lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Fitness > सर्दीमुळे नाक बंद झालं, श्वास घ्यायला त्रास होतो? १ सोपा उपाय करा- १० मिनिटांत नाक मोकळं होईल

सर्दीमुळे नाक बंद झालं, श्वास घ्यायला त्रास होतो? १ सोपा उपाय करा- १० मिनिटांत नाक मोकळं होईल

Home Remedies For Blocked Nose: वातावरण बदलल्यामुळे या दिवसांत अनेकांना नाक बंद होण्याचा त्रास होतो. यामुळे मग श्वास घ्यायलाही अडचण येते. म्हणूनच सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका यांनी सांगितलेला हा सोपा उपाय करून पाहा...(adi mudra for increasing breathing capacity of lungs)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2023 11:32 AM2023-12-05T11:32:56+5:302023-12-05T11:33:59+5:30

Home Remedies For Blocked Nose: वातावरण बदलल्यामुळे या दिवसांत अनेकांना नाक बंद होण्याचा त्रास होतो. यामुळे मग श्वास घ्यायलाही अडचण येते. म्हणूनच सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका यांनी सांगितलेला हा सोपा उपाय करून पाहा...(adi mudra for increasing breathing capacity of lungs)

Best solution for getting stuffy and difficult to breathe because of cold and cough, what to do if nose is pack because of cold? Benefits of adi mudra for increasing breathing capacity of lungs | सर्दीमुळे नाक बंद झालं, श्वास घ्यायला त्रास होतो? १ सोपा उपाय करा- १० मिनिटांत नाक मोकळं होईल

सर्दीमुळे नाक बंद झालं, श्वास घ्यायला त्रास होतो? १ सोपा उपाय करा- १० मिनिटांत नाक मोकळं होईल

Highlightsअशाच पद्धतीने ७ वेळा श्वसनाचा व्यायाम करा. लगेच पुढच्या काही मिनिटांतच नाक मोकळे होईल. 

सध्या थंडीचे दिवस सुरू झाले आहेत. त्यातच मध्यंतरी काही भागांमध्ये पाऊसही पडला. त्यामुळे कुठे पाऊस तर कुठे ढगाळ हवामान अशी परिस्थिती निर्माण झाली होती. या परिस्थितीचा परिणाम लगेच तब्येतीवर होतो. त्यामुळे हल्ली बऱ्याच घरांमध्ये सर्दीचा त्रास असणारी मंडळी आहेत. सर्दी झाली की सुरुवातीला ३ दिवस नाकातून पाणी येतं. पण नंतर मात्र कफ झाल्याने नाक बंद होऊन जातं (what to do if nose is pack because of cold?). श्वास घ्यायलाही त्रास होतो. किंवा काही जणांचा श्वास घेताना खूप मोठा आवाज होतो. असा त्रास तुम्हालाही होत असेल तर हा एक सोपा उपाय करून पाहा.(Benefits of adi mudra for increasing breathing capacity of lungs)

 

सर्दीमुळे नाक बंद झालं असल्यास उपाय

बॉलीवूडच्या सेलिब्रिटींना योगाचे धडे देणाऱ्या सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी यांनी हा उपाय सांगितला आहे.

३०० रुपयांपेक्षा कमी किमतीत घ्या अर्धा डझन सॉक्स.... बघा कशी करायची स्वस्तात मस्त खरेदी

नाक बंद झाल्याने श्वास घ्यायला त्रास होत असेल तर काय करावं, याविषयीचा एक व्हिडिओ शेअर करत त्यांनी आदि मुद्रा करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच आदि मुद्रा केल्यावर श्वास कशा पद्धतीने घ्यावा, याविषयी मार्गदर्शन केले आहे.

आदि मुद्रा करण्यासाठी दोन्ही तळहातांचे अंगठे आतल्या बाजुने दुमडावे आणि मग बोटांनी अंगठा पकडावा. हाताची अशी मुठ दोन्ही पायांच्या गुडघ्यांवर ठेवून ताठ बसावे.

 

असा करा श्वसनाचा व्यायाम

१. सगळ्यात आधी तर वर सांगितल्याप्रमाणे आदिमुद्रा करा. पाठीचा कणा ताठ ठेवून मांडी घालून बसा. 

२. यानंतर मनातल्या मनात ४ आकडे मोजेपर्यंत हळूवार श्वास घ्या आणि २ आकडे मोजेपर्यंत श्वास रोखून ठेवा.

सुहाना खानही घालते कधी कधी कमी किमतीचे कपडे आणि बुटं, बघा तिच्या या ड्रेसची किंमत किती...

३. यानंतर ५ आकडे मोजेपर्यंत श्वास सोडा आणि पुन्हा २ आकडे मोजेपर्यंत श्वास रोखून ठेवा..

४. अशाच पद्धतीने ७ वेळा श्वसनाचा व्यायाम करा. लगेच पुढच्या काही मिनिटांतच नाक मोकळे होईल. 


 

Web Title: Best solution for getting stuffy and difficult to breathe because of cold and cough, what to do if nose is pack because of cold? Benefits of adi mudra for increasing breathing capacity of lungs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.