Lokmat Sakhi >Celebrity Corner > ना पेनकिलर-ना बाम फक्त 'हे' ४ शब्द म्हंटल्याने कमी होते विद्या बालनची डोकेदुखी, तसं अजबच आहे..

ना पेनकिलर-ना बाम फक्त 'हे' ४ शब्द म्हंटल्याने कमी होते विद्या बालनची डोकेदुखी, तसं अजबच आहे..

Vidya Balan shared a unique headache remedy: आपल्याला वाचून आश्चर्यही वाटेल आणि विचित्रही वाटेल की, बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन कोणत्याही औषधाशिवाय डोकेदुखीचा त्रास दूर करते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 13:49 IST2025-07-16T11:13:08+5:302025-07-16T13:49:29+5:30

Vidya Balan shared a unique headache remedy: आपल्याला वाचून आश्चर्यही वाटेल आणि विचित्रही वाटेल की, बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन कोणत्याही औषधाशिवाय डोकेदुखीचा त्रास दूर करते.

Vidya Balan gets rid of her headache by saying just these 4 words, Know about this strange trick | ना पेनकिलर-ना बाम फक्त 'हे' ४ शब्द म्हंटल्याने कमी होते विद्या बालनची डोकेदुखी, तसं अजबच आहे..

ना पेनकिलर-ना बाम फक्त 'हे' ४ शब्द म्हंटल्याने कमी होते विद्या बालनची डोकेदुखी, तसं अजबच आहे..

Vidya Balan shared a unique headache remedy:  कामाचा वाढता ताण, थकवा, झोप पूर्ण न होणे अशा वेगवेगळ्या कारणांमुळे डोकं दुखणं ही एक कॉमन बाब आहे. काही लोकांची डोकेदुखीची समस्या आपोआप बरी होते, तर काही लोकांना इतका त्रास होतो की, त्यांना पेनकिलर घ्यावी लागते. पण आपल्याला वाचून आश्चर्यही वाटेल आणि विचित्रही वाटेल की, बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) कोणत्याही औषधाशिवाय डोकेदुखीचा (Headache) त्रास दूर करते.

अभिनेत्री विद्या बालन सध्या तिच्या नव्या शॉर्ट हेअर लूकमुळे चांगली चर्चेत आहे. लूक बदलल्यामुळे तिचं वय आणखी कमी दिसू लागलं आहे. तसेच सध्या तिच्या एक मुलाखतीचा व्हिडीओ व्हायरल झाला होत आहे. या मुलाखतीत तिने सांगितलं की, डोकेदुखीचा त्रास झाल्यावर ती कोणतंच औषध घेत नाही. त्याऐवजी ती एक वेगळी ट्रिक वापरून डोकेदुखी दूर करते.

काय आहे ट्रिक?

विद्याने सांगितलं की, जेव्हाही तिचं डोकं दुखतं तेव्हा ती डोळे बंद करून शांत होते आणि हळूहळू 'You Can Leave Now' असं म्हणते. ३ ते ४ वेळा केवळ हे ४ शब्द ती पुन्हा पुन्हा उच्चारते. त्यानंतर डोकेदुखीचा त्रास दूर होतो.

कुणी सांगितला हा उपाय?

विद्यानं सांगितलं की, बालपणी तिची आई तिला एका हीलरकडे घेऊन गेली होती. ही ट्रिक त्या हीलरने तिला सांगितली होती. तेव्हापासून ती ही फॉलो करते. ती म्हणाली की, ऐकायला हे जरा विचित्र वाटू शकतं, पण ही ट्रिक पॉझिटिव्ह सेल्फ-टॉक आणि माइंडफुलनेस मेडिटेशनवर आधारित आहे. ज्यात आपण आपला मेंदू आणि शरीराला हा विश्वास देत असतो की, आपण बरे होत आहोत.  

इतरही काही कॉमन उपाय

पाणी प्या

शरीरात पाणी कमी झाल्यावर डोकेदुखीचा त्रास वाढतो. अशात डोकं दुखत असेल तर एक ते दोन ग्लास पाणी प्यायल्यास आराम मिळू शकतो.

थंड पाण्याची पट्टी

डोकं दुखत असेल तर एक कापड थंड पाण्यात भिजवून कपाळावर पट्टी ठेवा. यानेही आरा मिळू शकतो. 

मसाज करा

खोबऱ्याचं तेल आणि लॅवेंडर ऑइलनं डोक्याची हलकी मसाज केल्यास तणवा आणि वेदना दोन्ही दूर होऊ शकतात.

Web Title: Vidya Balan gets rid of her headache by saying just these 4 words, Know about this strange trick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.