Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > रश्मिका मंदाना चेहऱ्याला असं लावते तरी काय? पाहा, तिच्या तेजस्वी-तजेलदार चेहऱ्याचं गुपीत...

रश्मिका मंदाना चेहऱ्याला असं लावते तरी काय? पाहा, तिच्या तेजस्वी-तजेलदार चेहऱ्याचं गुपीत...

Rashmika Mandanna Skincare Routine Glowing Skin Secrets : ब्राईट टू बी रश्मिका मंदानाचं ब्युटी सिक्रेट नेमकं काय ते समजून घेऊ.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 17:07 IST2026-02-25T16:37:23+5:302026-02-25T17:07:52+5:30

Rashmika Mandanna Skincare Routine Glowing Skin Secrets : ब्राईट टू बी रश्मिका मंदानाचं ब्युटी सिक्रेट नेमकं काय ते समजून घेऊ.

Rashmika Mandanna Skincare Routine Glowing Skin Secrets Beauty Tips Rashmika Mandanna Beauty Secret | रश्मिका मंदाना चेहऱ्याला असं लावते तरी काय? पाहा, तिच्या तेजस्वी-तजेलदार चेहऱ्याचं गुपीत...

रश्मिका मंदाना चेहऱ्याला असं लावते तरी काय? पाहा, तिच्या तेजस्वी-तजेलदार चेहऱ्याचं गुपीत...

अलिकडेच विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदानाच्या लग्नाच्या चर्चा सर्वत्र पसरत आहेत. रश्मिकाचे बरेच फोटो सोशल मीडियावर समोर येत आहेत. हे फोटो पाहून रश्मिकाच्या सौंदर्याची चर्चा पुन्हा एकदा केली जात आहे. कोणताही शो असो किंवा एअरपोर्ट लूक रश्मिका एकदम ग्लोईंग दिसते. रश्मिका एक स्किन केअर रुटीन फॉलो करते जे ती कधीही स्किप करत नाही. ब्राईट टू बी रश्मिका मंदानाचं ब्युटी सिक्रेट नेमकं काय ते समजून घेऊ. (Rashmika Mandanna Skincare Routine Glowing Skin Secrets Beauty Tips Rashmika Mandanna Beauty Secret)

एका मुलाखतीदरम्यान रश्मिकानं प्लास्टीकच्या पिशवीतून आपली स्किन केअर उत्पादनं काढली होती आणि तिनं मॉईश्चराईजर तसंच सिरमचा वापर करण्याबाबत सांगितले.  हे पदार्थ स्किन हेल्दी ठेवण्यासोबतच चमकदार आणि स्वच्छ ठेवण्यासही मदत करतात. स्किन केअरमध्ये आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार योग्य मॉईश्चरायजर आणि फेस सिरमचा वापर करायला हवा. 

रश्मिका मंदानानं इंस्टाग्रावर मेकअप करण्याआधीच्या स्किन केअर रुटीनबाबत सांगितले आहे. तिनं ब्रश केल्यानंतर माईल्ड फेस वॉशनं आपला चेहरा धुवून स्वच्छ केला. नंतर तिनं आपल्या चेहऱ्याला मॉईश्चरायजर लावले. मॉईश्चरायजर दीर्घकाळ लावून ठेवल्यास त्वचा मऊ-हायड्रेट राहण्यास मदत होते. तसंच त्वचा लवकर ड्रायसुद्धा होत नाही. त्यानंतर रश्मिका सनस्क्रीन लावते. जो तिच्या स्किन केअरचा एक महत्वाचा भाग आहे. सनस्क्रीन आपल्या त्वचेला सुर्याच्या हानीकारक किरणांपासून बचाव करण्यास मदत करते. म्हणून सनस्क्रीन स्किप करू नये.


आपली त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी ती मायसेलर वॉटरचा उपयोग करते. दिवसातून 2 वेळा या उपायानं चेहरा स्वच्छ करते. ज्यामुळे त्वचा फ्रेश आणि ऑईल फ्री राहण्यास मदत होते. याशिवाय त्वचा हेल्दी आणि निरोगी ठेवण्यासाठी रश्मिका आपल्या आहारावर व्यवस्थित लक्ष देते. प्रोटीनयुक्त पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करते. ज्यामुळे चेहऱ्यावरचा नैसर्गिक ग्लो वाढण्यास मदत होते.

नो मेकअप लूक

तुम्ही पाहिलं असेल की रश्मिका मंदानाला मेकअप करायला खूप आवडत असलं तरी ती नेहमी मिनिमल मेकअपमध्येच दिसते. कारण जास्त मेकअप केल्यामुळे त्वचेवर एजिंग साईंन्स वाढतात. ब्रेकआऊट होण्याची शक्यता असते. म्हणून नो मेकअप लूक रश्मिकाला जास्त आवडतो.

Web Title : रश्मिका मंदाना की चमकदार त्वचा का राज़: स्किनकेयर रूटीन का खुलासा।

Web Summary : रश्मिका मंदाना की चमकदार त्वचा का राज़ है उनका नियमित स्किनकेयर रूटीन। वह मॉइस्चराइजर, सीरम, माइल्ड फेस वॉश और सनस्क्रीन का इस्तेमाल करती हैं। स्वस्थ त्वचा के लिए वह स्वस्थ आहार और कम मेकअप पर जोर देती हैं।

Web Title : Rashmika Mandanna's skincare routine revealed for glowing and healthy skin.

Web Summary : Rashmika Mandanna's glowing skin is due to her consistent skincare routine. She uses moisturizer, serum, mild face wash, and sunscreen. She emphasizes a healthy diet and prefers a minimal makeup look to maintain healthy skin.