Join us

रात्रीचे जेवण झाल्यानंतर 'हे' काम नक्की करा! वजन मुळीच वाढणार नाही- अन्न व्यवस्थित पचेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2025 14:05 IST

Best Remedy For Good Digestion: अपचन किंवा गॅसेस होणे, पोट फुगणे असा त्रास होत असेल तर रात्री जेवण झाल्यानंतर पुढे सांगितलेली एक गोष्ट आवर्जून करा.. 

ठळक मुद्देवजन नियंत्रित राहावं, व्यवस्थित अन्नपचन व्हावं, अपचन, ॲसिडिटी, पोट फुगणे, बद्धकोष्ठता असे त्रास होऊ नये म्हणून उपाय

हल्ली वजन वाढीची समस्या खूप जास्त वाढली आहे. याचं कारण म्हणजे आपल्या शरीराची हालचाल कमी झाली आहे आणि त्याच तुलनेत आहारामध्ये खूप मोठा बदल होत आहे. यामुळे मग अपचनाचा त्रास होतो, वजन वाढतं. हे सगळे त्रास टाळायचे असतील तर किमान रात्रीचं जेवण झाल्यानंतर तरी काही मिनिटांसाठी वज्रासनात बसावं, असं तज्ज्ञ नेहमी सांगतात. पण वजन वाढल्यामुळे अनेकांना वज्रासनात बसताच येत नाही (how to control weight?). रात्रीचं जेवण झाल्यानंतर शतपावली करावी, असंही सांगितलं जातं (Best Remedy For Good Digestion). पण वेळेअभावी अनेकांना ते ही शक्य होत नाही.(best trick to avoid indigestion)

 

अशावेळी वजन नियंत्रित राहावं, व्यवस्थित अन्नपचन व्हावं, अपचन, ॲसिडिटी, पोट फुगणे, बद्धकोष्ठता असे त्रास होऊ नये म्हणून तज्ज्ञांनी एक खास उपाय सांगितला आहे. हा उपाय सांगताना तज्ज्ञ असही म्हणतात की जेवण झाल्यानंतर शक्य असेल तर वज्रासनातच बसा किंवा शतपावली करा.

मुलांना चांगल्या सवयी कशा लावाव्या? ५ टिप्स, मुलं होतील हुशार- गुणी, सगळेच कौतुक करतील

पण हे दोन्हीही करणं तुम्हाला अवघड असेल तर मात्र पुढे सांगितलेला उपाय करा. यामुळे अपनाच्या तक्रारी बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतात. हा उपाय humyog या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. 

 

यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की आपण जेव्हा वज्रासन करतो तेव्हा आपल्या पोटऱ्यांवर दाब येतो. तसाच दाब आता हातांनी पोटऱ्यांवर निर्माण करायचा आहे. त्यासाठी मांडी घालून बसा आणि पोटऱ्यांवर हाताने दाब द्या. बोटांनी पोटऱ्या व्यवस्थित दाबा.

संक्रांतीच्या हळदी- कुंकूसाठी काय मेन्यू करावा? बघा झटपट होणारे, करायला सोपे ५ पदार्थ

प्रत्येक पायाची पोटरी साधारण एक ते दोन मिनिटे दाबावी. त्यानंतर दोन्ही पायांच्या मांड्यांचा जो भाग आहे त्या भागावर जांघेपासून ते गुडघ्यापर्यंत अशा पद्धतीने ८ ते १० वेळा चोळावे. यामुळेही व्यवस्थित अन्न पचन होते, असं तज्ज्ञ सांगतात. 

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्सव्यायामयोगासने प्रकार व फायदे