Lokmat Sakhi >Beauty > दिवसरात्र गळून केस विरळ झाले? किचनमधले ३ पदार्थ 'या' पद्धतीनं लावा, दाट होतील केस

दिवसरात्र गळून केस विरळ झाले? किचनमधले ३ पदार्थ 'या' पद्धतीनं लावा, दाट होतील केस

Best Herbs for Hair : शॅम्पू आणि साबणामधील केमिकल्समुळे अनेकदा केसांची गुणवत्ता खराब होते. केस कोरडे पडून तुटू लागतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 03:40 PM2023-09-14T15:40:48+5:302023-09-14T18:11:11+5:30

Best Herbs for Hair : शॅम्पू आणि साबणामधील केमिकल्समुळे अनेकदा केसांची गुणवत्ता खराब होते. केस कोरडे पडून तुटू लागतात.

Best Herbs for Hair : How to stop hair fall using herbs and get long thik hairs | दिवसरात्र गळून केस विरळ झाले? किचनमधले ३ पदार्थ 'या' पद्धतीनं लावा, दाट होतील केस

दिवसरात्र गळून केस विरळ झाले? किचनमधले ३ पदार्थ 'या' पद्धतीनं लावा, दाट होतील केस

केस वाढवण्यासाठी महिला बाजारातले महागडे शॅम्पू, तेल विकत घेतात. अनेकदा आपल्या जवळपास उपलब्ध असणाऱ्या नैसर्गिक वस्तूंकडे लक्ष दिलं जात नाही ज्याचे केसांना बरेच फायदे मिळतात. (Hair Fall Control Solution) केस गळणं कमी करण्यासाठी केसांना दाट बनवण्यासाठी काही सोपे उपाय प्रभावी ठरतात. शॅम्पू आणि साबणामधील केमिकल्समुळे अनेकदा केसांची गुणवत्ता खराब होते. केस कोरडे पडून तुटू लागतात. केसांच्या चांगल्या वाढीसाठी सोपे उपाय पाहूया. (How to stop hair fall using herbs)

रोजमेरी

केसांसाठी  रोजमेरी फायदेशीर ठरते. यामध्ये कार्सोनिक असते जे केस गळती रोखण्यासाठी प्रभावी आहे. केसांना रोजमेरी लावण्यासाठी एक वाटी पाणी घ्या. त्यात रोजमेरीची पाने घालून उकळवा. हे पाणी थंड झाल्यावर स्प्रे बॉटलमध्ये भरून केसांवर शिंपडा. तुम्हाला तुमच्या केसांमध्ये फरक दिसू लागेल.

ओठ काळपट दिसतात? मऊ-गुलाबी ओठांसाठी ३ उपाय, लिपबाम-लिपस्टीक लावणंच विसराल

तुळशीचा हेअर मास्क

तुळस आपल्या प्रत्येकाच्याच घरात असते. तुळशीत अनेक औषधी गुणधर्म असतात जे आजारांपासून लांब ठेवतात. त्याचप्रमाणे केसावरही तुळस प्रभावी ठरते.  तुळशीची पाने धुवून बारीक करा. त्यात खोबरेल तेल मिसळून पेस्ट बनवा आणि 45 मिनिटे केसांना लावून ठेवा आणि नंतर धुवा. तुळशीतील अँटी-ऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे, अँटी-फंगल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म केसांसाठी खूप चांगले आहेत.

चमचाभर हळदीने पांढरे केस होतील काळेभोर; 'या' पद्धतीने केसांना लावा-डायची गरज नाही

आवळ्याचं हेअर टॉनिक

व्हिटॅमिन सी समृद्ध आवळा केसांसाठी खूप फायदेशीर ठरतो. हे केसांना लावल्याने केसांना अनेक अँटी-ऑक्सिडंट्स मिळतात. त्याचे अँटीफंगल गुणधर्म टाळूचे आरोग्य चांगले ठेवतात. केस गळणे थांबवण्यासाठी आणि केस दाट करण्यासाठी तुम्ही आवळ्याचे हेअर टॉनिक बनवून लावू शकता.

आवळ्याचं हेअर टॉनिक कसं बनवावे

आवळा कापून 3 ते 4 दिवस सुकवण्यासाठी ठेवा. आवळा सुकल्यावर बारीक करून पावडर करा. आता एका भांड्यात खोबरेल तेल गरम करून त्यात एक चमचा आवळा पावडर टाका. थोडा वेळ शिजवून आचेवरून काढा. हे मिश्रण थंड करून डोक्याला लावा आणि काही वेळाने केस धुवा. यामुळे केस दाट होऊ लागतील. आठवड्यातून २ ते ३ वेळा तुम्ही हे टॉनिक केसांना लावू शकता. 

Web Title: Best Herbs for Hair : How to stop hair fall using herbs and get long thik hairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.