आलिया भट हे सध्या बॉलिवूडमधील एक मोठे नाव आहे. स्टुडंट ऑफ द इयर या करण जोहरच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये तिने प्रवेश केला आणि आज ती फक्त चित्रपट क्षेत्रातच नाही तर बिझनेस, मॉडलिंग क्षेत्रातही प्रसिद्ध आहे. सोशियल इन्फुएन्सर म्हणूनही तिचे नाव मोठे आहे. आलिया तिच्या मुलाखतींमध्ये कायम या यशामागे फक्त कौशल्यच नाही तर इतरही अनेक गोष्टी आहेत असा उल्लेख करते. एवढ्यातच झालेल्या एका फॅशन मॅगझीन शुट दरम्यान आलियाने एक पत्र लिहून ते वाचताना व्हिडिओ केला. (‘Don't stop dreaming!’ - Alia Bhatt wrote a letter to her younger self )हे पत्र इतर कोणासाठी नाही तर स्वतःसाठीच होतो. लहान आलियासाठी मोठ्या आलियाकडून पत्र अशी ही कन्सेप्ट होती. फक्त आलियाच नाही तर अनेक जण स्वतःला प्रोत्साहन देण्यासाठी असे पत्र लिहितात. त्यामुळे आठवणी तर ताज्या होतातच मात्र लहानपणी पाहिलेल्या स्वप्नांना अर्थ नक्कीच असतो आणि ती पूर्ण करण्याची इच्छा आणि तयारी असली तर ते नक्कीच शक्य होते असा संदेश या कृतीतून मिळतो. त्यामुळे आयुष्यात पुढेही स्वप्न पाहणे अर्थपूर्ण वाटायला लागते.
आलियाने लिहिलेले पत्र असे होते की, Dear little me, म्हणजेच लहानपणीच्या आलियासाठी खास पत्र... आलिया म्हणते, " मला माहिती आहे तू कायम मोठी स्वप्न पाहीलीस. ही स्वप्न पाहण्याची सवय अजिबात सोडू नकोस. स्वप्न हीच तुझी खरी ताकद ठरेल." नंतर स्वतःचे पहिले प्रेम आठवत आलिया म्हणाली, " त्या एका मुलासाठी अजिबात रडत बसू नकोस. त्याच्यापेक्षा खुप पटींनी चांगला मुलगा भविष्यात तुझी वाट पाहत आहे. तू विचारही करु शकत नाहीत इतकं प्रेम तुला मिळणार आहे. आनंद, प्रेम आणि जिव्हाळा एकाच माणसात तुला मिळेल. " नंतर राहाचा उल्लेख करताना आलिया भावुक होत म्हणाली, " आई झाल्यावर तुझं आयुष्य अशा काही वळणावर येईल ज्याचा तू कधीच विचार केला नसशील. सगळ्यात मोठा आणि सुखाचा क्षण हाच आहे. त्यामुळे तुझ्यातील प्रेमाची भावना अशीच जपत राहा. आई, बहीण आणि वडील यांच्याशिवाय आपण काहीच नाही त्यांच्यावर कायम प्रेम करत राहा."
फक्त आलियाच नाही असे अनेक जण आहेत जे स्वतःच्या लहानपणातील आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि स्वप्न पाहण्यासाठी प्रेरित होण्यासाठी ही पद्धत वापरतात. बरेचदा इतरांशी संवाद साधून जे स्पष्ट होत नाही किंवा ज्याची जाणीव होत नाही, त्याची जाणीव स्व-संवादातून होते. त्यामुळे असा संवाद साधून पाहण्यात काहीच हरकत नाही. लहानपणापासून आत्तापर्यत माणूस फार बदलतो त्यामुळे आयुष्याचे रिकॅप कधी- कधी फायद्याचे ठरते.
