Lokmat Sakhi >Fitness > ७० वर्षांचे अनुपम खेर रोज करतात हा व्यायाम; साधंसोपं फिटनेस सिक्रेट-तब्येत ठेवतं ठणठणीत

७० वर्षांचे अनुपम खेर रोज करतात हा व्यायाम; साधंसोपं फिटनेस सिक्रेट-तब्येत ठेवतं ठणठणीत

Anupam Kher does this exercise : या व्यायामानं पाठीचे मसल्स मजबूत होतात. पोश्चर सुधारते, बॅक पेनचा धोका कमी होतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 17:14 IST2025-08-30T14:14:18+5:302025-08-30T17:14:16+5:30

Anupam Kher does this exercise : या व्यायामानं पाठीचे मसल्स मजबूत होतात. पोश्चर सुधारते, बॅक पेनचा धोका कमी होतो.

Anupam Kher does this exercise at the age of 70 know His Fitness Secreat | ७० वर्षांचे अनुपम खेर रोज करतात हा व्यायाम; साधंसोपं फिटनेस सिक्रेट-तब्येत ठेवतं ठणठणीत

७० वर्षांचे अनुपम खेर रोज करतात हा व्यायाम; साधंसोपं फिटनेस सिक्रेट-तब्येत ठेवतं ठणठणीत

वयाच्या ७० व्या वर्षी अभिनेते अनुपम खेर (Anupam Khair) फक्त अभिनयामुळेच नाही तर आपला फिटनेस आणि डेडीकेशनने लोकांना प्रेरणा देत आहेत. त्यांनी अलिकडेच इंस्टाग्रामवर एक वर्कआऊट व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ते शर्टलेस होऊन लॅट पूल डाऊन हा व्यायाम करत आहेत. त्यांनी या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की आयुष्य सायकल चालवण्यासारखं आहे. बॅलेन्स ठेवण्यासाठी नेहमी चालत राहणं गरजेचं आहे. त्यांची मेहनत आणि जिद्द पाहून वयाचा अंदाज येत नाही. तुम्ही डिसिप्लिनबरोबरच फिटनेस कडे लक्ष दिल्यास वय जास्त दिसून येणार नाही. (Anupam Kher does this exercise at the age of 70 know His Fitness Secret)

सोशल मीडियावरील फिटनेस अपडेट

अनुपम खेर यांनी आधीसुद्धा मोनोक्रोम फोटो शेअर केले होते. ज्यात त्यांची टोन्ड पाठ दिसून आली होती. त्यांनी लिहिले होते की जो कधी हार मानत नाही त्यांना हरवणं कठीण आहे. ही पोस्ट फॅन्सना फिट राहण्यासाठी इन्स्पायर करते. मेहनत आणि डेडीकेशन असेल तर वय दिसून येत नाही.


लॅट पूल डाऊन काय आहे?

लॅट पुलडाऊन एक जिमची मशीन नाही तर एक पावरफुल व्यायाम आहे. ज्यामुळे पाठीच्या मांसपेशी मजबूत होण्यास मदत होते. याशिवाय शोल्डर, हात आणि कोअर मसल्स एक्टिव्ह राहतात. नियमित हा व्यायाम केल्यानं शरीर मजबूत राहण्यास, फिट राहण्यास मदत होते.

लॅट पूल डाऊन करण्याचे फायदे

या व्यायामानं पाठीचे मसल्स मजबूत होतात. पोश्चर सुधारते, बॅक पेनचा धोका कमी होतो. शरीराची स्ट्रेंथ वाढते आणइ डेली रूटीनची कामं सोपी होतात. २०२४ च्या रिसर्चनुसार रोज फिजिकली एक्टिव्ह राहिल्यानं वय वाढून शरीर फिट राहतं. हार्ट आणि ब्लड सर्क्युलेशनही चांगले राहते. मसल्स आणि हाडं मजबूत होतात. मेमरी, ब्रेन फंक्शन चांगले राहते. याशिवाय इम्युनिटी स्ट्राँग राहण्यास मदत होते. रोजच्या एक्टिव्हीटीज करणं सोपं होतं, मसल्स आणि बोन्स डेंसिटी मजबूत होते, पाठ आणि खांद्यांच्या वेदना कमी होतात, स्ट्रेंथ आणि स्टॅमिना वाढतो.

Web Title: Anupam Kher does this exercise at the age of 70 know His Fitness Secreat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.