Join us
Daily Top 2Weekly Top 5

वजन कमी करण्यासाठी भरमसाठ जीम आणि नको तेवढे डाएट करताय ? फासे उलटेच पडायचे, फायदा की तोटा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2025 17:45 IST

Are you going to the gym a lot and dieting excessively to lose weight? The dice always fall in reverse, because : शरीराला अतिताण देणे ठरेल घातक. पाहा काय होते.

वजन कमी करण्याची इच्छा असणे आणि त्यासाठी विविध उपाय करणे नक्कीच चांगले आहे. मात्र आजकाल मुली बारीक होण्यासाठी स्वतःला नको तेवढी बंधनं घालून घेतात. जगण्यातून मजा काढून टाकतात. तसे करण्याला काहीच अर्थ नाही. (Are you going to the gym a lot and dieting excessively to lose weight? The dice always fall in reverse, because...)बारीक होण्यासाठी स्वत:ला उपाशी ठेवणे, मन मारून खाण्यावर बंधने घालणे किंवा दिवसातून तासन्‌तास जिममध्ये घाम गाळणे हीच एकमेव वाट नाही. जेवढे झेपेल तेवढाच व्यायाम करणेही गरजेचे आहे. अति व्यायामामुळे शरीर थकते. त्यामुळे चिडचिड आणि नैराश्य येते. शरीराला हलके, ऊर्जावान आणि फिट ठेवण्यासाठी आनंद देणारे छंदही तितकेच प्रभावी ठरतात. उलट, मनापासून केलेले छंद शरीरावर ताण न आणता सतत करण्याची सवय ठेवतात आणि तेच वजन कमी होण्यामागचे खरे गुपित आहे.

जर नृत्य करायला आवडते तर त्याचा सराव करा.  थकवा कमी आणि मन ताजेतवाने राहते. त्याचप्रमाणे एखादा खेळ जसे की बॅडमिंटन, स्विमिंग, सायकलिंग, क्रिकेट किंवा अगदी धावायला जाणे असे आवडते खेळ पुन्हा खेळायला सुरवात केले तर ही सवय वजनावर अप्रत्यक्षपणे मोठी जादू करते. फिटनेसची जबाबदारी वाटत नाही, उलट खेळण्याची मजा मिळते.

आवडते आणि पोटभरीचे भारतीय पदार्थ खाल्ल्याने वजन वाढतेच असे नाही. भारतीय पदार्थ म्हणजे फक्त तेलकटच हा विचार फारच पाश्चात्य आहे. त्यामुळे आवडता घरी केला जाणारा आहार पोटभर घ्या.  फक्त योग्य प्रमाणात, योग्य वेळी आणि संतुलित पद्धतीने खाल्ले की हेच पदार्थ शरीराला ऊर्जाही देतात. उकडीचे मोदक, उपमा, पोहे, ढोकळा, पराठे किंवा वरणभात यात पोषणही आहे आणि संतुलित कार्ब-प्रोटीन यांचा समतोलही. फक्त तळलेले पदार्थ कमी करणे, रात्री हलके खाणे, आणि पाणी योग्य प्रमाणात घेणे हे साधे नियम पाळले की आहार चविष्टही राहतो आणि शरीरावर ताणही येत नाही.

शेवटी, फिटनेस ही शिक्षा नसून जीवनशैली आहे. आवडत्या छंदांतून रोज थोडे शरीर हालले, मन आनंदी राहिले, आणि संतुलित आहार घेतला तर बारीक होणे हा नैसर्गिक आणि आनंददायी प्रवास ठरतो. मन मारुन नव्हे मन रमवून बारीक होण्याचा हा मार्ग दीर्घकाळ टिकणारा, आरोग्यदायी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आनंददायी आहे. शरीरात बदल व्हायला वेळ लागेल मात्र समाधान जास्त मिळेल. 

English
हिंदी सारांश
Web Title : Sustainable Weight Loss: Enjoyable Hobbies Outperform Extreme Gym and Dieting.

Web Summary : Excessive dieting and gym routines can backfire. Embrace enjoyable hobbies like dancing or sports, coupled with balanced, home-cooked Indian meals. Fitness should be a joyful lifestyle, not a punishment, leading to sustainable and satisfying weight loss.
टॅग्स :फिटनेस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्सहोम रेमेडीवेट लॉस टिप्स