चहाप्रेमी सगळे सगळीकडे पाहायला मिळतात, तसंच आता कॉफीचे शौकिनही भरपूर आहेत.. तरुण लोकांमध्ये तर कॉफीची प्रचंड क्रेझ असते.. मागची पिढी जशी एकमेकांना चहा पिण्याबाबत विचारायची किंवा चहाच्या बहाण्याने गप्पा मारल्या जायच्या तसं आताची तरुण पिढी एकमेकांना कॉफी असं म्हणून विचारते आणि मग त्यांच्या चर्चांना सुरुवात होते. गरमागरम कॉफी आणि तिचा सुगंध कोणालाही हवाहवासाच वाटतो. म्हणूनच तर कॉफीप्रेमींची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. तुम्हालाही कॉफी आवडत असेल तर नक्की प्या कारण कॉफी तुमचं तारुण्य, सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी मदत करते, कॉफी तुमची एजिंग क्रिया हळूवार करते, असं नुकतंच एका सर्व्हेक्षणातून समोर आलं आहे.(Health Benefits Of Coffee)
मायक्रोबायल सेल या जर्नलमध्ये नुकताच एक अभ्यास प्रकाशित करण्यात आला आहे. या अभ्यासानुसार असं समोर आलं आहे की कॉफीमध्ये असलेल्या कॅफीनमध्ये असे काही सुक्ष्म घटक असतात जे आपल्या शरीरातील पेशींचे आयुष्य वाढून त्यांना तरुण ठेवण्यासाठी मदत करतात.
कॉटन साडी नेसताना लक्षात ठेवा ५ टिप्स, नेहमीच दिसाल कमाल, सगळेच म्हणतील 'व्वॉव... '
काही यीस्ट सेल्सवर हा प्रयोग करण्यात आला. त्यामध्ये असं दिसून आलं की जर तुम्ही योग्य प्रमाणात कॉफी घेत असाल तर कॅफीन हे तुमच्या शरीरातल्या पेशींसाठी खूप उपयुक्त ठरतं आणि त्यामुळे ॲंटी एजिंगप्रमाणे परिणाम दिसून येतो.
पण अभ्यासात असंही लिहिलं आहे की याचा अर्थ तुम्ही रोजच भरपूर काॅफी प्यावी असा होत नाही.. अन्यथा त्याचा उलट परिणामही तुमच्या शरीरावर होऊ शकतो.
१ पैसाही खर्च न करता केस स्ट्रेट करा! हेअर स्ट्रेटनर, इस्त्रीचीही गरज नाही, बघा ट्रिक
तज्ज्ञांच्या मते दररोज २ ते ४ कप कॉफी (एका कपामध्ये साधारण १२५ मिली कॉफी) पिणं योग्य आहे. एवढ्या प्रमाणात जर कॉफी घेत असाल तर त्यामुळे तुमचा थकवा जाऊन अंगात तरतरी येण्यासही मदत होते. पण कॉफी पिताना हे देखील लक्षात घ्या की रिकाम्यापोटी तसेच रात्रीच्या वेळी कॉफी घेणं टाळा. तसेच कॉफीमधली साखर कमी ठेवा.