Lokmat Sakhi >Fitness > फिटनेससाठी दिशा पटानी करते फक्त ४ गोष्टी, तेच आहे तिच्या सौंदर्याचे रहस्य

फिटनेससाठी दिशा पटानी करते फक्त ४ गोष्टी, तेच आहे तिच्या सौंदर्याचे रहस्य

4 Fitness Workout Lessons from Disha Patani : फिटनेससाठी दिशा पटानी कोणत्या प्रकारचे व्यायाम करते हे समजून घेऊया...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2022 10:36 AM2022-08-23T10:36:17+5:302022-08-23T10:40:02+5:30

4 Fitness Workout Lessons from Disha Patani : फिटनेससाठी दिशा पटानी कोणत्या प्रकारचे व्यायाम करते हे समजून घेऊया...

4 Fitness Workout Lessons from Disha Patani : Disha Patani does only 4 things for fitness, that's her beauty secret | फिटनेससाठी दिशा पटानी करते फक्त ४ गोष्टी, तेच आहे तिच्या सौंदर्याचे रहस्य

फिटनेससाठी दिशा पटानी करते फक्त ४ गोष्टी, तेच आहे तिच्या सौंदर्याचे रहस्य

Highlightsइन्स्टाच्या डान्स चॅलेंजपासून ते डान्स फ्लोअरवर घाम येईपर्यंत दिशा नाचताना दिसते. फिटनेससाठी दिशा सर्वप्रकारचे व्यायाम करते, त्याचा तिच्या सौंदर्यावरही परीणाम दिसून येतो.

आपले आरोग्य चांगले असेल तर नकळत सौंदर्यावरही त्याचा परिणाम दिसून येतो. अभिनेत्रींचे सौंदर्य आपल्याला भुरळ पाडते पण त्यासाठी त्या किती कष्ट घेतात याची आपल्याला कल्पना नसते. फिगर मेंटेन ठेवण्यासाठी नियमित व्यायाम, आहारावर नियंत्रण, त्वचेची काळजी यांसारख्या अनेक गोष्टी त्या करत असतात. त्यामुळे त्या शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्याही फिट राहतात. इतकंच नाही तर त्यांची जीवनशैली चांगली असल्याचे त्यांच्या सौंदर्यातूनही दिसून येते. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दिशा पटानी तिच्या फिगरसाठी आणि सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. याच फिटनेससाठी दिशा पटानी कोणत्या प्रकारचे व्यायाम करते हे समजून घेऊया  (4  Fitness Workout Lessons from Disha Patani)...

(Image : Google)
(Image : Google)

१. कार्डीओ व्यायाम

दिशा नियमितपणे कार्डीओ व्यायाम करते. इन्स्टाग्रामवर दिशा चांगलीच अॅक्टीव्ह असते, त्याठिकाणी ती आपले रनिंग, सायकलिंगचे व्हिडिओ शेअर करताना दिसते. त्यावरुनच कार्डीओ व्यायामाचे तिला असलेले महत्त्व आपल्याला दिसून येते. कार्डीओ व्यायामामुळे केवळ शरीराचाच व्यायाम होतो असे नाही तर यामुळे रक्ताभिसरण क्रिया सुरळीत झाल्याने त्वचा ग्लो करण्यास मदत होते. हाडांच्या दुखण्यापासून ते मेंदूच्या आरोग्यापर्यंत कार्डीओ व्यायाम अतिशय उपयुक्त ठरतो. 

२. किक बॉक्सिंग 

आता किकबॉक्सिंगसारखा व्यायामप्रकार कशाला असे आपल्याला वाटू शकेल. पण वेगवेगळ्या कारणांनी वाढलेल्या कॅलरीज घटवण्यासाठी या व्यायामाचा अतिशय चांगला उपयोग होतो. या व्यायामामुळे फक्त फिजिक बनत नाही तर बॉडी टोन होण्यासही याची चांगली मदत होते.  

३. स्ट्रेंथ ट्रेनिंग 

व्यायाम हा शरीरातील ताकद वाढविण्यासाठी अतिशय महत्त्वाचा असतो. स्ट्रेंथ ही केवळ पुरुषांना गरजेची असल्याने तेच अशाप्रकारचे व्यायाम करतात असा आपला समज असतो. मात्र अतिशय नाजूक आणि सुंदर दिसणारी दिशाही सहज कित्येक किलोंची वजनं उचलते. यामुळे मसल्स म्हणजेच शरीरातील स्नायूंची ताकद वाढण्यास मदत होते. 


४. डान्स 

डान्स हा अभिनेत्रींच्या प्रोफेशनचा भाग असला तरी तो एक अतिशय उत्तम व्यायामप्रकार आहे. दिशा पटानी उत्तम डान्सर आहे हे आपल्या सगळ्यांना माहितच आहे. हा डान्स काही एका दिवसांत येत नाही तर त्यासाठी अनेक दिवसांचे परीश्रम लागतात. इन्स्टाच्या डान्स चॅलेंजपासून ते डान्स फ्लोअरवर घाम येईपर्यंत दिशा नाचताना दिसते. 
 

Web Title: 4 Fitness Workout Lessons from Disha Patani : Disha Patani does only 4 things for fitness, that's her beauty secret

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.