lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > अंडरआर्म्सच्या काळेपणामुळे स्लिव्ह्जलेस ड्रेस घालता येत नाही? १ खास उपाय, काखेतला काळेपणा कायमचा जाईल

अंडरआर्म्सच्या काळेपणामुळे स्लिव्ह्जलेस ड्रेस घालता येत नाही? १ खास उपाय, काखेतला काळेपणा कायमचा जाईल

How To Clean Underarms: काखेमध्ये खूपच काळेपणा झाला असेल तर तो घालविण्यासाठी हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा. (home remedies for removing blackness of underarms)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2024 01:16 PM2024-04-12T13:16:01+5:302024-04-12T14:33:00+5:30

How To Clean Underarms: काखेमध्ये खूपच काळेपणा झाला असेल तर तो घालविण्यासाठी हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा. (home remedies for removing blackness of underarms)

How to clean underarms, home remedies for removing blackness of underarms | अंडरआर्म्सच्या काळेपणामुळे स्लिव्ह्जलेस ड्रेस घालता येत नाही? १ खास उपाय, काखेतला काळेपणा कायमचा जाईल

अंडरआर्म्सच्या काळेपणामुळे स्लिव्ह्जलेस ड्रेस घालता येत नाही? १ खास उपाय, काखेतला काळेपणा कायमचा जाईल

Highlightsआठवड्यातून दोन वेळा हा उपाय करा. यामुळे काख काळवंडणार नाही. 

सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे बऱ्याच जणी एरवी वापरत नसल्या तरी उन्हाळ्यात मात्र उकाड्यामुळे स्लिव्हलेस ड्रेस, स्लिव्हलेस ब्लाऊज हमखास वापरतात. पण असे स्लिव्हलेस कपडे वापरताना नेमकी अशी अडचण होते की काखेमध्ये खूप जास्त काळेपणा असल्याने स्लिव्हलेस घालायला नकोसं वाटतं. मेगा स्लिव्ह्ज असणारे कपडेही घालायला नकोसे वाटतात. कारण उगाच चुकून सगळ्यांसमोर हात वर घेतला तर अंडरआर्म्सचा काळेपणा इतरांना दिसण्याची भीती वाटते (How to clean underarms). असं तुमचंही होत असेल तर काखेतला काळेपणा घालविण्यासाठी कोणता उपाय करायचा ते बघा...(home remedies for removing blackness of underarms)

 

अंडरआर्म्सचा काळेपणा घालविण्यासाठी उपाय

अंडरआर्म्सचा किंवा काखेतला काळेपणा घालविण्यासाठी कोणता उपाय करावा, याविषयीचा एक व्हिडिओ hindi_ayurveda या पेजवर शेअर करण्यात आला आहे.

 

कस्टमाईज मंगळसूत्र पेंडंटचा भन्नाट ट्रेण्ड, सांगा तुम्हाला कोणतं आवडलं?

हा उपाय केल्याने काखेतला काळेपणा कायमचा जाऊ शकतो, असं सांगण्यात आलं आहे. आता कायमचा जाईल की नाही हे सांगता येत नाही, पण बऱ्याच प्रमाणात तो नक्कीच कमी होऊ शकतो. कारण त्यात वापरण्यात आलेले सगळेच घटक हे नॅचरल ब्लिचिंग एजंट म्हणून ओळखले जातात.

 

हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये १ चमचा बेकिंग सोडा, १ चमचा कॉफी पावडर, १ चमचा टोमॅटो सॉस आणि १ चमचा लिंबाचा रस पिळा. हे सगळं मिश्रण व्यवस्थित कालवून एकजीव करून घ्या. 

मुक्ता बर्वे ते करिना कपूर... जुन्या साडीचा स्टायलिश ड्रेस शिवण्यासाठी सेलिब्रिटींकडून घ्या खास टिप्स

आता हा लेप काखेत लावा आणि ५ ते १० मिनिटे तसाच राहू द्या. त्यानंतर चोळून- चोळून काढून टाका. नंतर पाण्याने काख स्वच्छ धुवून घ्या. काखेतला काळेपणा बऱ्याच प्रमाणात कमी झालेला दिसेल. 

आठवड्यातून दोन वेळा हा उपाय करा. यामुळे काख काळवंडणार नाही. 

 

Web Title: How to clean underarms, home remedies for removing blackness of underarms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.