lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > आयब्रोज केल्यानंतर स्किन लाल होते? शहनाज हुसैन साांगतात १ उपाय, लालसरपणा, वेदना होतील दूर

आयब्रोज केल्यानंतर स्किन लाल होते? शहनाज हुसैन साांगतात १ उपाय, लालसरपणा, वेदना होतील दूर

Shahnaz Husain Tips On How to Cool Down Skin After Threading : चेहरा चांगला दिसण्यासाठी आयब्रोजचा शेप फार महत्वाचा असतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 05:02 PM2024-02-13T17:02:09+5:302024-02-13T18:54:48+5:30

Shahnaz Husain Tips On How to Cool Down Skin After Threading : चेहरा चांगला दिसण्यासाठी आयब्रोजचा शेप फार महत्वाचा असतो.

Shahnaz Husain Tips On How to Cool Down Skin After Threading : Effective Methods For Fecial Hair Removal | आयब्रोज केल्यानंतर स्किन लाल होते? शहनाज हुसैन साांगतात १ उपाय, लालसरपणा, वेदना होतील दूर

आयब्रोज केल्यानंतर स्किन लाल होते? शहनाज हुसैन साांगतात १ उपाय, लालसरपणा, वेदना होतील दूर

सुंदर दिसण्यासाठी आणि त्वचेवर ग्लो येण्यासाठी लोक आयब्रोज, फोरहेडच्या केसांना शेप देतात. भुवया रेखिव, उठावदार असतील तर चेहऱ्याला एक वेगळाच लूक येतो.  (Effective Methods For Fecial Hair Removal) चेहरा चांगला दिसण्यासाठी आयब्रोजचा शेप फार महत्वाचा असतो. जे लोक आयब्रोज करतात त्यांच्या तुलनेत जे लोक आयब्रोज करत नाही त्यांचा चेहरा फारसा आकर्षक दिसत नाही.  त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही आयब्रोज करताना सोप्या बेसिक स्टेप्स लक्षात ठेवायला हव्यात. (Shahnaz Husain Tips On How to Cool Down Skin After Threading)

त्वचेची जळजळ कमी करण्यासाटी तुम्ही घरगुती वस्तूंचा वापर करू शकता. त्वचा आणि केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी शहनाज हुसैन यांनी काही सोप्या टिप्स सांगितल्या आहेत.  ज्याच्या वापराने तुम्ही लांब आणि दाट केस मिळवू  शकता आणि स्किन एलर्जीचपासूनही बचाव होतो. स्किनला एक कुलिंग इफेक्ट मिळतो.

त्वचेवर बर्फ लावल्याने काय होतं?

स्किन रेडनेस, स्किन एलर्जी बर्फाच्या मदतीने कमी करता येते. कोल्ड कॉम्प्रेसमुळे तुम्हाला गारवा मिळतो. बाऊलमध्ये आईस क्युब्स घ्या आणि आयब्रोज केलेल्या ठिकाणी लावा आणि मसाज करा. जवळपास ५ ते १० मिनिटं लावून ठेवा.  ज्यामुळे त्वचेला गारवा मिळण्यास मदत होईल. 

एलोवेरा जेल लावल्याने काय होईल

त्वचेसाठी एलोवेरा जेल एखाद्या डॉक्टरप्रमाणे काम करते. तुम्ही पॅकच्या स्वरूपात लावू शकता. यातील एंटी ऑक्सिडेंट्स  त्वचेला गारवा देतात.  ज्यामुळे त्वचेला गारवा मिळतो. एलोवेरा जेल लावल्याने त्वचेवर ग्लो येते.

त्वचेवर काकडीचा उपयोग

काकडी त्वचेतील पोर्सना क्लिन करते.  काकडीतील तत्व  कुलिंग इफेक्ट देतात.  यामुळे स्किन एलर्जी रेडनेस  कमी होतो. आणि काकडी किसून एक फेस पॅक तयार करा. काकडीसोबत दही मिक्स करून घ्या आणि चेहऱ्याला लावा. १५ ते २० मिनिटांनी कॉटनच्या कापडाने चेहरा स्वच्छ करा.

टि बॅग्स

फ्रिजमध्ये थोडावेळ  टि बॅग्स ठेवा. या टि बॅग्स आयब्रोजच्या आजूबाजूच्या त्वचेवर ठेवा.  यामुळे त्वचेला गारवा येतो.  ग्रीन टी चा वापर करून चेहऱ्यावर ग्लो आणू शकता. यासाठी 10 मिनिटं आयब्रो एरियावर लावून ठेवा. यामुळे त्वचेला सुथिंग इफेक्ट  येईल आणि स्किन एलर्जी पण होणार नाही. 
 

Web Title: Shahnaz Husain Tips On How to Cool Down Skin After Threading : Effective Methods For Fecial Hair Removal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.