मुक्ता बर्वे ते करिना कपूर... जुन्या साडीचा स्टायलिश ड्रेस शिवण्यासाठी सेलिब्रिटींकडून घ्या खास टिप्स

Published:April 12, 2024 09:20 AM2024-04-12T09:20:40+5:302024-04-12T09:25:02+5:30

मुक्ता बर्वे ते करिना कपूर... जुन्या साडीचा स्टायलिश ड्रेस शिवण्यासाठी सेलिब्रिटींकडून घ्या खास टिप्स

सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे जर एखाद्या कार्यक्रमात घालण्यासाठी जुन्या सिल्क साडीचा सुंदर ड्रेस शिवून घ्यावा, असा विचार करत असाल तर सेलिब्रिटींचे हे काही स्टायलिश लूक पाहून घ्या...

मुक्ता बर्वे ते करिना कपूर... जुन्या साडीचा स्टायलिश ड्रेस शिवण्यासाठी सेलिब्रिटींकडून घ्या खास टिप्स

'नाच गं घुमा' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुक्ता बर्वे सध्या हा ड्रेस घालत आहे. तिचा हा लूक सोशल मिडियावर चांगलाच गाजत असून तुम्हीही लग्नसराईसाठी या प्रकारचा ड्रेस शिवून घेऊ शकता.

मुक्ता बर्वे ते करिना कपूर... जुन्या साडीचा स्टायलिश ड्रेस शिवण्यासाठी सेलिब्रिटींकडून घ्या खास टिप्स

करिना कपूरचा हा वेगळ्या पॅटर्नचा ड्रेस पाहा. कॉन्ट्रास्ट रंग असणाऱ्या दोन साड्या वापरून तुम्ही अशा पद्धतीचा ड्रेस शिवून घेऊ शकता.

मुक्ता बर्वे ते करिना कपूर... जुन्या साडीचा स्टायलिश ड्रेस शिवण्यासाठी सेलिब्रिटींकडून घ्या खास टिप्स

मलायका अरोराने घातलेला हा ड्रेसही तशाच प्रकारचा आहे. अशा छान चमकदार साड्या निवडा आणि त्यांचा असा सुंदर ड्रेस शिवा...

मुक्ता बर्वे ते करिना कपूर... जुन्या साडीचा स्टायलिश ड्रेस शिवण्यासाठी सेलिब्रिटींकडून घ्या खास टिप्स

अनिता दाते हिच्यासारखा असा पैठणीचा ड्रेस शिवून पाहा. लग्नसराईमध्ये असे ड्रेस एकदम ट्रेण्डी ठरतात.

मुक्ता बर्वे ते करिना कपूर... जुन्या साडीचा स्टायलिश ड्रेस शिवण्यासाठी सेलिब्रिटींकडून घ्या खास टिप्स

जुन्या साडीचा नव्या पद्धतीने स्टायलिश ड्रेस कसा शिवायचा, यासाठी ही आणखी एक आयडिया घ्या...

मुक्ता बर्वे ते करिना कपूर... जुन्या साडीचा स्टायलिश ड्रेस शिवण्यासाठी सेलिब्रिटींकडून घ्या खास टिप्स

जुन्या साडीचा असा घेरदार स्कर्ट घेऊन तो कॉन्ट्रास्ट रंगाच्या एखाद्या टॉपसोबत मॅच करू शकता. किंवा साडी आणि पदर वेगवेगळ्या रंगाचे असतील तर पदराचा टॉप शिवा आणि साडीच्या इतर भागाचा घेरदार स्कर्ट शिवा.