खूप कमी महिलांना हे माहित असतं की शरीराला योग्य आकार देण्यासाठी योगासनं करणं खूपच महत्वाचं असतं. ब्रेस्ट हेल्थ (Breast Health) हा कोणत्याही महिलेसाठी एक महत्वपूर्ण असलेला विषय आहे. ब्रेस्ट हेल्थकडे दुर्लक्ष केल्यास तुम्हाला अनेक गंभीर आजार उद्भवू शकतात. काही योगासनं ब्रेस्ट हेल्थ चांगली ठेवण्यास मदत करू शकतात. तुम्ही जीमला जाऊन किंवा घरीच ही सोपी आसनं करू शकता. (Exercises For Breast Tightness)
सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या स्तनांना योग्य आधार मिळणं गरजेचं आहे. चुकीच्या मापाची किंवा सैल ब्रा घातल्यानं गुरूत्वाकर्षणामुळे स्तन लवकर ओघळू शकतात. दर 6 महिन्यांनी तुमचे माप तपासत राहा आणि स्पोर्ट्स ब्रा नक्की वापरा.
अंघोळ करताना शेवटी स्तनांवर थंड पाण्याचा मारा केल्यानं तिथली त्वचा घट्ट होण्यास मदत होते. आठवड्यातून दोनदा खालून वरच्या दिशेनं हलक्या हातानं मसाज केल्यास रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचा लवचीक होते. (How To Get Rid Of Breast Sagging)
उष्ट्रासन
हे योगासन मागच्या बाजूला वाकून केले जाते. ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगले राहते. ब्रेस्टचा आकार योग्य राहतो. त्यामुळे शरीराचा वरचा भाग मागच्या बाजूला वाकतो.
भुजंगासन
हे आसन केल्यानं स्पाईन मजबूत होतो. याशिवाय ब्रेस्ट हेल्दी राहण्यास मदत होते. हे आसन करताना शरीराच्या वरच्या भागाचा आधार घेऊन वर उठायचे असते. रोज हे आसन केल्यानं चांगला परिणाम दिसून येईल.
काम करताना पाण्याची बाटली जवळ घेऊन बसता? मिलिंद सोमण सांगतात बाटली लांब ठेवा कारण..
धनुरासन
हे आसन करण्यासाठी धनुष्याप्रमाणे शरीराची स्थिती असावी लागते. ज्यामुळे ब्रेस्ट एरियामध्ये ब्लड फ्लो सुधारण्यास मदत होते. हे योगासन केल्यानं खांदे मजबूत होतात. ज्या लोकांच्या पोटाभोवती चरबी जमा झाली आहे. त्यांच्यासाठी हा आसन फायदेशीर ठरतं.
रोज भात खातात तरी जपानी लोक जाड का होत नाही? भात खाऊन स्लिम राहण्याचं जपानी सिक्रेट
व्यायाम करा
छातीला योग्य आकार देण्यासाठी जीममध्ये जाऊन काही महिला व्यायाम करतात. प्लॅक केल्यानं फक्त ब्लड फ्लो वाढत नाही तर ब्रेस्ट मजबूत होण्यास मदत होते. चेस्ट प्रेस्ट व्यायामसुद्धा फायदेशीर ठरतो. हा व्यायाम केल्यानं फक्त पुरूषांनाच नाही तर महिलांनाही फायदा होतो. महिलांनी पुशअप्स केल्यास ब्रेस्ट स्टेंथ वाढण्यास मदत होते.
