बॉलिवूडमधील मोजक्या अभिनेत्रींना पाहिलं की, वय हा त्यांच्यासाठी केवळ आकडा असल्याचे जाणवते. वय वाढलं तरी या अभिनेत्रींचे सौंदर्य आणि फिटनेस इतक्या कमालीचे मेंटेन्ड असते की पाहून थक्क व्हायला होते. बॉलिवूडमधील अशीच एक (Mallika Sherawat fitness secrets at 48) अभिनेत्री म्हणजे मल्लिका शेरावत. ४८ वर्षांची मल्लिका शेरावत (Mallika Sherawat) आजही तिच्या फिटनेसने आणि ग्लॅमरस लुकने सर्वांना चकित करते. सिनेमात भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्रींना तितकेच फिट आणि स्लिम राहावे लागते, यासाठी परिश्रम घेताना त्या फिटनेस रुटीन न चुकता फॉलो करतात(48 years old Mallika Sherawat shares workout and wellness tips).
नुकतीच ४८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतने (Mallika Sherawat) तिचा फिटनेस व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिची फिटनेस, टोन्ड आणि स्ट्रॉन्ग बॉडी पाहून बरेचजण आश्चर्यचकित झाले आहेत. मल्लिकाने सांगितले की, ती कोणताही 'जिम ट्रेंड' किंवा 'डाएटचे फॅड' फॉलो करत नाही. उलट, स्वतःला फिट ठेवण्यासाठी (Mallika Sherawat diet and lifestyle tips) ती साधेसोपे एक्सरसाइज करण्याला अधिक महत्व देते. ४८ वर्षांच्या वयातसुद्धा ती एनर्जेटिक आणि तरुण दिसते, याचे सिक्रेट नेमकं काय आहे ते पाहूयात.
व्हिडिओ शेअर करत दिला फिटनेस फॉर्म्युला...
मल्लिका शेरावतने तिच्या इंस्टाग्रामवर जिम वर्कआऊटचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे की, “There are no shortcuts to health, nothing replaces the power of regular exercise and consistency.” म्हणजेच, आरोग्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही, नियमित व्यायाम आणि सातत्य हीच खरी शक्ती आहे.
४८ वर्षांची मल्लिका शेरावत स्वतःला कशी फिट ठेवते ?
१. सायकलिंग (Cycling) :- मल्लिका वर्कआऊट रुटीनमध्ये कार्डिओ आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग करण्यावर अधिक जास्त भर देते. जे संपूर्ण शरीराच्या स्नायूंना मजबूत ठेवते. ती तिच्या वर्कआऊट सेशनची सुरुवात सायकलिंगने करते. हा कार्डिओ एक्सरसाइज फक्त स्टॅमिनाच वाढवत नाही, तर हृदयाचे आरोग्यही चांगले ठेवण्यास मदत करतो आणि शरीराला पुढील हेवी वर्कआऊटसाठी तयार करतो.
२. लेग कर्ल्स (Leg Curls) :- सायकलिंगनंतर मल्लिका लेग कर्ल्स (Leg Curls) करते, जो हॅमस्ट्रिंग्स आणि कंबरेखालील शरीराला मजबूत करण्यास मदत करतो. टोन्ड आणि स्ट्राँग पायांसाठी हा व्यायाम अत्यंत आवश्यक आहे, विशेषतः वाढत्या वयात पायांचे स्नायू मजबूत ठेवणे महत्त्वाचे असते.
महिलांचा ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी करणारे ७ सुपरफूड्स! आहारतज्ज्ञांचा सल्ला, रोज १ तरी खा कारण...
हेमामालिनी साबण वापरत नाही, १ देसी उपाय ठेवतोय त्वचा तरुण, सत्तरीतही सुंदर...
३. रोप पुल (Rope Pull) :- वर्कआऊटमध्ये ती रोप पुल (Rope Pull) आवर्जून करते. हा एक इन्टेंस अपर-बॉडी एक्सरसाइज आहे, जो हात, खांदे आणि पाठीच्या स्नायूंसाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. याव्यतिरिक्त, ग्रिप स्ट्रेंथ आणि स्टॅमिना देखील वाढवतो. हा व्यायाम केवळ शरीराला टोन्ड करत नाही, तर ऊर्जा आणि कार्यक्षमता टिकवून ठेवण्यास मदत करतो.
४. इतरही उपाय आहेत खास :- मल्लिका शेरावत फक्त जिम किंवा एक्सरसाइजच नाही तर मानसिक शांतता आणि संपूर्ण आरोग्याची काळजी घेते. ती एक्यूपंक्चर (Acupuncture) आणि साउंड हीलिंगचे (Sound Healing) सेशन देखील करते. याबद्दल बोलताना तिने सांगितले की, "वीकेंड रीसेट, एक्यूपंक्चर आणि साउंड हीलिंग या माझ्या सेल्फ-केअर रिचुअल आहेत."
झटपट वेटलॉससाठी करा काळीमिरीचा उपाय, चवीला तिखट पण काम जबरदस्त-दिसेल वजनात फरक काही दिवसात...