Lokmat Sakhi >Beauty > थंडी वाढली-ओठ फुटले, ४ सोपे घरगुती उपाय, ओठ राहतील कायम मुलायम-गुलाबी

थंडी वाढली-ओठ फुटले, ४ सोपे घरगुती उपाय, ओठ राहतील कायम मुलायम-गुलाबी

4 Easy tips for Soft lips in winter : ओठ कोरडे पडायला लागले की ते दिसायलाही खराब दिसते आणि सालपटं निघाल्याने आपल्यालाही अस्वस्थ होत राहते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2023 05:14 PM2023-10-30T17:14:20+5:302023-10-30T17:16:36+5:30

4 Easy tips for Soft lips in winter : ओठ कोरडे पडायला लागले की ते दिसायलाही खराब दिसते आणि सालपटं निघाल्याने आपल्यालाही अस्वस्थ होत राहते.

4 Easy tips for Soft lips in winter : Cold - chapped lips, 4 easy home remedies, lips will stay soft-pink forever | थंडी वाढली-ओठ फुटले, ४ सोपे घरगुती उपाय, ओठ राहतील कायम मुलायम-गुलाबी

थंडी वाढली-ओठ फुटले, ४ सोपे घरगुती उपाय, ओठ राहतील कायम मुलायम-गुलाबी

ऋतूबदलाच्या वेळी सगळ्यात जास्त परीणाम हा घसा आणि त्वचेवर होत असतो. ऑक्टोबर हिट संपून हवेतील गारवा वाढायला सुरुवात झाली की घसा खवखवणे आणि त्वचा कोरडी पडणे या समस्या उद्भवणे सुरु होते. ओठ फुटणे हे त्वचा कोरडी पडायला लागल्याचे सगळ्यात महत्त्वाचे पहिले लक्षण सते. गेल्या काही दिवसांपासून हवेतला गारवा जसा वाढला तसे ओठ कोरडे पडायला सुरुवात झाली आणि ओठांची सालपटं निघायला लागल्याचे आपल्यातील अनेकांना जाणवत असेल. ओठ कोरडे पडायला लागले की ते दिसायलाही खराब दिसते आणि सालपटं निघाल्याने आपल्यालाही अस्वस्थ होत राहते (4 Easy tips for Soft lips in winter). 

सौंदर्याच्या बाबतीत आपण चेहरा, केस, हात अशा सगळ्या गोष्टींची काळजी घेतो पण ओठांना मात्र आपण विसरतो. अशाप्रकारे कोरड्या पडलेल्या ओठांसाठी नेमके काय करावे ते अनेकदा आपल्याला कळत नाही. मग बाजारातून केमिकल असलेली उत्पादने लावून आपण हे ओठ तात्पुरते मुलायम करण्याचा प्रयत्न करतो. पण त्यापेक्षा काही घरगुती सोपे उपाय केले तर ओठ नैसर्गिकरित्या मुलायम होण्यास मदत होते. त्यासाठी नेमके काय करायचे पाहूया...

(Image : Google )
(Image : Google )

१. एक्सफोलिएशन 

ओठांचे एक्सफोलिएशन केल्यास ते जास्त मऊ आणि हेल्दी दिसतात. पण आपल्या ओठांची त्वचा अतिशय नाजूक असल्याने हे आठवड्यातून एकदाच करायला हवे. यासाठी बाजारात मिळणाऱ्या नैसर्गिक स्क्रबचा आपण वापर करु शकतो. कॉफीसारख्या घरगुती नैसर्गिक स्क्रबही आपण ओठांचे एक्सफॉलिएशन करण्यासाठी करु शकतो.  साय आणि चणाडाळीचं मिश्रण, मध आणि साखर यांसारखी नैसर्गिक स्क्रब ओठांवरची मृत त्वचा काढून टाकण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्यानंतर ओठ थंड पाण्याने धुवून टाका आणि साजूक तूप लावून ओठांना मसाज करा. हा उपायही आठवड्यातून २ ते ३ वेळा करावा. 

२. जीभ न फिरवणे 

ओठ कोरडे पडायला लागले की आपण नकळत त्यावर जीभ फिरवतो. त्यामुळे ते तात्पुरते ओले होतात पण काही वेळाने पुन्हा कोरडे होतात. तसेच सतत जीभ फिरवल्याने ओठांचा आकार मोठा होण्याची, ते काळे पडण्याची शक्यता असते. त्यामुळे ओठांचा ओलावा टिकण्यासाठी त्याला तूप लावणे, लिप बाम लावणे हे पर्याय केव्हाही जास्त चांगले असतात. 

३. लिपस्टीकचा कमीत कमी वापर

आपण कुठेही बाहेर जाताना अगदी सहज ओठांवर लिपस्टीक फिरवतो. यामध्ये विविध प्रकारच्या केमिकल्सचा वापर केलेला असतो. ओठ आधीच फुटलेले असतील तर लिपस्टीकमुळे ते आणखी कोरडे पडण्याची शक्यता असते. त्यामुळे ओठ फुटलेले असतील तर लिपस्टीक ऐवजी रंगीत अशा लिप बामचा वापर करावा. 

(Image : Google )
(Image : Google )

४. हायड्रेशनची काळजी घ्या

थंडीच्या दिवसांत आपल्याला एकूणच तहान कमी लागते. अशावेळी पाणी कमी प्यायले गेल्याने ओठ, त्वचा कोरडी पडते. पण मुद्दामहून कोमट पाणी, सूप, गरम दूध, कधीतरी चहा-कॉफी अशा पेयांचा आहारात समावेश करा. तसेच ओठ हायड्रेटेड राहतील यासाठी त्यांना खोबरेल तेल किंवा साजूक तूपही लावा.  

Web Title: 4 Easy tips for Soft lips in winter : Cold - chapped lips, 4 easy home remedies, lips will stay soft-pink forever

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.