मुंबई : मरोळमधील अग्नितांडवात एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2018 02:10 PM2018-01-04T14:10:29+5:302018-01-04T14:12:50+5:30

अंधेरीतील मरोळ परिसरात मैमून या रहिवासी इमारतीला गुरुवारी (4 जानेवारी) पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली.

अग्नितांडवात एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

मोईन कपासी (वय 80 वर्ष), तस्लीम कपासी (वय 42 वर्ष), सकीना कपासी (वय 13 वर्ष) , मोईज कपासी (वय 8 वर्ष) अशी मृतांची नावे आहेत.

इमारतीमधील अन्य 7 रहिवासी दुर्घटनेत जखमी झालेत.