Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Fitness > मांड्यांवर खूपच चरबी साठली? ५ सोपे व्यायाम घरीच करा, महिनाभरात बारीक दिसतील मांड्या

मांड्यांवर खूपच चरबी साठली? ५ सोपे व्यायाम घरीच करा, महिनाभरात बारीक दिसतील मांड्या

5 Best Home Exercise To Loose Thigh Fat (Thigh Fat Reducing Exercise) : ५ परिणामकारक व्यायाम प्रकार  पाहूया ज्यामुळे तुमच्या मांड्यांची चरबी कमी होईल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 16:36 IST2026-03-02T15:17:10+5:302026-03-03T16:36:35+5:30

5 Best Home Exercise To Loose Thigh Fat (Thigh Fat Reducing Exercise) : ५ परिणामकारक व्यायाम प्रकार  पाहूया ज्यामुळे तुमच्या मांड्यांची चरबी कमी होईल.

5 Best Home Exercise To Loose Thigh Fat : How To Lose Thigh Fat Quickly | मांड्यांवर खूपच चरबी साठली? ५ सोपे व्यायाम घरीच करा, महिनाभरात बारीक दिसतील मांड्या

मांड्यांवर खूपच चरबी साठली? ५ सोपे व्यायाम घरीच करा, महिनाभरात बारीक दिसतील मांड्या

मांड्यांमध्ये जमा झालेली चरबी कमी करणं आणि मांड्या बारीक होण्यासाठी प्रयत्न करणं खूपच अवघड आहे. खासकरून महिलांना मोठ्या मांड्यांमुळे बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागते. बेढब शरीरामुळे आत्मविश्वासही कमी होतो. काही व्यायाम प्रकार रोजच्या रोज करून मांड्यांची चरबी कमी करू शकता (Thigh Fat Reducing Exercise).  ५ परिणामकारक व्यायाम प्रकार पाहूया ज्यामुळे तुमच्या मांड्यांची चरबी कमी होईल. (5 Best Home Exercise To Loose Thigh Fat)

स्क्वाट्स 

स्क्वाट्स  हा एक प्रभावी आणि सर्वांनाच माहिती असलेला व्यायाम आहे. मांड्यांबरोबरच नितंबांच्या मांसपेशीसुद्धा यामुळे टोन्ड होतात. हा व्यायाम शरीरातील जास्तीची चरबी कमी करण्यास मदत करतो.

लंजेस

 हेल्थलाईनच्या रिपोर्टनुसार लंजेस हा एक परिणामकारक व्यायाम आहे जो  तुम्ही फक्त जीममध्येच नाही तर घरातही वजन उचलून करू शकता. हा व्यायाम प्रकार फ्रंट आणि बॅक दोन्ही बाजूच्या मांसपेशींना टारर्गेट करतो ज्यामुळे मांसपेशींची शक्ती वाढवण्यास मदत होते. (Ref)

लेग रेजेस

हा व्यायाम केल्यानं मांड्या आणि पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. हा व्यायाम पोटाची चरबी कमी करण्यासाठी खूपच फायदेशीर ठरतो. लेग रेजेज  केल्यामुळे फक्त मांड्या टोन्ड होत नाही तर कोर मांसपेशी मजबूत होण्यासही मदत होते.

उन्हाळ्यात ढसाढसा भरपूर ताक पिता? पाहा कोणी-कसं आणि किती ताक प्यावं?

स्टेपअप्स

स्टेपअप्स मांड्या आणि नितंबांच्या मांसपेशी टोन्ड करण्याचा एक प्रभावी उपाय आहे. हा व्यायाम करण्यासाठी तुम्हाला पायऱ्या किंवा एका उंच स्टूलची आवश्यकता असेल. पायरीवर चढ उतर करून किंवा घरातच स्टेप्सवर वर खाली करून तुम्ही हा व्यायाम सहज करू शकता.

साईड लेग लिफ्ट्स

साईट लेग लिफ्ट्स हा व्यायाम केल्यानं मांसपेशी मजबूत होतात. तसंच हा व्यायाम केल्यानं तुमचे पाय अधिक स्लिम आणि मजबूत दिसतात.  १२ ते १५ वेळा ३ सेट्स या व्यायामाचे करा. तुम्ही फक्त मांड्याची चरबी एकावेळी कमी करू शकत नाही कारण स्पॉट रिडक्शन होत नाही. म्हणून तब्येतीचीही काळजी घ्यायला हवी.

घरीच सुक्या खोबऱ्यापासून करा शुद्ध नारळाचं तेल; सोपी ट्रिक-मशीन न वापरता झटपट निघेल तेल

योग्य आहार घ्या. ज्यात प्रोटीन, फायबर आणि हेल्दी फॅट्सचा समावेश असेल. दिवसभर भरपूर प्रमाणात पाणी प्या जेणेकरून शरीर हायड्रेट राहील. सायकलिंग,धावणं, पोहणं, कार्डीओ व्यायाम यांसारख्या शारिरीक एक्टिव्हीटीज करा.

Web Title : महीने भर में घर पर जांघों को पतला करने के लिए प्रभावी व्यायाम

Web Summary : जांघ की चर्बी से परेशान हैं? स्क्वैट्स, लंजेस, लेग रेज, स्टेप-अप और साइड लेग लिफ्ट घर पर आपकी जांघों और पैरों को टोन करने में मदद कर सकते हैं। सर्वोत्तम परिणामों के लिए इन व्यायामों को स्वस्थ आहार और कार्डियो के साथ मिलाएं।

Web Title : Effective Exercises to Slim Thighs at Home in a Month

Web Summary : Struggling with thigh fat? Squats, lunges, leg raises, step-ups, and side leg lifts can help tone your thighs and legs at home. Combine these exercises with a healthy diet and cardio for best results.