lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > White Hair Solution : डोक्यावरचे पांढरे केस खूपच वाढत चाल्लेत? 'या' बीयांच्या वापरानं केस राहतील काळेभोर, दाट

White Hair Solution : डोक्यावरचे पांढरे केस खूपच वाढत चाल्लेत? 'या' बीयांच्या वापरानं केस राहतील काळेभोर, दाट

White Hair Solution : जर तुम्ही तरुण वयात पांढऱ्या केसांसाठी आयुर्वेदिक उपचार शोधत असाल, तर तुम्ही फ्लेक्ससीड म्हणजेच आळशीच्या बीया वापरून तुम्ही केस निरोगी ठेवू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 12:10 PM2022-05-23T12:10:17+5:302022-05-23T12:16:46+5:30

White Hair Solution : जर तुम्ही तरुण वयात पांढऱ्या केसांसाठी आयुर्वेदिक उपचार शोधत असाल, तर तुम्ही फ्लेक्ससीड म्हणजेच आळशीच्या बीया वापरून तुम्ही केस निरोगी ठेवू शकता.

White Hair Solution :  Flaxseed for premature white hair home solution mask preparation apply dark | White Hair Solution : डोक्यावरचे पांढरे केस खूपच वाढत चाल्लेत? 'या' बीयांच्या वापरानं केस राहतील काळेभोर, दाट

White Hair Solution : डोक्यावरचे पांढरे केस खूपच वाढत चाल्लेत? 'या' बीयांच्या वापरानं केस राहतील काळेभोर, दाट

वयाच्या 25 ते 30 व्या वर्षी केस पांढरे व्हावेत असे कोणत्याही तरुण वयोगटातील लोकांना कधीच वाटत नाही, परंतु सध्याची विचित्र जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे अशा समस्या सामान्य आहेत.  (Hair Care Tips) अशा स्थितीत, बरेच लोक हेअर डाई करतात जे केमिकलयुक्त असतात आणि केस खराब होतात, म्हणून आपण नैसर्गिक आणि घरगुती उपायांचे पालन करणे महत्वाचे आहे. जर तुम्ही तरुण वयात पांढऱ्या केसांसाठी आयुर्वेदिक उपचार शोधत असाल, तर तुम्ही फ्लेक्ससीड म्हणजेच आळशीच्या बीया वापरून तुम्ही केस निरोगी ठेवू शकता. (White Hairs Solution)

आळशीच्या बीया केसांसाठी का महत्वाच्या आहेत (Flexseeds Benefits)

फ्लेक्ससीड्समध्ये प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे, मॅक्रोन्यूट्रिएंट्स आणि ओमेगा -3 फॅटी ऍसिडस् भरपूर प्रमाणात असतात. ते सॅलड किंवा स्मूदीमध्ये घालून खाल्ले जाऊ शकतात. केसांच्या बाबतीत फ्लेक्ससीड एखाद्या खास खाद्यापेक्षा कमी नाही. त्यामुळे टाळूवर ओलावा राहतो आणि केस चमकदार होतात.

म्हातारे होईपर्यंत दिसणार नाहीत वयवाढीच्या खुणा; 5 ब्यूटी टिप्स वापरा, नेहमी दिसाल तरूण

आळशीचा हेअर मास्क

फ्लॅक्ससीडचा हेअर मास्क तयार करा आणि केसांवर लावा आणि ते कोरडे होण्याची वाट पाहा. नंतर स्वच्छ पाण्याने केस धुवा. असे नियमित केल्याने काही दिवसातच पांढरे केस पुन्हा काळे होऊ लागतात.

हेअर मास्क बनवण्याची योग्य पद्धत

4 कप पाण्यात एक कप फ्लॅक्ससीड्स घ्या. आता ते चांगले उकळवा आणि एका सुती कापडात गुंडाळून बिया पिळून घ्या. आता त्यात एक चमचा खोबरेल तेल आणि कोरफडीचे जेल मिसळा आणि वापरा.
 

Web Title: White Hair Solution :  Flaxseed for premature white hair home solution mask preparation apply dark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.