Join us
Daily Top 2Weekly Top 5

रोज ‘असं’ चाला, जीव वाचवते चालण्याची पद्धत -२०% कमी होतो मृत्यूचा धोका, संशोधनाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 16:29 IST

Brisk Walk Benefits : अनेकांना हे माहीत नसतं की, पायी चालून आपण मृत्यूचा धोकाही कमी करू शकतो. कसा तो जाणून घेऊया.

Brisk Walk Benefits : पायी चालणं हा एक परिपूर्ण आणि प्रभावी असा व्यायाम मानला जातो. हल्ली फिट आणि निरोगी राहण्यासाठी लोक रोज थोडं तरी पायी चालण्याच्या प्रयत्नात असतात. वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असलेले बरेच लोक रोज सकाळी किंवा सायंकाळी पायी चालायला जातात. जेवण केल्यावर थोडावेळ चालल्यास अन्न पचन चांगलं होतं. वजन कमी होणं, पचन चांगलं होणं, ब्लड सर्कुलेशन सुधारणं, हृदय निरोगी राहणं असे कितीतरी पायी चालण्याचे फायदे सांगता येतील. पण अनेकांना हे माहीत नसतं की, पायी चालून आपण मृत्यूचा धोकाही कमी करू शकतो. कसा तो जाणून घेऊया.

पायी चालणं आणि त्याचे फायदे याबाबत नेहमीच वेगवेगळी संशोधने समोर येत असतात. पायी चालण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आणि त्यातून शरीरावर होणारे प्रभाव याबाबतही हेल्थ एक्सपर्ट सांगत असतात. ब्रिक वॉक हा असाच पायी चालण्याचा एक महत्वाचा प्रकार हल्ली खूप चर्चेत आहे. अलिकडेच  StudyFinds च्या एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, दिवसातून फक्त १५ मिनिटे ब्रिस्क वॉक केल्याने मृत्यूचा धोका जवळपास २० टक्क्यांनी मी होऊ शकतो. हे संशोधन Vanderbilt University Medical Center च्या संशोधकांनी केलं आङे. ज्याचा उद्देश हा होता की, रोजची शारीरिक हालचाल आरोग्यावर किती प्रभाव टाकते. खासकरून अशा ठिकाणांवर जिथे महागडे जिम किंवा फिटनेस अॅप्सपर्यंत पोहोचणं सोपं नाही.

ब्रिस्क वॉक कसा फायदेशीर?

संशोधकांनी २००२ ते २०२२ दरम्यान ४० ते ७९ वयोगटातील जवळपास ७९, ८५६ लोकांवर लक्ष ठेवलं. संशोधनादरम्यान २६, ८६२ लोकांचा मृत्यू झाला. पण जे लोक रोज किमान १५ मिनिटे वेगाने पायी चालत होते, त्यांच्यात मृत्यूचा दर बराच कमी आढळून आला. म्हणजे या संशोधनातून असं समोर आलं की, दिवसातून केवळ १५ मिनिटे वेगाने चालल्यास मृत्यू दर जवळपास २० टक्क्यांनी कमी होतो, तर तीन तासांपेक्षा अधिक हळू चालल्याने मृत्यू दर फक्त ४ टक्क्यांनी कमी होतो. 

आरोग्याला सगळ्यात जास्त फायदा तेव्हाच मिळतो, जेव्हा थोडावेळ का होईना पण वेगाने चालाल. तसेच पायऱ्या चढणे, वेगाने चालणे किंवा एखादं असं काम ज्याने हृदयाचे ठोके अधिक वाढतील अशा गोष्टींही फायदेशीर ठरतात. हळू चालल्याने फारसा फायदा मिळत नाही.

हृदयाला मिळतो सगळ्यात जास्त फायदा

ब्रिस्क वॉक केल्याने मृत्यू दरात सगळ्यात जास्त कमतरता हृदयरोगामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये आढळून आली. म्हणजेच काय तर ब्रिस्क वॉक एक अशी अॅक्टिविटी आहे ज्याचा वापर प्रत्येक वयाचे व्यक्ती आपली फिटनेस आणि आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी करू शकतात. भरभर चालल्याने हृदयाची ठोके वाढतात, ब्लड सर्कुलेशन सुधारतं, सूज कमी होते, वजन आणि ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास मदत मिळते.

असं असलं तरी लोक या संशोधनाला पूर्णपणे बरोबर मानत नाहीत. कारण हे संशोधन एक ऑब्जर्वेशनल संशोधन आहे. त्यामुळे हे कारण आणि प्रभाव सिद्ध करू शकत नाही. पण याचा मुख्य उद्देश स्पष्ट आहे. रोज थोडावेळ भरभर चालल्यास आपलं आयुष्य वाढू शकतं.

English
हिंदी सारांश
Web Title : Brisk walking saves lives, reduces mortality risk by 20%: Study

Web Summary : A study reveals that just 15 minutes of brisk walking daily can cut mortality risk by 20%. Faster walking improves heart health and blood circulation. Even short bursts are beneficial, unlike slow strolls.
टॅग्स :फिटनेस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्स