Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Fitness > भरभर चालताना पाणी पिणं योग्य की अयोग्य? पाहा चालण्याची योग्य पद्धत तरच मिळेल फायदा

भरभर चालताना पाणी पिणं योग्य की अयोग्य? पाहा चालण्याची योग्य पद्धत तरच मिळेल फायदा

Brisk Walk Tips : बऱ्याच लोकांना ब्रिस्क वॉक करण्याची योग्य वेळ माहीत नसते, तर काही लोक ब्रिस्क वॉक करताना गटागट पाणी पितात. असं केल्याने काय होतं हे माहिती असणं गरजेचं आहे. तेच जाणून घेऊया.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 09:53 IST2026-04-09T09:52:48+5:302026-04-09T09:53:54+5:30

Brisk Walk Tips : बऱ्याच लोकांना ब्रिस्क वॉक करण्याची योग्य वेळ माहीत नसते, तर काही लोक ब्रिस्क वॉक करताना गटागट पाणी पितात. असं केल्याने काय होतं हे माहिती असणं गरजेचं आहे. तेच जाणून घेऊया.

Can we drink water during a brisk walk, know the right way | भरभर चालताना पाणी पिणं योग्य की अयोग्य? पाहा चालण्याची योग्य पद्धत तरच मिळेल फायदा

भरभर चालताना पाणी पिणं योग्य की अयोग्य? पाहा चालण्याची योग्य पद्धत तरच मिळेल फायदा

Brisk Walk Tips : धावल्याने - चालल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे मिळतात. चालण्याची एक खास पद्धत म्हणजे ब्रिस्क वॉक. ब्रिस्क वॉक म्हणजे भरभर चालणे. याचे शरीराला अनेक फायदे मिळतात. भरभर चालून वजन तर कमी होतंच, सोबतच हृदय देखील निरोगी राहतं. पण भरभर चालताना काही गोष्टींची काळजी घेणंही महत्वाचं ठरतं. जसे की, बऱ्याच लोकांना ब्रिस्क वॉक करण्याची योग्य वेळ माहीत नसते, तर काही लोक ब्रिस्क वॉक करताना गटागट पाणी पितात. असं केल्याने काय होतं हे माहिती असणं गरजेचं आहे. तेच जाणून घेऊया.

वॉक करताना पाणी प्यावं का?

जर आपण ३० मिनिटांपेक्षा जास्त चालले असाल तर आपण थोडं पाणी प्यायला हवं. हेही ध्यानात ठेवा की, पाणी भरपूर प्यायचं नाहीये. तहान भागेल आणि शरीर हायड्रेट राहील इतकंच पाणी प्यायचं आहे. जर उन्हाळ्यात चालत असाल तर दर १५ ते २० मिनिटांनी एक एक घोट पाणी पिऊ शकता. असं केल्यास थकवा जाणवणार नाही. एकाचवेळी भरपूर पाणी पिऊ नका.

जास्त पाणी कधी प्यावं?

वॉकला जाण्याच्या १० ते २० मिनिटे आधी एक ग्लास पाणी प्यावे. वॉक संपल्यानंतर २० ते ३० मिनिटांनी बसून आरामात पाणी प्या. जर चालताना घाम येत असेल तर समजून घ्या आपल्याला पाण्याची गरज आहे. जर वॉक १ तासांपेक्षा जास्त झाला असेल तर आपण लिंबू पाणी किंवा इलेक्ट्रोलाइट घेऊ शकता. 

चालण्यादरम्यान काय करावं काय टाळावं?

वार्म - अप करा - चालणं सुरू करण्याच्या ५ मिनिटं आधी वार्म-अप करा आणि नंतर स्ट्रेचिंग करा. अशाप्रकारे चालताना स्नायूंवर ताण किंवा दबाव येत नाही. 

आरामदायक शूज - चालण्यासाठी आरामदायक शूज वापरा. ते योग्य साइजचे असावेत. शूज ना जास्त टाइट असावेत ना जास्त सैल. जर शूजमध्ये गडबड असेल तर आपण व्यवस्थित चालू शकणार नाही.

योग्य पोश्चर - पायी चालताना खाली बघू नका, असं केल्यास मान आणि पाठ दुखू शकते. ताठ रहा, खांदे सैल सोडा आणि समोर १० ते २० मिनिटांच्या अंतरावर बघू चाला.

Web Title : तेज़ चलना: सही तरीका, फायदे और पैदल चलने वालों के लिए हाइड्रेशन टिप्स।

Web Summary : तेज़ चलना वजन घटाने और स्वस्थ हृदय जैसे स्वास्थ्य लाभ प्रदान करता है। लंबी पैदल यात्रा के दौरान मध्यम रूप से हाइड्रेट करें। अधिकतम लाभ के लिए पहले वार्म-अप करें, आरामदायक जूते पहनें और अच्छी मुद्रा बनाए रखें।

Web Title : Brisk walking: Right way, benefits, and hydration tips for walkers.

Web Summary : Brisk walking offers health benefits like weight loss and a healthy heart. Hydrate moderately during longer walks. Warm-up before, wear comfortable shoes, and maintain good posture for maximum benefit.