lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > मांड्यांच्या आतला भाग काळपट झालाय? उजळदार त्वचेसाठी ५ उपाय, शहनाज हुसैननं दिल्या खास टिप्स

मांड्यांच्या आतला भाग काळपट झालाय? उजळदार त्वचेसाठी ५ उपाय, शहनाज हुसैननं दिल्या खास टिप्स

How to get rid of inner thigh blackness : काळ्या मांड्यांपासून सुटका मिळवण्यासाठी केवळ ब्यूटी प्रॉडक्ट्स नव्हे तर अशा इतर नैसर्गिक पद्धती वापरता येऊ शकतात. सौंदर्य तज्ज्ञ शहनाज हुसैन यांनी काळ्या मांड्यांचं टॅनिंग निघण्यासाठी काही टिप्स शेअर केल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 01:38 PM2022-01-18T13:38:20+5:302022-01-18T13:59:22+5:30

How to get rid of inner thigh blackness : काळ्या मांड्यांपासून सुटका मिळवण्यासाठी केवळ ब्यूटी प्रॉडक्ट्स नव्हे तर अशा इतर नैसर्गिक पद्धती वापरता येऊ शकतात. सौंदर्य तज्ज्ञ शहनाज हुसैन यांनी काळ्या मांड्यांचं टॅनिंग निघण्यासाठी काही टिप्स शेअर केल्या आहेत.

How to get rid of inner thigh blackness : Shahnaz husain tips to get rid of dark inner thighs naturally | मांड्यांच्या आतला भाग काळपट झालाय? उजळदार त्वचेसाठी ५ उपाय, शहनाज हुसैननं दिल्या खास टिप्स

मांड्यांच्या आतला भाग काळपट झालाय? उजळदार त्वचेसाठी ५ उपाय, शहनाज हुसैननं दिल्या खास टिप्स

शरीराचे असे अनेक भाग आहेत, जे नेहमी झाकलेले असतात, तरीही ते काळे दिसतात. मान, कोपर याशिवाय मांडीवरही हा प्रकार दिसून येतो. (How to remove tanning from body) मात्र, मांड्यांची त्वचा अतिशय नाजूक असते.  नेहमीच मांडीचा वरचा भाग नेहमीच कापडानं झाकलेला असतो.  (How to get rid of inner thigh blackness) तरीही काळपटपणा दिसतो. काळ्या मांड्यांपासून सुटका मिळवण्यासाठी केवळ ब्यूटी प्रॉडक्ट्स नव्हे तर अशा इतर नैसर्गिक पद्धती वापरता येऊ शकतात. सौंदर्य तज्ज्ञ शहनाज हुसैन यांनी काळ्या मांड्यांचं टॅनिंग निघण्यासाठी काही टिप्स शेअर केल्या आहेत, ज्या तुम्ही वापरून पाहू शकता. (Skin Care Tips) 


 

लिंबू आणि हळदयुक्त क्रीम

बाजारात अनेक प्रकारच्या क्रीम्स, लोशन आणि तेलं उपलब्ध आहेत. अशा स्थितीत, काळ्या मांड्यांच्या समस्येसाठी लिंबू आणि हळद असलेली क्रीम वापरली जाऊ शकते. ते त्वचेला इजा न करता मऊ ठेवण्यास मदत करते. यासोबतच रोजच्या वापराने रंगही उजळदार होईल.  जर तुम्ही आंघोळीच्या वेळी तेल लावले तर तुम्ही त्वचेला घासण्यासाठी लूफा किंवा रफ टॉवेल वापरू शकता. त्याच्या मदतीने मांडीवरची मृत त्वचा निघून जाईल. इतकेच नाही तर ते रक्ताभिसरण देखील सुधारेल, जे त्वचा निरोगी बनवण्यासाठी खूप महत्वाचे आहे.

तेलानं मसाज करा

आंघोळीपूर्वी मांडीला तेलाने मसाज करा कारण त्वचा मुलायम बनवणे खूप गरजेचे आहे. मसाजसाठी तुम्ही तिळाचे तेल, ऑलिव्ह ऑईल किंवा सूर्यफूल तेल वापरू शकता. तुम्ही आंघोळीसाठी सामान्य साबणही वापरू शकता. गरम पाणी अजिबात वापरू नका. जर तुम्ही मांड्यांवर लूफा किंवा रफ टॉवेल वापरत असाल तर हलक्या हातांनी घासून घ्या. रफ हातांनी घासल्याने जखमा होण्याची भीती असते.

एलोवेरा जेल

आंघोळीनंतर लगेच, त्वचा ओलसर असताना बॉडी लोशन लावा. जर त्वचा खूप कोरडी असेल तर तुम्ही रोज क्रीम  वापरू शकता. त्वचेवर क्रीम लावल्यानंतर त्याची चांगली मसाज करा जेणेकरून ती सहज शोषले जाईल. याशिवाय तुम्हाला हवे असल्यास तुम्ही एलोवेरा जेल देखील लावू शकता. १५ मिनिटांनी साध्या पाण्याने धुवा.

बॉडी स्क्रब किंवा पॅकचा वापर

काळ्या मांड्यांपासून आराम मिळविण्यासाठी, बॉडी स्क्रब किंवा पॅक देखील उपयुक्त ठरू शकतो. यासाठी तीळ, पुदिन्याची सुकी पाने आणि मध मिसळा. तुमच्या त्वचेनुसार तिन्ही समान प्रमाणात घ्या. त्याच वेळी, तीळ चांगले कुस्करून पानांची पावडर बनवा. तिन्ही पदार्थ नीट मिसळल्यानंतर मांडीच्या त्वचेवर लावा.

हलक्या हातांनी गोलाकार हालचालीत घासा. यानंतर 10 मिनिटे असेच राहू द्या आणि नंतर सामान्य पाण्याने धुवा. या पॅकमुळे टॅन दूर होईल आणि रंगही गोरा होईल. तसेच, मध त्वचेला मॉइश्चरायझ आणि मऊ करण्यासाठी काम करेल. याशिवाय, तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही तांदूळ पावडर, दही आणि हळद मिसळून पॅक तयार करू शकता. तिन्ही सम प्रमाणात घेऊन पॅक बनवा आणि मांड्यांना लावा. नंतर हातानं घासून पाण्याने धुवा. या पद्धतीनं तुम्ही काळपट त्वचेची काळजी घेतली तर त्वचा ग्लोईंग होण्यास मदत होईल. 

Web Title: How to get rid of inner thigh blackness : Shahnaz husain tips to get rid of dark inner thighs naturally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.