निरोगी जीवनशैलीसाठी लोक योगा आणि चालण्याचा अवलंब करतात. सकाळी चालणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे असं म्हटलं जातं. मात्र आता चालण्याचा एक नवा ट्रेंड उदयास आला आहे, ज्यामध्ये सर्वात जास्त चर्चेत असलेले चालणं म्हणजे उलट चालणं. तुम्ही अनेकदा लोकांना उद्यानांमध्ये सरळ चालण्याऐवजी उलट चालताना पाहिलं असेल. उलटं चालण्याचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊया...
रिव्हर्स वॉकिंग ट्रेंड
अनेक देशांमध्ये रिव्हर्स वॉकिंग ट्रेंड सातत्याने वाढत आहे. हा अनेक समस्यांवर उपाय असू शकतो. मात्र पायासंबंधित काही समस्या असल्यास अशा लोकांनी ही पद्धत टाळावी.
- उलट चालल्यामुळे मेंदूचाही व्यायाम होतो, ज्यामुळे पाय आणि मेंदूमध्ये एक विशेष कनेक्शन निर्माण होतं.
- उलट चालणं हे डायबेटीस आणि ब्लड प्रेशर असलेल्या लोकांसाठी देखील फायदेशीर आहे.
- उलट चालल्यामुळे पायांमधील ताकद वाढते आणि पायांना बळकटी मिळते.
- वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक अतिशय प्रभावी पद्धत असू शकते. वजन कमी करण्यास मदत होते.
- पाठदुखीने ग्रस्त असलेल्यांसाठी चालण्याची ही पद्धत फायदेशीर ठरू शकते.
दिवसातून ५ मिनिटंही पुरेशी
जर तुम्हाला उलटं चालण्याचा प्रयत्न करायचा असेल, तर दिवसातून फक्त पाच मिनिटंही पुरेशी आहेत. सुरुवातीला हळूहळू मागे चालण्याचा प्रयत्न करा, कारण तुम्हाला तुमचा तोल सांभाळावा लागेल. काही दिवसांनी तुम्हाला त्याची सवय झाली की, तुम्ही वेगाने चालू शकता. तुम्ही तुमचा चालण्याचा वेळ देखील वाढवू शकता. जेव्हाही उलट चालाल तेव्हा सपाट पृष्ठभागावर चालायला विसरू नका. आपल्या मागे कोणताही दगड किंवा खड्डे आहेत का हे आधी तपासा आणि मगच उलटं चाला.