lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > Skin Care Tips : थंडीत चेहरा खूप कोरडा काळपट, निस्तेज झालाय? चमचाभर हळदीचा 'असा' वापर करून मिळवा ग्लोईंग चेहरा

Skin Care Tips : थंडीत चेहरा खूप कोरडा काळपट, निस्तेज झालाय? चमचाभर हळदीचा 'असा' वापर करून मिळवा ग्लोईंग चेहरा

Skin Care Tips Winter Care Tips 5 : सगळ्यांच्याच स्वयंपाकघरात हळद असतेच. हळदीचा वापर तुम्ही जवळपास ५ प्रकारे त्वचेवर करू शकता. (5 ways to use haldi for glowing skin) 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 01:36 PM2021-11-30T13:36:35+5:302021-11-30T13:37:49+5:30

Skin Care Tips Winter Care Tips 5 : सगळ्यांच्याच स्वयंपाकघरात हळद असतेच. हळदीचा वापर तुम्ही जवळपास ५ प्रकारे त्वचेवर करू शकता. (5 ways to use haldi for glowing skin) 

Skin Care Tips Winter Care Tips : 5 ways to use haldi for glowing skin | Skin Care Tips : थंडीत चेहरा खूप कोरडा काळपट, निस्तेज झालाय? चमचाभर हळदीचा 'असा' वापर करून मिळवा ग्लोईंग चेहरा

Skin Care Tips : थंडीत चेहरा खूप कोरडा काळपट, निस्तेज झालाय? चमचाभर हळदीचा 'असा' वापर करून मिळवा ग्लोईंग चेहरा

हळद (Turmeric) भारतीय स्किन टोनसाठी सर्वात प्रभावी, स्वस्त आणि घरगुती उपचारांपैकी एक आहे. रोज कामासाठी बाहेर पडल्यावर उन्हामुळे त्वचेचा रंग डल पडतो. तर कधी थंडीमुळे कोरेडपणा, काळपटपणा येतो. नेहमी नेहमी पार्लरला जाऊन फेशियल, ब्लिच करायला सगळ्यांनाच वेळ मिळतो असं नाही. (Haldi Skin Benefits) घरच्याघरी काही सोप्या उपायांचा वापर करून तुम्ही ग्लोईंग त्वचा मिळवू शकता. सगळ्यांच्याच स्वयंपाकघरात हळद असतेच. हळदीचा वापर तुम्ही जवळपास ५ प्रकारे त्वचेवर करू शकता. (5 ways to use haldi for glowing skin) या लेखात तुम्हा फेसपॅक कसे बनवायचे

हळद-चंदनाचा फेसपॅक 

गुलाबपाणी, चंदन पावडर आणि मधात हळद मिसळून लावल्यास चेहऱ्यावर मुरुमांची समस्या राहणार नाही. जर लिंबाचा रस तुमच्या त्वचेला अनुकूल असेल तर हा फेस पॅक बनवताना तुम्ही 3 ते 4 थेंब लिंबाचा रस देखील मिक्स करू शकता. यामुळे मुरुमे दूर होतील, चेहरा चमकू लागेल. 

डाग हटवण्यासाठी

अनेक कारणांमुळे चेहऱ्यावर खुणा आणि डाग येतात. कधी मुरुमांमुळे, कधी दुखापतीमुळे. या सर्व प्रकारच्या खुणा पूर्णपणे नाहीशा करण्याची क्षमता हळदीमध्ये आहे. त्वचेवरील डाग दूर करणारा फेस पॅक बनवण्यासाठी ताजे दही आणि बेसनमध्ये हळद मिसळून फेस पॅक बनवा. पॅक सुकल्यावर ताज्या पाण्याने चेहरा धुवा. उन्हाळ्यात चेहरा धुण्यासाठी कोमट पाण्याचाही वापर करू शकता.

वय वाढीच्या खुणा लपवण्यासाठी फेसपॅक

वयाचा प्रभाव त्वचेवर दिसू लागला असला तरी हळदीच्या माध्यमातून तुम्ही स्वतःला तरुण ठेवू शकता. यासाठी तुम्हाला फक्त दोन गोष्टींची गरज आहे. दूध आणि हळद. 3 चमचे दुधात एक चतुर्थांश चमचा हळद मिसळा. आता हे दूध त्वचेवर लावा आणि त्वचा हे दूध त्वचा शोषून घेईपर्यंत हलक्या हाताने मसाज करा. 10 मिनिटे ठेवल्यानंतर, कोमट पाण्याने चेहरा धुवा आणि स्वच्छ करा.

डार्क सर्कल्ससाठी 

डोळ्यांखाली काळी वर्तुळे असतील तर ती दूर करण्यासाठी तांदळाचे पीठ, टोमॅटोचा रस आणि कच्चे दूध यामध्ये हळद मिसळून फेस पॅक बनवा. 20 ते 25 मिनिटे संपूर्ण चेहऱ्यावर ठेवा आणि नंतर ताज्या पाण्याने त्वचा स्वच्छ करा.

ग्लोईंग त्वचेसाठी

त्वचेवरीव गोरेपणा वाढवण्यासाठी गुलाब पाण्यात हळद मिसळून लावा. याचा त्वचेवर फार लवकर परिणाम होतो आणि फक्त 7 दिवसात तुमची त्वचा एक टोन गोरी होते. हा फेस पॅक बनवण्यासाठी 2 चमचे बेसन, अर्धा चमचा हळद आणि 3 चमचे गुलाबपाणी घेऊन पेस्ट बनवा. ही गुळगुळीत पेस्ट त्वचेवर 20 ते 25 मिनिटे लावा आणि नंतर ताज्या पाण्याने चेहरा धुवून टाका.

Web Title: Skin Care Tips Winter Care Tips : 5 ways to use haldi for glowing skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.