Lokmat Sakhi >Fashion > हा बघा करिना कपूरचा तब्बल ५ लाखांचा चमचमता मेटॅलिक गाऊन, बघा त्या गाऊनची खासियत

हा बघा करिना कपूरचा तब्बल ५ लाखांचा चमचमता मेटॅलिक गाऊन, बघा त्या गाऊनची खासियत

Kareena Kapoor's Golden Metallic Strapeless Gown: जवळपास ५ लाख रुपये (Rs 5 lakh) किमतीचा चमचमता गाऊन घातलेली करिना कपूर गोल्डन लेडी दिसत होती...(Kareena Kapoor is looking golden lady in glossy gown)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2023 03:30 PM2023-12-07T15:30:35+5:302023-12-07T15:31:34+5:30

Kareena Kapoor's Golden Metallic Strapeless Gown: जवळपास ५ लाख रुपये (Rs 5 lakh) किमतीचा चमचमता गाऊन घातलेली करिना कपूर गोल्डन लेडी दिसत होती...(Kareena Kapoor is looking golden lady in glossy gown)

Kareena Kapoor's golden metallic strapeless gown worth Rs 5 lakh, Kareena Kapoor is looking golden lady in glossy gown | हा बघा करिना कपूरचा तब्बल ५ लाखांचा चमचमता मेटॅलिक गाऊन, बघा त्या गाऊनची खासियत

हा बघा करिना कपूरचा तब्बल ५ लाखांचा चमचमता मेटॅलिक गाऊन, बघा त्या गाऊनची खासियत

Highlightsकरिनाने घातलेला हा गाऊन Ralph Lauren या प्रसिद्ध ब्रॅण्डहाऊसचा असून त्याची किंमत ४ लाख ९६ हजार रुपये एवढी आहे.

बॉलीवूड अभिनेत्री करिना कपूर तिच्या स्टाईल, फॅशन सेन्स याबाबत नेहमीच चर्चेत असते. कपडे असो किंवा दागदागिने असो... करिनाच्या बऱ्याच गोष्टी अतिशय महागड्या असतात. आता हेच पाहा ना तिने घातलेल्या चमचमत्या मेटॅलिक गाऊनची सध्या सोशल मिडियावर खूप चर्चा आहे. तिचा हा गाऊन तब्बल ५ लाख रुपये किमतीचा असून या गाऊनमध्ये करिना अगदी गोल्डन लेडी दिसत आहे (Kareena Kapoor is looking golden lady in glossy gown), अशी प्रतिक्रिया तिच्या चाहत्यांनी दिली आहे. बघा तिच्या या महागड्या गाऊनची नेमकी खासियत तरी काय.. (Kareena Kapoor's golden metallic strapeless gown worth Rs 5 lakh)

 

जयपूर येथे नुकत्याच झालेल्या एका सोहळ्यासाठी करिना कपूरने हा स्ट्रेपलेस गाऊन घातला होता. त्याचे बरेच फोटो तिने सोशल मिडियावर शेअर केले आहेत.

फक्त १० रुपयांत घरच्याघरी तयार करा बाॅडीलोशन, हिवाळ्यात त्वचा कोरडी पडणारच नाही..

अगदी गडद सोनेरी रंगाचा हा गाऊन असून तो वरच्याबाजूने घट्ट तर खालच्या बाजूने अतिशय घेरदार आहे. या गाऊनवर खूप जास्त चमक असल्याने करिनाने त्यावर हिऱ्यांचे लोंबते कानातले आणि हातात हिऱ्यांची अंगठी असे एवढेच कमीतकमी दागिने घातले आहेत. तसेच मेकअपही स्मोकी लूक देणारा आहे. 

 

करिनाने घातलेला हा गाऊन Ralph Lauren या प्रसिद्ध ब्रॅण्डहाऊसचा असून त्याची किंमत ४ लाख ९६ हजार रुपये एवढी आहे. या गाऊनला समोरच्या भागात पायाजवळ दोन खिसेही आहेत.

गव्हाच्या पिठाचा चवदार पिझ्झा- मुलांना डब्यातही देता येईल, मैद्याचा विकतचा पिझ्झा नकोच- बघा रेसिपी

ट्रॅडिशनल आणि टेण्डी असं दोन्हींचं कॉम्बिनेशन असणारा हा गाऊन ऑर्गेंझा सिल्क प्रकारातला आहे. ऑर्गेंझा सिल्क अतिशय मऊ- मुलायम आणि आरामदायी म्हणून ओळखलं जातं. त्यामुळेच करिनाच्या या गाऊनची किंमत एवढी जास्त असावी.  

 

Web Title: Kareena Kapoor's golden metallic strapeless gown worth Rs 5 lakh, Kareena Kapoor is looking golden lady in glossy gown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.