Lokmat Sakhi >Beauty > हंसिका मोटवाणी की माधुरी दीक्षित? कोणाची रफल साडी तुम्हाला जास्त आवडतेय?

हंसिका मोटवाणी की माधुरी दीक्षित? कोणाची रफल साडी तुम्हाला जास्त आवडतेय?

Ruffled Saree Look: दोघींचीही साडी निळ्याशार रंगाची असून जवळपास सारखीच आहे.. त्यामुळे कोणाची साडी आणि कोण अधिक खुलून दिसते आहे, हे सांगणं खरोखरच त्यांच्या चाहत्यांसाठी कठीण झालं आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2022 08:17 AM2022-09-29T08:17:40+5:302022-09-29T08:20:01+5:30

Ruffled Saree Look: दोघींचीही साडी निळ्याशार रंगाची असून जवळपास सारखीच आहे.. त्यामुळे कोणाची साडी आणि कोण अधिक खुलून दिसते आहे, हे सांगणं खरोखरच त्यांच्या चाहत्यांसाठी कठीण झालं आहे.

Hansika Motwani or Madhuri Dixit? Whose ruffled saree is more attractive? | हंसिका मोटवाणी की माधुरी दीक्षित? कोणाची रफल साडी तुम्हाला जास्त आवडतेय?

हंसिका मोटवाणी की माधुरी दीक्षित? कोणाची रफल साडी तुम्हाला जास्त आवडतेय?

Highlightsआता तुम्हीच या दोघींच्या साड्या बघा आणि कोणाची साडी अधिक देखणी हे सांगा. 

अभिनेत्री आणि त्यांच्या महागड्या साड्या, कपडे, दागदागिने या गोष्टी नेहमीच चर्चेचा विषय असतात. तरुणी आणि महिला वर्गात या गोष्टी नेहमीच व्हायरल (viral photos of Hansika Motwani and Madhuri Dixit) असतात आणि जमेल तसे ते फॉलो करण्याचा प्रयत्नही अनेक जणी करत असतात. आता अशीच एक चर्चा सुरू झाली आहे ती धकधक गर्ल माधुरी दीक्षित आणि दाक्षिणात्य सुंदरी हंसिका मोटवाणी यांच्या साड्यांविषयी. या दोघींनीही जवळपास सारख्याच रंगाची साडी नेसली असून दोघींचीही साडी रफल प्रकारात मोडणारी आहे. त्यामुळे या दोघींपैकी कोणाची साडी अधिक छान आणि कोण अधिक देखणी, अशी चर्चा त्यांच्या चाहत्यांमध्ये रंगली आहे.

 

हंसिकाने काही दिवसांपुर्वी ही साडी नेसली होती. तेव्हाचे तिचे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत. रॉयल ब्लू या रंगाची तिची साडी असून साडीवर एम्ब्रॉयडरी केलेली आहे.

दुसरीतल्या मुलांनी बनवली चटकदार भेळ; आणि त्याहून भारी त्यांचा चटपटीत व्हायरल व्हिडिओ.. पाहा ही बिंधास्त मुले

या निळ्याशार साडीवर हंसिकाने सिक्विन प्रकारातलं मल्टीकलर स्ट्रेपी ब्लाउज घातलं होतं. तसेच गळ्यात ऑक्सिडाईज ज्वेलरी होती. साडी आणि दागिने यांच्यानुसार परफेक्ट मेकअप केल्याने ती खरोखरच देखणी दिसत होती. तिची ही साडी पाहून माधुरी दीक्षितच्या चाहत्यांना माधुरीने मागच्या वर्षी नेसलेली अशीच साडी आठवली. 

 

माधुरीने नेसलेली साडीदेखील निळ्या रंगात मोडणारीच होती. शिवाय तिची साडीही रफल प्रकारातलीच होती. हंसिकाच्या साडीला बॉर्डर नव्हती. पण माधुरीच्या साडीला मात्र सुंदर नाजूक काठ आहेत.

नवरात्री स्पेशल व्यायाम: करा फक्त हे ‘एक’ आसन, पोटावरची चरबी होईल कमी-दिसाल एकदम फिट

या काठांवर एम्ब्रॉयडरी केलेली दिसून आली. खालच्या बाजूला तिच्या साडीला ३ झालरी आहेत. माधुरीनेही या साडीवर स्लिव्हलेस ब्लाउज घालणे पसंत केले आहे. डार्क लिपस्टिक आणि मोठे झुमके यामुळे माधुरीही नेहमीप्रमाणेच सदाबहार दिसते आहे. आता तुम्हीच या दोघींच्या साड्या बघा आणि कोणाची साडी अधिक देखणी हे सांगा. 
 

Web Title: Hansika Motwani or Madhuri Dixit? Whose ruffled saree is more attractive?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.