Join us

केस विंचरताना मूठभर केस गळून पडतात? कांद्याच्या रसात २ पदार्थ मिसळून लावा, मिळवा दाट केस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 13:54 IST

How To Stop Hair Fall Quickly : काही घरगुती उपाय यावर फायदेशीर ठरू शकतात. कांद्याचा रस हा एक प्रभावी उपाय आहे.

एका दिवसाला १०० पेक्षा जास्त केस गळणं याला हेअर फॉल म्हणतात. ही समस्या पुरूषांसह महिलांमध्येही उद्भवते. पण केस गळणं सतत उद्भवत असेल तर केसांना टक्कल पडू शकतं (How To Regrow Hair On Bald). या समस्येपासून  सुटका मिळवण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या हेअर केअर प्रोडक्ट्सचा वापर करत असाल. यातील हानीकारक केमिकल्स केसांचे अधिक नुकसान होण्यापासून रोखतात. (Mix These 2 Ingredients In Onion Water And Get Long Hairs)

काही घरगुती उपाय यावर फायदेशीर ठरू शकतात. कांद्याचा रस हा एक प्रभावी उपाय आहे. कांद्याचा रस  केसांना लावल्यानं केसांची चांगली वाढ होते. (How To Regrow Hair On Bald Spot Apply These 2 Things Mixed With Onion Juice For Fast Hair Growth)

कांद्याच्या रसात सल्फर मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे केसांची मुळं मजबूत होतात आणि केस तुटत नाहीत. याव्यतिरिक्त कांद्यातील एंटी ऑक्सिडेंटस, एंटी बॅक्टेरिअल गुण केसांच्या अनेक समस्यांपासून वाचवतात. कोंडा, पांढरे केस, स्काल्पमधील खाजेची समस्या  कमी होते.

नारळाच्या तेलाबरोबर हे मिश्रण लावा

हेअर फॉलची समस्या  दूर करण्यासाठी कांद्याचा रस आणि नारळाच्या तेलाचे मिश्रण एक उत्तम पर्याय आहे. नारळाच्या तेलात एंटी बॅक्टेरिअल आणि एंटी फंगल गुण असतात. ज्यामुळे केसांच्या समस्या दूर होतील. ज्यामुळे केसांना पोषण मिळेल आणि केस मजबूत होतील.

कांद्याचा रस काढून त्यात १ ते २ चमचे नारळाचं तेल  मिसळा, नंतर हे मिश्रण व्यवस्थित मिसळून स्काल्प आणि केसांच्या मुळांना लावा.  ३० ते ४५ मिनिटं तसंच लावलेलं राहू द्या. माईल्ड शॅम्पूनं केस धुवा. चांगल्या परिणामांसाठी हे मिश्रण आठवड्यातून २ ते ३ वेळा लावा.

कांद्याचा रस आणि एलोवेरा जेलचे मिश्रण केस गळणं थांबवते. एलोवेरातील एंटी ऑक्सिडेंट्स केसांना व्यवस्थित वाढवतात आणि त्यामुळे स्काल्प हायड्रेट राहतो. केसांची मुळं मजबूत होतात आणि केस डॅमेज होत नाहीत.

 हळदी कुंकवासाठी घ्या २० रुपयांत आकर्षक वस्तू, पाहा पर्याय-वाण लुटा मनसोक्त

२ चमचे एलोवेरा जेलमध्ये ३ ते ४ चमचे कांद्यांचा रस घालून व्यवस्थित मिसळून घ्या. हे मिश्रण केसांच्या मुळांना व्यवस्थित  लावा. ३० ते ६० मिनिटं तसंच सोडल्यानंतर माईल्ड शॅम्पूनं केस धुवा. आठवड्यातून २ वेळा हे मिश्रण लावल्यानं केस गळणं कमी होईल.

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइलब्यूटी टिप्सत्वचेची काळजी