मुलींच्या मांड्या मोठ्या होण्यामागे अनेक कारणे असू शकतात आणि त्यामुळे पायांचा आकार फार बेढब वाटू शकतो. असे झाल्यावर मुलींचा आत्मविश्वास तर कमी होतोच पण रोजच्या साध्या कामांतही थकवा जाणवायला लागतो. पायांवर जास्त ताण येतो आणि त्यामुळे पाय सारखे दुखतात. (5 home remedies to shape thick, flabby thighs - Leg strength will increase - Fat will also be reduced)शरीराची रचना आणि आनुवंशिकता हा एक महत्त्वाचा घटक आहे. काही जणींमध्ये कंबरेपासून मांड्यांपर्यंत चरबी साठवण्याची प्रवृत्ती नैसर्गिकरित्या जास्त असते. याशिवाय, बसून राहण्याची सवय, शारीरिक हालचालींचा अभाव आणि जास्त प्रमाणात तेलकट किंवा गोड पदार्थांचे सेवन यामुळेही मांड्यांवरील चरबी वाढते. हार्मोन्समध्ये होणारे बदल, विशेषतः किशोरवयात किंवा गर्भधारणेनंतर शरीरातील चरबी वाढते. मांडयांजवळ चरबी साठण्याची शक्यता जास्त असते. शरीरातील पाण्याची कमतरता आणि शरीरातील अपुऱ्या रक्ताभिसरणामुळेही मांड्यांचा आकार फुगल्यासारखा दिसू शकतो.
घरगुती उपायांमध्ये सर्वप्रथम आहारावर लक्ष देणे गरजेचे आहे. दररोज भरपूर प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकली जातात आणि सूज कमी होते. आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे, कडधान्ये आणि प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश असायला हवा. तळलेले, मैद्याचे पदार्थ शक्यतो खाऊच नका. त्यामुळे चरबी वाढते. तसेच गोड पदार्थ खाणे टाळावेत. गोड पदार्थ खाणे टाळले तर संपूर्ण शरीराचे वजन घटते. नियमित व्यायाम हा सर्वात प्रभावी उपाय आहे. घरच्या घरी सहज करता येणारे स्क्वॅट्स, लंजेस, दोरी उडी मारणे यामुळे मांड्यांवरील चरबी हळूहळू कमी होते. दररोज किमान अर्धा तास चालणे किंवा धावणे मांड्यांच्या स्नायूंना मोकळे करते.
काही साधे घरगुती उपायही उपयोगी ठरतात. फक्त चरबीमुळे नाही तर काही कारणांमुळे मांड्यांना सुज आली असेल तर ती कमी करण्यासाठी कोमट पाण्यात मीठ घालून पाय बुडवून ठेवा. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि सूज कमी होते. नारळाच्या तेलाने किंवा तीळाच्या तेलाने हलक्या हाताने मांड्यांची मालीश केल्याने त्वचेला लवचिकता मिळते आणि चरबीचे थर कमी होण्यास मदत होते. योग्य आहार, नियमित व्यायाम, पुरेसे पाणी प्यायले, सोपे घरगुती व्यायाम-उपाय केले तर मांड्या हळूहळू सुडौल होतात.