lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Fashion > फक्त १- २ वेळा घालण्यासाठी कशाला महागडा लेहेंगा घेता? बघा लेहेंग्यासारखी साडी नेसण्याची मस्त आयडिया

फक्त १- २ वेळा घालण्यासाठी कशाला महागडा लेहेंगा घेता? बघा लेहेंग्यासारखी साडी नेसण्याची मस्त आयडिया

How To Wear Saree In Lehenga Style: लेहेंगा किंवा घागरा पद्धतीने साडी कशी नेसायची याची ही मस्त आयडिया एकदा पाहून घ्या..(saree draping in lehenga style)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2024 05:25 PM2024-03-09T17:25:15+5:302024-03-09T17:25:52+5:30

How To Wear Saree In Lehenga Style: लेहेंगा किंवा घागरा पद्धतीने साडी कशी नेसायची याची ही मस्त आयडिया एकदा पाहून घ्या..(saree draping in lehenga style)

Saree draping tips, how to wear saree in lehenga style, saree draping in lehenga style, how to wear saree looking like lehenga | फक्त १- २ वेळा घालण्यासाठी कशाला महागडा लेहेंगा घेता? बघा लेहेंग्यासारखी साडी नेसण्याची मस्त आयडिया

फक्त १- २ वेळा घालण्यासाठी कशाला महागडा लेहेंगा घेता? बघा लेहेंग्यासारखी साडी नेसण्याची मस्त आयडिया

Highlightsलेहेंगा म्हणावा तसा वारंवार वापरला जात नाही. त्यामुळे मग तो घेण्यासाठी खूप पैसे खर्च करावे वाटत नाहीत

सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. आणि आता यापुढेही जवळपास जून महिन्यापर्यंत लग्नसराई चालूच राहणार आहे. आता लग्न म्हटलं की खूप वेगवेगळ्या प्रकारचे पारंपरिक कपडे लागतात. कधी साडी, कधी नऊवार, कधी वनपीस तर कधी लेहेंगा. यातला साडी आणि वनपीस हा प्रकार आपण वारंवार वापरतो. पण लेहेंगा म्हणावा तसा वारंवार वापरला जात नाही. त्यामुळे मग लग्नातल्या एखाद्या समारंभासाठी लेहेंगा ही थीम ठरली असेल तर तो घेण्यासाठी खूप पैसे खर्च करावे वाटत नाहीत (how to wear saree in lehenga style). म्हणूनच फक्त एक- दोन वेळा घालण्यासाठी उगाच महागडा लेहेंगा घेत बसू नका. त्याऐवजी लेहेंगा साडी कशी नेसायची ते पाहा. (saree draping in lehenga style)

लेहेंगा पद्धतीने साडी कशी नेसायची?

 

लेहेंगा पद्धतीने साडी नेसणे अतिशय सोपे आहे. जेव्हा तुम्हाला एखादी साडी लेहेंगा पद्धतीने नेसायची असेल तेव्हा ती साडी थोडी डिझायनर प्रकारातली निवडा. जेणेकरून तुमच्या त्या साडीला लेहेंग्याचा अगदी परफेक्ट लूक येईल.

बार्गेनिंग करायला आवडतं म्हणून रशियन तरुणी चक्क रस्त्यावर उभं राहून....- बघा व्हायरल व्हिडिओ

सगळ्यात आधी त्या साडीच्या खाली घेरदार असा पेटिकोट घाला. cancan skirt असंही त्याला म्हणतात. आता साडीचा जो नेसता पदर आहे तो मागच्या बाजुने डाव्या हाताच्या खालचा जो भाग येतो तिथे खोचा.

नेहमीप्रमाणे साडी नेसताना आपण समोरच्या बाजुने आणि उजव्या दिशेकडून साडी नेसायला सुरुवात करतो. लेहेंगा पद्धतीने साडी नेसताना त्याच्या अगदी विरुद्ध करायचे आहे. 

आता मागच्या बाजुने डाव्या हाताच्या खालच्या भागात साडी खोचून घेतली की कंबरेच्या उजव्या बाजुने लहान लहान दोन ते तीन प्लेट घाला आणि खोचून द्या.

 

अशा पद्धतीने थोडं थोडं अंतर सोडून साडीच्या अगदी लहान- लहान प्लेट्स घालत जा आणि खोचून घेत जा.

लग्नसराईसाठी मराठमोळ्या थाटाचे ऑक्सिडाईज दागिने घ्यायचे? मग 'हे' दागिने तुमच्या कलेक्शनमध्ये असायलाच पाहिजेत

साडीच्या प्लेट्स घालत जेव्हा तुम्ही सुरुवातीला जिथे पदर खोचला होता तिथे आलात की तिथून पुढे प्लेट्स खोचणं बंद करा आणि उरलेला साडीचा भाग पदर म्हणून सोडा.

यानंतर त्या पदराच्या निऱ्या घाला आणि तो उलटा किंवा सुलटा अशा कोणत्याही पद्धतीने घ्या. पदर घेतला की तुमच्या साध्या साडीला लगेचच लेहेंग्याचा लूक येईल. त्यावर मॅचिंग होणारा एखादा छानसा बेल्ट लावला तर तुमचा लूक अधिक स्टायलिश वाटेल. 

 

Web Title: Saree draping tips, how to wear saree in lehenga style, saree draping in lehenga style, how to wear saree looking like lehenga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.