याचे फायदे...
भारतीय वंशाचे अमेरिकन गॅस्ट्रो- तज्ज्ञ डॉ. पाल मनिकम सांगतात की, पोटातील ‘गुड बॅक्टेरिया’ हे आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात. ते म्हणतात की, दही आपल्या शरीराला 'प्रोबायोटिक्स' मिळवून देण्यास मदत करते, जे या बॅक्टेरियांना पोषण देतात, तर चिया सीड्स 'प्रीबायोटिक्स' (Prebiotics) च्या स्वरूपात कार्य करतात, जे त्यांना पोषण देतात आणि एक उत्कृष्ट 'गट फ्रेंडली' (Gut Friendly) कॉम्बिनेशन तयार करतात. आपण चिया पुडिंगसाठी तयार करण्यासाठी दही, चिया सीड्स आणि मधाचा वापर करून ते तयार करु शकता.
फॅटी लिव्ह न्यूट्रिशनिस्ट सांगतात ५ उपाय. लिव्हरचं काम सुधारेल - वेटलॉसही होईल झरझर...
प्रथिनयुक्त दह्यासोबत चिया सीड्स खाल्ल्याने, चिया सीड्समध्ये असलेले ओमेगा - ३ अधिक चांगल्या प्रकारे शोषले जाते, ज्यामुळे हे फूड कॉम्बिनेशन पचनक्रिया, हृदयाचे आरोग्य आणि एकूणच आरोग्यासाठी 'सुपरफूड' मानले जाते. या छोट्याशा काळ्या बिया ओमेगा - ३, फायबर, प्रथिने आणि अँटिऑक्सिडंट्सयुक्त असतात ज्या पचनास मदत करतात, सूज कमी करतात आणि वजन नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त ठरतात. इतकेच नाही, तर कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासही मदत करतात. दररोज चिया सीड्स खाल्ल्याने त्याचे आपल्या आरोग्याला अतिशय चांगले फायदे मिळतात.
रिसर्चमध्ये चिया सीड्सला 'सुपरफूड' म्हटले आहे...
हार्वर्ड हेल्थ पब्लिशिंगच्या रिपोर्टनुसार, चिया सीड्समध्ये आरोग्याच्या दृष्टीने भरपूर पौष्टिक असे घटक असतात. ते पोटात जेलसारखा पदार्थ तयार करतात, ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरल्यासारखे वाटते, भूक कमी होते आणि रक्तातील साखर नियंत्रित राहते. हे पचनास मदत करते आणि शौचास नरम करते ज्यामुळे बद्धकोष्ठता दूर होते व मलत्याग करणे सोपे जाते. यात असलेल्या ओमेगा-३ फॅटी ॲसिडमुळे हृदयविकार, टाईप - २ मधुमेह आणि काही प्रकारचे कर्करोग आणि सूज येण्याचा धोकाही कमी होतो. चिया सीड्समध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्सशी लढतात, जे त्वचेला लवकर वृद्धत्व आणतात, तसेच हृदयविकार, मधुमेह आणि अल्झायमर सारख्या जुनाट आजारांचा धोकाही कमी करतात.
Web Summary : Actresses Alia Bhatt and Kangana Ranaut include chia seeds in their diet for heart, brain, and skin health. Rich in omega-3s, fiber, and antioxidants, chia seeds aid digestion, reduce inflammation, control weight, and regulate cholesterol and blood pressure.
Web Summary : अभिनेत्रियाँ आलिया भट्ट और कंगना रनौत हृदय, मस्तिष्क और त्वचा के स्वास्थ्य के लिए अपने आहार में चिया सीड्स शामिल करती हैं। ओमेगा-3, फाइबर और एंटीऑक्सीडेंट से भरपूर चिया सीड्स पाचन में मदद करते हैं, सूजन कम करते हैं, वजन नियंत्रित करते हैं और कोलेस्ट्रॉल और रक्तचाप को नियंत्रित करते हैं।