lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > केस पांढरे झालेत पण डायची सवय नको? कांद्याचे सालं या पद्धतीने लावा-नॅचरल काळा रंग येईल

केस पांढरे झालेत पण डायची सवय नको? कांद्याचे सालं या पद्धतीने लावा-नॅचरल काळा रंग येईल

Onion Peel For Grey Hairs : केमिकल्सयुक्त उत्पादनांच्या संपर्कात आल्यामुळे केसांची वाढ व्यवस्थित होत नाही आणि केस जास्तीत जास्त पांढरे  होत जातात.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 01:50 PM2024-03-12T13:50:03+5:302024-03-12T15:49:36+5:30

Onion Peel For Grey Hairs : केमिकल्सयुक्त उत्पादनांच्या संपर्कात आल्यामुळे केसांची वाढ व्यवस्थित होत नाही आणि केस जास्तीत जास्त पांढरे  होत जातात.

Onion Peel For Grey Hairs : How to Use Onion Peel For Turn Grey Hairs into Black | केस पांढरे झालेत पण डायची सवय नको? कांद्याचे सालं या पद्धतीने लावा-नॅचरल काळा रंग येईल

केस पांढरे झालेत पण डायची सवय नको? कांद्याचे सालं या पद्धतीने लावा-नॅचरल काळा रंग येईल

वाढत्या वयात केस पांढरे होणं खूपच कॉमन आहे. केस काळे करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे हेअर डाय आणि तेल उपलब्ध आहेत. (Hair Care Tips) केमिकल्सयुक्त उत्पादनांच्या संपर्कात आल्यामुळे केसांची वाढ व्यवस्थित होत नाही आणि केस जास्तीत जास्त पांढरे  होत जातात. (Onion Peel For Grey Hairsपैसे घालवून हानीकारक डाय वापरण्यापेक्षा तुम्ही कमीत कमी खर्चात किचनमधील वस्तूंचा वापर करून तुम्ही काळेभोर केस मिळवू शकता. (Hair Care Tips)

कांद्याचे साल केसांसाठी कसे फायदेशीर ठरते?

सगळ्यात आधी कांद्याची सालं भाजून घ्या. कांद्याची सालं भाजून घ्या आणि कांद्याची सालं मिक्सरच्या भांड्यात फिरवून घ्या. मिक्सरच्या भांड्यातून कांद्याची सालं काढून एका वाटीत काढून घ्या.(Surprising Health Benefits Of Onion) त्यात एलोवेरा जेल मिसळून घ्या. तेल घालून एक मिश्रण तयार करून घ्या. ही पेस्ट केसांना लावा अर्ध्या तासाने केस स्वच्छ धुवून घ्या. आठवड्यातून 3 ते 4 वेळा हा उपाय केल्यास  केस लांबसडक आणि दाट होण्यास मदत होईल.

कांद्याच्या सालीचे आरोग्यदायी फायदे

कांद्याच्या सालीमध्ये अनेक पोषक तत्व असतात. यात व्हिटामीन ए, सी ई यांसारखे एंटी ऑक्सिडेंट्स असतात.  यात व्हिटामीन ए, सी, ई यांसारखे शक्तिशाली एंटी इंफ्लेमेटरी गुण असतात.  व्हिटामीन  ए ने परिपूर्ण कांद्याची सालं डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम ठरतात ज्यामुळे त्वचेचा पोत सुधारतो व्हिटामीन सी ने परिपूर्ण असल्यामुळे संक्रमणाशी लढण्यास मदत होईल, इम्यूनिटी वाढवण्यासही मदत होईल.व्हिटामीन ई ने त्वचा आणि हार्ट हेल्थसुद्धा चांगली राहते. यात फ्लेवोनोइड्स असतात ज्यामुळे हार्ट हेल्थ चांगली राहते आणि कोलेस्टेरॉल लेव्हलही नियंत्रणात राहते.

कांद्याची सालं केसांना लांब, काळे करण्यासाठी फायदेशीर ठरतो. कांद्याच्या सालीत सल्फर जास्त प्रमाणात असते. ज्यामुळे  कोलेजन वाढते. कांद्याची सालं नॅच्युरल हेअर डायच्या स्वरूपात केसांना लावू शकता ज्यामुळे केसांना गोल्डन ब्राऊन रंग मिळतो.  केसांना कांद्याचे पाणी लावण्यासाठी कांद्याची सालं पाण्यात उकळवून घ्या. त्यानंतर गाळून हे पाणी केसांना लावा. धुण्याच्या ३० मिनिटं आधी सुकू द्या.ज्यामुळे केसांना स्ट्राँग कलर मिळतो.

Web Title: Onion Peel For Grey Hairs : How to Use Onion Peel For Turn Grey Hairs into Black

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.