Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > डोळ्याखालची काळी वर्तुळे काही केल्या जात नाहीत ? ट्रिटमेंट नाही मनाला आरामाची गरज, पाहा डोळे का दिसतात मलूल

डोळ्याखालची काळी वर्तुळे काही केल्या जात नाहीत ? ट्रिटमेंट नाही मनाला आरामाची गरज, पाहा डोळे का दिसतात मलूल

can't get rid of dark circles? stop doing beauty treatments the mind needs rest, see why the eyes look tired : डोळे दमलेले दिसण्यामागील कारण म्हणजे डार्क सर्कल्स. पाहा कसा करायचा उपाय.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2025 17:18 IST2025-12-23T17:15:36+5:302025-12-23T17:18:32+5:30

can't get rid of dark circles? stop doing beauty treatments the mind needs rest, see why the eyes look tired : डोळे दमलेले दिसण्यामागील कारण म्हणजे डार्क सर्कल्स. पाहा कसा करायचा उपाय.

can't get rid of dark circles? stop doing beauty treatments the mind needs rest, see why the eyes look tired | डोळ्याखालची काळी वर्तुळे काही केल्या जात नाहीत ? ट्रिटमेंट नाही मनाला आरामाची गरज, पाहा डोळे का दिसतात मलूल

डोळ्याखालची काळी वर्तुळे काही केल्या जात नाहीत ? ट्रिटमेंट नाही मनाला आरामाची गरज, पाहा डोळे का दिसतात मलूल

डोळ्यांखाली दिसणारी काळी वर्तुळे म्हणजेच डार्क सर्कल्स ही आजकालची खूप सामान्य समस्या झाली आहे. चेहरा थकलेला, उदास आणि वयापेक्षा मोठा दिसण्यामागे डार्क सर्कल्सचा मोठा वाटा असतो. अनेकदा लोक फक्त झोप कमी झाली म्हणून डार्क सर्कल्स होतात असे मानतात, पण प्रत्यक्षात त्यामागे अनेक कारणे असतात. (can't get rid of dark circles? stop doing beauty treatments the mind needs rest, see why the eyes look tired )त्यातील एक महत्त्वाचे कारण म्हणजे मानसिक ताण.

डार्क सर्कल्स होण्यामागे झोपेचा अभाव, सतत स्क्रीनकडे पाहणे, चुकीचा आहार, शरीरातील पाण्याची कमतरता, आनुवंशिकता, वाढते वय आणि हार्मोनल बदल ही कारणे असू शकतात. नको तेवढ्या प्रमाणात मेकअप लावण्याचाही परिणाम डोळ्यांवर होतो. मात्र मानसिक ताण हा या सगळ्यांत खूप दुर्लक्षित घटक आहे. डार्क सर्कल्स घालवण्यासाठी लोकं ब्यूटी ट्रिटमेंट्स घेतात. पण आरोग्याची काळजी घ्यायची राहून जाते. सततचा ताण, चिंता, अस्वस्थता किंवा जास्त विचार केल्यामुळे झोपेची गुणवत्ता बिघडते. त्यामुळे रक्ताभिसरणावर परिणाम होतो आणि डोळ्यांखालील त्वचा अधिक गडद दिसू लागते. ताणामुळे शरीरात कोर्टिसोल नावाचे हार्मोन वाढते, जे त्वचेच्या आरोग्यावरही वाईट परिणाम करते.

डार्क सर्कल्स घालवण्यासाठी सवयी बदलणे फार गरजेचे आहे. रोज पुरेशी आणि शांत झोप घेणे ही सर्वात महत्त्वाची सवय आहे. झोपताना मोबाइल, लॅपटॉप यांचा वापर टाळावा. दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढून ध्यान, प्राणायाम किंवा साधे श्वसनाचे व्यायाम करावेत, त्यामुळे मानसिक ताण कमी होतो. भरपूर पाणी पिणे, हिरव्या भाज्या, फळे आणि पोषक आहार घेणे यामुळे त्वचा आतून निरोगी राहते. डोळ्यांना सतत ताण येणार नाही याची काळजी घेणे आणि स्क्रीन वापरताना मधूनमधून विश्रांती घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

घरगुती लेप आणि उपाय देखील डार्क सर्कल्सवर उपयोगी ठरतात. थंड दुधात भिजवलेले कापसाचे बोळे डोळ्यांवर ठेवल्यास थकवा कमी होतो आणि त्वचा उजळण्यास मदत होते. काकडी किंवा बटाट्याच्या चकत्या डोळ्यांवर ठेवल्या तरी गारवा मिळतो आणि काळेपणा कमी होण्यास हातभार लागतो. बदाम तेल किंवा नारळ तेल रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यांखाली हलक्या हाताने लावल्यास त्वचेला पोषण मिळते. गुलाबपाणीही डोळ्यांखालील त्वचेसाठी उपयुक्त ठरते.

डार्क सर्कल्स ही केवळ सौंदर्याची समस्या नसून तो आपल्या जीवनशैलीचा झालेला परिणाम असतो. मानसिक ताण कमी करणे, आरोग्यदायी सवयी लावणे आणि नियमित काळजी घेणे यामुळे डोळ्यांखालील काळी वर्तुळे नक्कीच कमी करता येतात आणि चेहर्‍यावर पुन्हा ताजेपणा व प्रसन्नता येते.

Web Title : डार्क सर्कल्स: केवल ब्यूटी ट्रीटमेंट नहीं, मन को भी आराम दें।

Web Summary : डार्क सर्कल्स तनाव, नींद और स्क्रीन टाइम से जुड़े हैं। जीवनशैली में बदलाव जैसे नींद, आहार और तनाव कम करना महत्वपूर्ण है। दूध, खीरा और तेल जैसे घरेलू उपचार मदद कर सकते हैं।

Web Title : Dark circles: Rest your mind, not just beauty treatments needed.

Web Summary : Dark circles are common, linked to stress, sleep, and screen time. Lifestyle changes like sleep, diet, and stress reduction are key. Home remedies such as milk, cucumber, and oils can help reduce them.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.